Pratap Patil Chikhlikar : ओला दुष्काळ, कोल्हापूरच्या धर्तीवर मदत अन् विशेष पॅकेजसाठी प्रताप चिखलीकरांनी लावला जोर

Pratap Patil Chikhlikar Meet CM Fadnavis, DCM Ajit Pawar : नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत केली जाईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत दिला.
Pratap Patil Chikhlikar Letter To CM Fadnavis, DCM Ajit Pawar For Drought Relif News
Pratap Patil Chikhlikar Letter To CM Fadnavis, DCM Ajit Pawar For Drought Relif NewsSarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. नांदेड जिल्ह्यातील ओल्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

  2. आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी कोल्हापूरच्या धर्तीवर नांदेडसाठी विशेष मदत पॅकेजची मागणी केली.

  3. यासाठी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली.

Marathwada Drought News : मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टी पूर आणि ढगफुटीने सर्वाधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यात झाले. सरकारनेही तात्काळ याची दखल घेत पहिल्या टप्प्यात साडे पाचशे कोटींची मदत दिली. परंतु जिल्ह्यात झालेले नुकसान पाहता ही मदत अपुरी असल्याचा दावा करत अतिरिक्त मदत, विशेष पॅकेजच्या मागणीसाठी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी जोर लावला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चिखलीकर यांनी मुंबईत या दोन्ही नेत्यांची भेट घेतली. दिवाळीपुर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा होईल, असे आश्वासन दोघांनीही चिखलीकरांना दिले. परंतु नांदेड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा, कोल्हापूरच्या धर्तीवर मदत आणि विशेष पॅकेजच्या मागणीवर मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी ठोस आश्वासन चिखलीकरांना दिले नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश आणि लोहा-कंधारमधून आमदार झाल्यापासून प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांनी नांदेड जिल्ह्यात पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. सर्वाधिक इनकमिंग आणि माजी आमदार आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत. नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंबर एक करण्याचा निर्धार चिखलीकर यांनी केला आहे. पक्षाचे नेते अजित पवार यांच्याकडूनही चिखलीकर यांच्या प्रयत्नांना बळ दिले जात आहे.

Pratap Patil Chikhlikar Letter To CM Fadnavis, DCM Ajit Pawar For Drought Relif News
Atul Save Visit Nanded : नांदेड पाण्यात बुडाले, पाहणीसाठी आलेल्या अतुल सावे यांच्यावर पूरग्रस्तांचा संताप!

परंतू गेल्या दोन आठवड्यात झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी आणि महापूराने नांदेड जिल्ह्यात प्रचंड नुकसान झाले आहे. जिवीत हानीसह शेती, पींक, घरदांर, जनावरे, शेत जमीन वाहून गेल्याने तातडीची आणि भरीव मदत अपेक्षित आहे. यापार्श्वभूमीवर अतिवृष्टी व महापूरामुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती चिखलीकर यांनी फडणवीस, पवार यांना दिली. तसेच नांदेड जिल्ह्याला विशेष पॅकेज देण्यासह विविध मागण्यांचे निवेदन दिले.

Pratap Patil Chikhlikar Letter To CM Fadnavis, DCM Ajit Pawar For Drought Relif News
Pratap Patil Chikhlikar : अजितदादा शब्दाला पक्के, पण मंत्रीपदासाठी चिखलीकरांना स्थानिकमध्ये 'रिझल्ट' द्यावा लागेल!

यात प्रामुख्याने नांदेड जिल्ह्याला कोल्हापूरच्या धर्तीवर मदत, जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट पिक विमा मंजूर करावा, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेच्या हद्दीतील नुकसानग्रस्त नागरिकांना कोल्हापूर शहर जिल्ह्यात उद्भवलेल्या परिस्थितीत जी मदत झाली त्याच धर्तीवर मदत व्हावी, या मागण्यांचा समावेश आहे.

नांदेड जिल्ह्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य नागरीक, नुकसानग्रस्त, पूरग्रस्तांना भरीव मदत मिळावी. या सर्व मागण्यांची तात्काळ दखल घ्यावी, अशी विनंती चिखलीकर यांनी दोन्ही नेत्यांकडे केली. ऑगस्ट महिन्यापासून नांदेड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात हाल झाले आहेत. शेतीतून एका रुपयाचेही उत्पादन बाहेर येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तातडीने जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणीही चिखलीकरांनी या भेटीत केली.

नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लवकरच आर्थिक मदत केली जाईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या भेटीत दिला. लोहा कंधार विधानसभा मतदारसंघासह नांदेड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये 27 ऑगस्ट पासून अनेक वेळा अतिवृष्टी झाली आहे . या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना महापुर आला होता. बॅक वॉटरमुळेही शेतीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. अतिवृष्टीचा आणि बॅक वॉटरचा असा दुहेरी फटका नांदेड जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना बसला आहे.

शिवाय अनेक गावात पुराचे पाणी शिरल्याने हजारो घरांची पडझड झाली आहे. यामुळे कामगारांच्या हाताचा रोजगार बुडाला. मजुरांनाही आता काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. अशा परिस्थितीत नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना, शेतमजुरांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना सावरण्यासाठी जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून विशेष पॅकेज द्यावे.

FAQs

प्र.१: नांदेड जिल्ह्यात काय समस्या निर्माण झाली आहे?
उ: अतिवृष्टीमुळे ओला दुष्काळ निर्माण झाला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

प्र.२: आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी काय मागणी केली आहे?
उ: त्यांनी नांदेडसाठी कोल्हापूरच्या धर्तीवर विशेष मदत पॅकेजची मागणी केली आहे.

प्र.३: यासाठी त्यांनी कोणाची भेट घेतली?
उ: त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची भेट घेतली.

प्र.४: शेतकऱ्यांचे नुकसान किती झाले आहे?
उ: जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचे नुकसान झाले असून शेतकरी संकटात आहेत.

प्र.५: या भेटीनंतर काय अपेक्षा आहेत?
उ: सरकारकडून नांदेड शेतकऱ्यांसाठी विशेष मदत जाहीर होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com