Pratap Sarnaik News : मराठा आंदोलकांचा प्रताप सरनाईक यांना घेराव! पुरावे असताना कुणबी प्रमाणपत्रासाठी अडवणुकीचा आरोप

Maratha activists surrounded Guardian Minister Pratap Sarnaik in Dharashiv, accusing him of delaying Kunbi caste certificates. : प्रशासन काही कार्यवाही करते आहे की नाही? दोनवेळा फोन केला होता. त्यावेळी मराठा समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. पण अजूनही का सुटत नाहीत?
Pratap Sarnaik News Dharashiv
Pratap Sarnaik News DharashivSarkarnama
Published on
Updated on

Dharashiv News : कुणबी असल्याचे पुरावे सादर केल्यानंतरही जात वैधता प्रमाणपत्र देण्यास संबंधित विभागातील अधिकारी टाळाटाळ करतात, असा आरोप मराठा आरक्षण आंदोलकांनी केला. आमची अडवणुक केली जात असून सातडीने कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात आदेश द्या, अशी मागणी करत धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असलेले राज्याचे परिहवन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना संतप्त आंदोलकांनी घेराव घातला.

जात वैधता प्रमाणपत्र मिळत नसल्याने मराठा समाजातील तरुणांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याकडे आंदोलकांनी प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांचे लक्ष वेधले. त्यानंतर मंत्र्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन वरून झापले. ज्यांचे पुरावे, नोंदी आहेत, त्यांना तात्काळ कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्या, असे आदेश त्यांनी संबंधितांना दिले. कुणबी पुरावे असतानाही जात वैधता प्रमाणपत्र समितीकडून जाणीवपूर्वक अडवणूक केली जात असल्याचा आरोप करत कार्यकर्त्यांनी केला.

संतापलेल्या कार्यकर्त्यांनी प्रताप सरनाईक यांना घेरावा घातल्याने या ठिकाणी शा‍ब्दिक चकमक होऊन काही काळ वातावरण तापले होते. (Maratha Reservation) आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर सबंधित अधिकाऱ्याला फोनवरुन प्रताप सरनाईक यांनी चांगलाच दम भरला. पुरावे असणाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचे आदेश देत यापुर्वी दोनवेळा आदेश देऊनही काम का केले जात नाही, असा जाब घेत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Pratap Sarnaik News Dharashiv
Maratha Vs OBC controversy : समीर भुजबळांच्या इशाऱ्याने मराठा विरुद्ध ओबीसी वाद पुन्हा पेटणार?

प्रताप सरनाईक यांनी जात वैधता समितीच्या अधिकार्‍यांना फोन लावत या आधीही, दीड महिन्यापूर्वी याच संबंधित फोन केला होता. पण अजूनही समस्या सुटत नाही, प्रशासन काही कार्यवाही करते आहे की नाही? या आधी दोन वेळा फोन केला होता. त्यावेळी मराठा समाजाच्या ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्याचं आश्वासन तुम्ही दिलं होतं. पण अजूनही समस्या का सुटत नाहीत?

Pratap Sarnaik News Dharashiv
Manoj Jarange Patil : आरक्षण देऊन टाका अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल!

तुमच्यामुळे शासनाला आणि आम्हाला त्रास होत असेल तर हे चुकीचं आहे. या सगळ्या गोष्टीला तुम्ही जबाबदार आहात. तुमच्याकडे चार्ज असतानाही काही कार्यवाही का करत नाही? तातडीने या प्रकरणात लक्ष घाला आणि नियमानुसार कार्यवाही करा, अशा शब्दात सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना बजावले. दरम्यान, 29 आॅगस्ट रोजी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आरक्षणासाठी मुंबईत धडकण्याचा इशारा दिला आहे.

Pratap Sarnaik News Dharashiv
Pratap Sarnaik: प्रताप सरनाईक 'मराठी अस्मिता मोर्चात' सहभागी! 'जय गुजरातच्या' डॅमेज कंट्रोलसाठी एकनाथ शिंदेंचे प्रयत्न?

या निमित्ताने ते मराठवाड्यासह राज्याच्या विविध बागात चावडी बैठका घेत आहेत. राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे डबल गेम खेळत आहेत. समोर अधिकाऱ्यांना फोनवरून कुणबी जात वैधता प्रमाणपत्र द्या, असे सांगतात. पाठ फिरल्यावर मात्र देऊ नका, असे सांगतात असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपुर्वी केला होता. त्यानंतर आता प्रताप सरनाईक यांना मराठा आंदोलकांच्या रोषाला समोरे जावे लागले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com