Pratapsinh Patil : प्रतापसिंह पाटलांनी मानले अब्दुल सत्तारांचे आभार; म्हणाले, 'ट्वेंटी-ट्वेंटी मॅच जिंकून दिली'

Marathwada Politics News: मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील विजयाचे श्रेय डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी अब्दुल सत्तार यांना दिले. सिल्लोडमधील कार्यक्रमात त्यांनी सत्तार यांच्या प्रचारातील भूमिकेचे क्रिकेटच्या भाषेत कौतुक केले.
Dr. Pratapsinh Patil credited Abdul Sattar for his victory
Dr. Pratapsinh Patil credited Abdul Sattar for his victorySarkarnama
Published on: 
Updated on: 

Marathwada Graduate Constituency : मराठवाडा पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीचे डाॅ. प्रतापसिंह पाटील यांनी ऐतिहासिक विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सतीश चव्हाण यांच्यासारख्या मातब्बर उमेदवाराचा पराभव केल्यामुळे पाटील यांची राज्यभरात चर्चा होत आहे. परंतु प्रतापसिंह पाटील हे मात्र सध्या एका व्यक्तीचे कौतुक करताना थकत नाहीये. ते म्हणजे शिवसेनेचे माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार.

राज्यात महायुतीचे उमेदवार म्हणून सतीश चव्हाण यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली होती. राज्याच्या वरिष्ठ नेतृत्वाने देखील मित्र पक्षांनी युतीधर्म पाळावा, असे स्पष्ट आदेश दिले होते. दरम्यान, अमरावती शिक्षक मतदारसंघ तसेच पुणे पदवीधर-शिक्षक मतदारसंघातील जागेवरून शिवसेना-भाजपामध्ये वाद निर्माण झाला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मराठवाडा पदवीधर मतदारसंघामध्ये शिवसेनेचा पाठिंबा सतीश चव्हाण यांना नसेल अशी भूमिका घेतली होती.

परंतु यावर पुन्हा वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा झाली आणि शिवसेनेने सतीश चव्हाण यांचे तनमनधनाने काम करण्याचा निर्णय घेतला.हा निर्णय झुगारत अब्दुल सत्तार यांनी जाहीरपणे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार डाॅ. प्रतापसिंह पाटील यांचा प्रचार केला. त्यांना पाठिंबा जाहीर करत सत्तार यांनी आपल्या संपर्क कार्यालयात त्यांच्यासाठी पदवीधरांचा मेळावा घेतला. संपूर्ण निवडणूकीत ते सक्रीय होते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये असलेल्या आपल्या संपर्काचा फायदा त्यांनी पाटील यांना करून दिला.

Dr. Pratapsinh Patil credited Abdul Sattar for his victory
Sanjay Shirsat : 'मी सांगत होतो, इम्तियाज जलील हाच निदा खान प्रकरणातील मुख्य आरोपी'; जेलमध्ये जावे लागेल, संजय शिरसाटांचा दावा!

प्रतापसिंह पाटील यांनी महायुतीच्या सतीश चव्हाण यांचा तब्बल साडेअठरा हजार मतांच्या फरकाने पराभव केला. त्यानंतर सतीश चव्हाण यांनी पत्रकार परिषदेतून अब्दुल सत्तार यांचे नाव घेत थेट त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. यावर सत्तार यांनी चव्हाण यांच्यावर पलटवार केला होता. दरम्यान, आमदार प्रतापसिंह पाटील हे सध्या मराठवाड्यात मतदारांचे आणि त्यांना मदत करणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी घेत आभार व्यक्त करत आहेत.

नुकतीच त्यांनी सिल्लोड येथे जाऊन आमदार अब्दुल सत्तार यांची भेट घेतली. दिवाळी निमित्त दुष्काळग्रस्ताना मदत वाटपाच्या कार्यक्रमात पाटील यांनी आपल्या भाषणातून अब्दुल सत्तार यांचे तोंडभरून कौतुक केले. आपल्या विजयाचे श्रेयच त्यांनी सत्तार यांना देऊन टाकले.'माझी निवडणूक ही ट्वेन्टी ट्वेन्टी मॅच सारखी झाली. या मॅचसाठी आम्हाला एक असा प्लेअर मिळाला ज्याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला आणि आम्हाला मॅच जिंकून दिली. तो म्हणजे आमचे सत्तार भाई', अशा शब्दात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

Dr. Pratapsinh Patil credited Abdul Sattar for his victory
Prakash Abitkar : नांदेडच्या आरोग्य संवाद यात्रेत मंत्री प्रकाश आबीटकर यांचा कामचूकार अधिकाऱ्यांना दणका; थेट कारवाई!

सत्तार यांनीही आपल्या प्रचारामध्ये आणि प्रतापसिंह पाटील निवडून आल्यानंतर ते किती चांगले, उच्चशिक्षित आणि राजकीय वारसा लाभलेल्या घरातून आले हे भरभरून सांगितले. तसेच २०२९ नंतरही प्रतापसिंह पाटील हेच आमदार म्हणून निवडून येतील, असा विश्वास व्यक्त करत सतीश चव्हाण यांचा कार्यक्रम तेच करतील असा टोला लगावला होता. एकूणच आमदार प्रतापसिंह पाटील आणि अब्दुल सत्तार यांच्यातील मैत्री अधिकच घट्ट होत असल्याचे यानिमित्ताने दिसून आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.