Nagpur Riots Update : फक्त मुस्लिमांवरच देशद्रोहाचे गुन्हे का? ठाकरेंचा सरकारवर निशाणा

Nagpur Riots Update Manikrao Thakare questions Government : काँग्रेसच्या सत्यशोधन समितीच्या माध्यमातून नागपूरच्या दंगलीस कोण जबाबदार याचा अहवाल सादर करण्यात येणार आहे. याकरिता हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांकडून दंगलीचा घटनाक्रम जाणून घेण्यात आला आहे.
Riots in Nagpur
Riots in Nagpursarkarnama
Published on
Updated on

Manikrao Thakare News : नागपूरच्या दंगलीला कोण जबाबदार आहे? फक्त मुस्लिमांवरच देशद्रोहाचे गुन्हे का दाखल करण्यात आले? ज्यांनी लोकांच्या भावना भडकावल्या त्या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना का सोडून देण्यात आले? असे प्रश्न उपस्थित करून काँग्रेसच्या सत्यशोधन समितीचे अध्यक्ष तसेच गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी राज्य सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप लावला. यावेळी त्यांनी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांना दंगलीच जबाबदार धरून राष्ट्रद्रोहाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी देखील त्यांनी केली.

राज्यात शांतत राखणे व कायदा व सुव्यवस्था राखणे हे सराकराचे प्रथम कर्तव्य आहे. मात्र सरकारमधील मंत्रीच दंगलीस चिथावणी देऊन लोकांना भडाकावत आहेत. जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करून राज्यातील शांतता व भाईचारा संपवत असल्याने हे सरकार बराखास्त करावे, अशी मागणी ठाकरेंनी केली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज्यपालांना भेटून सरकार बरखास्त करण्याची मागणी करणार आहे.

Riots in Nagpur
Congress Fact-Finding Committee : काँग्रेसच्या सत्यशोधन समितीला पोलिसांनी रोखले; नागपूरच्या दंगलग्रस्त भागात जाण्यास मनाई

सत्यशोधन समितीच्या माध्यमातून आम्ही नागपूरच्या दंगलीस कोण जबाबदार याचा अहवाल सादर करणार आहोत. याकरिता हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांकडून माहिती घेतली. घटनाक्रम जाणून घेतला. कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी सरकारची आहे. मात्र सरकारमधील मंत्रीच बेजबाबदार वक्तव्य करीत आहेत. राज्यातील बुंधभाव उद्धवस्थ करण्याचे प्रयत्न केले जात आहे, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

औरंगजेबाची कबर खोदून काढावी, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र त्यावर कोणी फारशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या नाहीत. मुस्लिमांनी विरोधही केला नाही. असे असताना नागपूरमध्ये कबरीवरून आंदोलन करण्याची गरज नव्हती. त्यासाठी पोलिसांनी परवानगी का दिली? असा प्रश्न उपस्थित होतो. कोणी हिंसक आंदोलन करीत असेल, पुतळे जाळत असतील तर पोलिस त्यांना आधीच अटक करतात, आंदोलन हाणून पाडतात. मात्र नागपूरमध्ये उघडपणे पुतळा जाळण्यात आला. त्याकरिता कुराणाचे आयात असलेल्या चादरीचा वापर करण्यात आला. मुस्लिमांच्या आस्थेला ठेच पोहचवली. याचीही गंभीर दखल पोलिसांनी घेतली नाही,असे देखील ठाकरे म्हणाले.

सरकार अपयशी ठरले

ज्यांनी चादर जाळून नागपूरमधील शांतता भंग केली, दोन धर्मात भांडणे लावली त्यांच्यावरही मात्र गुन्हे दाखल करण्यात आले नाहीत. त्यांना शरण यायला लावले, जुजबी गुन्हे दाखल करून सोडून देण्यात आले. त्यानंतर या घटनेशी काश्मीर, बांगलादेशाशी या घटनेचा संबंध जोडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे सरकर जाती, धर्मात भेदभाव करीत आहेत. सर्वच आघाड्यांवर सरकार अपयशी ठरले आहे.

कायदा व सुव्यवस्थया सरकारला राखता आला नाही. त्यामुळे हे सरकार बरखास्त करण्याची मागणी काँग्रेसच्यावतीने राज्यपालांकडे केली जाणार असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांगितले.यावेळी विकास ठाकरे, प्रफुल गुडधे, आमदार साजिद पठाण, अतुल लोंढे, गिरीश पांडव, प्रशांत धवड, संजय महाकाळकर, अतुल कोटेचा आदी उपस्थित होते.

Riots in Nagpur
Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस धर्माचं रक्षण करणारी मराठा जात संपवायला निघालेत! मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com