Pratap Patil Chikhlikar News : लोकसभेत पराभूत झालेल्या चिखलीकरांचे भविष्य विधानसभेला सुरक्षित होणार का ?

Marathwada Politics : लोकसभेला पराभूत झाल्यानंतर आता प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत आहेत.
MP Pratap Patil
MP Pratap PatilSarkarnama
Published on
Updated on

Nanded News : महायुती सरकारने महाराष्ट्राचं भविष्य सुरक्षित करणारा अतिरिक्त अर्थसंकल्प-2024 नुकताच विधीमंडळ अधिवेशनात मांडला. या मध्ये समाजातील प्रत्येक स्तरातील जनतेसाठी सरकारी सुविधा आणि योजनांची भेट दिली आहे. 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्प संदर्भात योजना नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्या,याकरिता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्राच्या वतीने राज्यभर प्रत्येक मंडळामध्ये अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या विकासाचा कार्यक्रम राबवण्यात येत आहे.

याच अनुषंगाने लोहा येथील कार्यक्रमाला माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी हजेरी लावली. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या नांदेड मतदारसंघातून चिखलीकर यांचा पराभव झाला. लोकसभेला पराभूत झाल्यानंतर आता प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातून लढण्याच्या तयारीत आहेत.

महायुतीच्या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राचे भविष्य सुरक्षित होणार की नाही? हे येणारा काळ ठरवेल, पण त्याआधी प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांना विधानसभेची उमेदवारी मिळवून त्यांचे भविष्य सुरक्षित होते का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या चिखलीकर यांनी विधानसभा लढवण्याची तयारी सुरू केली आहे.

लोहा येथील अर्थसंकल्पावरील कार्यक्रमात राज्य सरकारने ज्या जनकल्याणकारी योजना राबवल्या त्या सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन चिखलीकर यांनी केले. खेळी-मेळीच्या वातावरणामध्ये प्रमुख मार्गदर्शिका व वक्ता भाजपा महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रणिता देवरे चिखलीकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

MP Pratap Patil
Ladki Bahin Yojana : महायुतीचेच सरकार येणार अन् लाडक्या बहिणीला खूश ठेवणार! अजित पवार गटाचा आत्मविश्वास

नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजप (BJP) महायुतीचा पराभव झाल्यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. स्वत: चिखलीकर यांनी आपल्याच पक्षातील काही आमदारावर अप्रत्यक्षरित्या टीका करत त्यांच्यावर लोकसभेला काम न केल्याचा आरोप केला होता. अशोक चव्हाण भाजपमध्ये आल्यानंतर नांदेडमध्ये झालेला पराभव चिखलीकर यांच्यासह राज्यातील नेत्यांनाही धक्का देणारा ठरला होता.

मात्र, आता या पराभवावर चर्चा करण्यापेक्षा चिखलीकर यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते आहे. लोकसभा पराभवानंतर लोहा-कंधार मध्ये कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात चिखलीकरांना विधानसभा लढवण्यासाठी आग्रह करण्यात आला होता. हा आग्रह मान्य करत त्यांनी पक्षाने विधानसभेची उमेदवारी दिली तर लढवण्याची तयारी दर्शवली होती. त्यानंतर आता चिखलीकर संभाव्य उमेदवार म्हणून मतदारसंघात कामाला लागल्याचे चित्र आहे.

MP Pratap Patil
Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवार अजित पवार यांना मोठा धक्का देणार? नाशिकमध्ये मोठी घडामोड

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com