Dharashiv Political News : भूम-परांड्याचे माजी आमदार राहुल मोटे यांनी विद्यमान आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. तानाजी सावंत यांच्यावर बोचरी टीका केली. (Osmanabad Political News) ज्या साखर कारखानदारीच्या भरवशावर सावंत जिल्ह्यात राजकारण करत आहेत, ती कारखानदारी मी केलेल्या शाश्वत विकासावर सुरू आहे, अशा शब्दात मोटे यांनी सावंतांना सुनावले. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही माजी आमदार राहुल मोटे शरद पवार यांच्यासोबतच आहेत.
अजित पवार आणि मोटे हे नात्याने काका-भाचे लागतात, मोटेच्या राजकीय कारकीर्दीत अजित पवारांचा मोठा वाटा आहे. तरीही मोटेंनी वेगळी वाट निवडली आणि मोठ्या साहेबांशी निष्ठा राखली. काही दिवसांपुर्वी एका जाहीर कार्यक्रमात पालकमंत्री सावंत (Tanaji Sawant) यांनी अजित पवार आणि राहुल मोटे यांचा काका-भाच्याच्या जोडीने जिल्ह्यात गुत्तेदार पोसले, असा आरोप केला होता. (Shivsena) यावर तेव्हा व्यक्त न झालेल्या राहुल मोटे यांनी योग्य संधी साधत थेट पत्रकार परिषद घेत सावंतांना टोला लगावला.
पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत यांची साखर कारखानदारी या भागात आपण केलेल्या शाश्वत विकासा कामामुळेच उभारली गेली. (NCP) आपण केलेल्या विकास कामाची हीच पावती असल्याचा टोला मोटे यांनी लगावला. माजी आमदार स्व. महारुद्र मोटे यांनी याभागात अनेक सिंचनाची कामे केली. आपल्या काळातही अनेक सिंचनाची कामे, वीज उपकेंद्राची उभारणी झाली. प्रामुख्याने सीना कोळेगाव, पांढरेवाडी, संगमेश्वर, वाकवड, साकत, तांबेवाडी आदी प्रकल्प उभारल्याने सिंचनाच्या सोयी झाल्या.
अनेक ठिकाणी ३३ केव्ही. ,२२० केव्हीची उभारणी करण्यात आली. पालकमंत्री सावंत यांनी सिंचनाच्या विजेसाठी एकतरी काम पुर्ण केले का? ते सांगावे, असे आव्हान मोटे यांनी यावेळ सावंतांना दिले. सार्वजानिक बांधकाम विभागातील काही टेंडर भ्रष्टाचारामुळेच रद्द झाले. वेगवेगळ्या धरणांना जोडणाऱ्या प्रकल्पाच्या तसेच डीपीडीसीच्या कामात देखील टक्केवारीचा व्यवहार होत असल्याचा आरोपही मोटे यांनी केला. वेगवेगळ्या जिल्ह्यातून खासगी सचिवाकडून टक्केवारीची वसुली केली जाते.
परभणीचे खासदार बंडू जाधव यांच्या आरोपाचा दाखलाही मोटे यांनी यावेळी दिला. महाराष्ट्रातील मंत्री मंडळातून ज्या भ्रष्ट मंत्र्यांना वगळण्यात येणार होते, त्यात पालकमंत्री डॉ. सावंत यांचे नाव होते. आरोग्य खात्याच्या भोंगळ कारभारावर केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री डॉ. भारती पवार व खासदार संभाजी राजे यांनी टीका केल्याचेही मोटे यांनी यावेळी पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिले. मोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री सावंत यांच्यावर आरोप केल्यामुळे ही आगामी निवडणुकीची तयारी तर नाही ना? अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.
Edited By : Jagdish Pansare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.