जालना : मराठवाड्यातील २३ नगरपंचायत निवडणुकीसाठी आज प्रत्यक्ष मतदान होत आहे. परंतु मतदाना दरम्यान, सत्ताधारी व विरोधक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडतांना दिसत आहेत. (Shivsena) जालना जिल्ह्यात मतदाना दरम्यान, वाद (Marathwada) झाल्यामुळे शिवसेना आणि भाजपचे (Bjp) कार्यकर्ते एकमेकांवर तुटून पडल्याचा प्रकार घडला.
बदनापूरचे माजी शिवसेना आमदार संतोष सांबरे यांचे बंधू आणि विद्यमान आमदार नारायण कुचे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. यामुळे इथे काही काळ तणावाचे वातावरण होते. दरम्यान, या हाणामारीत आमदार नारायण कुचे यांना देखील मारहाण झाल्याची चर्चा होती.
त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पहायला मिळाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना पांगवले. तणाव लक्षात घेता घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. नगर पंचायत निवडणुकीत भाजपा आमदार नारायण कुचे आणि शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे यांच्यात वार्ड क्रमांक १२ व १३ च्या मतदान केंद्राबाहेर राडा झाला.
आजी-माजी आमदारांचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने मतदान केंद्रावर तुंबळ हाणामारी सुरू झाली. बदनापूर नगर पंचायत निवडणुकीत आमदार नारायण कुचे यांनी कॉलेजचे विद्यार्थी मतदानाला आणले असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार संतोष सांबरे व त्यांचे बंधू भरत सांबरे यांनी केला होता.
या आरोपावरून दोन्ही गटात तुंबळ हाणामारी झाली. औरंगाबाद- जालना महामार्गावरील वार्ड क्रमांक १२ आणि १३ च्या मतदान केंद्राबाहेर झालेल्या या राड्यात भरत सांबरे यांनी आमदार नारायण कुचे यांना मारहाण केल्याचे बोलले जाते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.