Omerga News : राष्ट्रपतींचा लहान भाऊ पंतप्रधानाचा उद्या वाढदिवस; दोन्ही मुलांची नावे ठरताहेत चर्चेचा विषय

Children's Names President and Prime Minister Heart Touching Story From Latur : जाती-धर्मावरून राज्यात आणि देशात वाद झाल्याच्या घटना कायम येत असतात. हा वाद घालणाऱ्यांसमोर आणि समाजासमोर एका पित्याने नवा आदर्श ठेवला आहे...
Omerga News
Omerga NewsSarkarnama
Published on
Updated on

President, Priminister : उमरगा तालुक्यातील चिंचोली (भुयार) येथील दत्ता चौधरी यांनी दोन्ही मुलांची नावे राष्ट्रपती व पंतप्रधान अशी ठेवली आहेत, अगदी प्रशासनाकडे पाठपुरावा करून त्यांनी दोन्ही मुलांच्या नावांचे आधारकार्डही काढले आहे. दरम्यान, पंतप्रधान चौधरी या चिमुकल्याचा शुक्रवारी (ता. १०) दुसरा वाढदिवस आहे, पण तो साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.

Omerga News
Nanded News : वर्षभरानंतर ठरले ! नांदेड उत्तरमधून मैदानात उतरणार श्रीजया चव्हाण

मुलांच्या दाखल्यावर व इतर कोणत्याही कागदपत्रांवरती माझ्या मुलांच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख नसावा व फक्त भारतीय असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी करत सध्या जन्म प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांवर असलेल्या माझ्या जातीचा व धर्मांच्या आधारावरून जे काही योजना, सवलती, सोयी मिळत आहेत. त्यादेखील मी स्वेच्छेने सोडण्यास तयार आहे. ज्यामुळे जात व धर्मामुळे होत असलेला वाद कुठेतरी थांबेल. आणि देशाच्या ऐक्यास मदत होईल, असे चौधरी यांना वाटते.

दत्ता चौधरी यांची हौसच न्यारी आहे, त्यांनी पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती ठेवत नामकरण सोहळा केला होता. बाळे, सोलापूर शहरात जन्मल्यामुळे महानगरपालिकेतून त्यांनी  "राष्ट्रपती दत्ता चौधरी" या नावाने जन्मप्रमाणपत्र काढले, शिवाय आधारकार्डही काढून घेतले. त्या वेळी चर्चेचा विषय झाला होता, त्यानंतर चौधरी यांना १० नोव्हेंबर २०२१ ला दुसरा मुलगा झाला. त्यांनी मुलाचे नामकरण पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला आणि २१ नोव्हेंबर २०२१ मुस्ती ( जि. सोलापूर) येथे मुलाचे नाव "पंतप्रधान" ठेवण्याचा विधी (पाळण्याचा) कार्यक्रम झाला. त्यानंतर चौधरी यांनी बोरामणी (जि. दक्षिण सोलापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे पंतप्रधान नावाचा जन्म दाखला देण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, पंतप्रधानपद संविधानिक असल्याने तसा जन्म दाखला द्यावा, की नाही याबाबत मार्गदर्शन मागविण्यात आले होते. त्यामुळे जन्म दाखल्याचा अर्ज लालफितीत अडकला होता.

पंतप्रधान नावासाठी उद्धव ठाकरेंकडे धाव

पंतप्रधान नावाचा जन्म दाखला मिळत नसल्याची पत्राद्वारे कैफियत दत्ता चौधरी यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे ई मेलद्वारे पत्र पाठवून मांडली होती. त्यानंतर जन्म दाखला देण्याच्या प्रक्रियेला वेग आला होता. दाखला मिळाल्यानंतर त्या आधारे पंतप्रधान दत्ता चौधरी या नावाचे आधारकार्ड काढले.

कागदपत्रावर जात, धर्माचा उल्लेख नसावा

मुलांच्या दाखल्यावर व इतर कोणत्याही कागदपत्रांवरती माझ्या मुलांच्या जातीचा किंवा धर्माचा उल्लेख नसावा व फक्त भारतीय असा उल्लेख करण्यात यावा, अशी मागणी करत सध्या जन्म प्रमाणपत्र व इतर कागदोपत्रावर असलेल्या माझ्या जातीचा व धर्मांच्या आधारावरून जे काही योजना, सवलती, सोयी मिळत आहेत. त्यादेखील सोडण्याची तयारी त्याने दर्शवली आहे. ज्यामुळे जात व धर्मामुळे होत असलेला वाद कुठेतरी थांबेल आणि देशाच्या ऐक्यास मदत होईल, असे चौधरी यांना वाटते.

Omerga News
Pankaja Munde News : ''जाळपोळीमुळे इतर समाजाच्या मनात सुप्त ज्वालामुखी...''; पंकजांचं सूचक विधान

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com