Beed Political News : अठरा वर्ष सत्तेत राहिलेले अजित पवार आता बीडचे मागासलेपण घालवणार..

Marathwada : जिल्ह्यात असलेल्या वसाहतींतील एकेक व्यवसाय बंद पडत आहेत. शेतकरी आत्महत्यांत राज्यात जिल्ह्याचा अव्वल क्रमांक.
Ajit Pawar-Dhananjay Munde  News
Ajit Pawar-Dhananjay Munde NewsSarkarnama

Beed Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांची २७ रोजी शहरात होणारी सभा भव्य करण्याचे नियोजन आहे. कृषीमंत्री धनंजय मुंडे तर सभेचे यमजानच आहेत, पण सभेला राष्ट्रवादीचे इतर मंत्रीही येणार आहेत. (Ajit Pawar Sabha News) सदर सभा जिल्ह्याचा विकास, अस्मिता, सन्मान आणि जिल्ह्याचा दुष्काळ व मागासलेपणा कायम दुर करण्यासाठीचे व्हिजन मांडणारी असल्याचे सांगितले जाते.

Ajit Pawar-Dhananjay Munde  News
Ambadas Danve On Vijaykumar Gavit : गावितांची जीभ घसरली, दानवे म्हणाले वाचळवीरांच्या पंगतीत आणखी एक नाव..

उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) मागच्या काळात (१९९९ नंतर) १८ वर्षे सत्तेत प्रमुख पदावर आहेत. आता ते नव्या राजकीय समिकरणात जिल्ह्याचे मागासलेपण कायम दुर करतील, ही सामान्यांना अपेक्षा आणि त्यांच्या समर्थकांना भाबडा विश्वास आहे. (Beed News) राज्यात जुलै महिन्यात नवे राजकीय समिकरण तयार झाले आणि अजित पवार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री झाले. जिल्ह्यातील धनंजय मुंडे यांनाही कृषीमंत्रीपद मिळाले.

या समिकरणानंतर (NCP) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सभा घेण्याचे जाहीर केले आणि आपणही या सभांच्या ठिकाणी प्रत्युत्तर सभा घेण्याचे लागलीच अजित पवारांनीही जाहीर करुन टाकले. अजित पवारांसह पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील आदी नेत्यांच्या उपस्थितीतील सभेत जिल्ह्याचा विकास, अस्मिता, सन्मान आणि जिल्ह्याचा मागासलेपणा व दुष्काळ कायम मिटविण्यासाठी लेखाजोखा या सभेत मांडण्यात येणार आहे.

दरम्यान, आता उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री म्हणून अजित पवार यांना साधारण वर्षभराचा कालावधी असेल. या काळात पवार जिल्ह्याचे मागासलेपण कायम दुर करण्यासाठी भरघोस हातभार लावतील, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. मात्र, पवार यांच्यासह जिल्ह्यात येणारे राष्ट्रवादीचे बहुतांशी नेते १९९९ नंतर साधारण १८ वर्षे सत्तेत होते. १९९९ ते २०१४ या काळात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीची सत्ता होती. तर, २०१९ नंतर तीन वर्षे महाविकास आघाडीच्या सरकारमध्येही पवार प्रमुख आणि राष्ट्रवादीकडे महत्वाची खाती होतीच.

यात शरद पवारांचे बाहेरुन नियंत्रण होते तर राष्ट्रवादीतील सत्तेची सुत्रे कायम अजित पवारांकडेच असत. आता ही मंडळी शरद पवारांना सोडून नव्या सत्तेत गेली एवढेच. मागच्या १८ वर्षात घडले नाही ते आता वर्षात घडणार का ? हा खरा प्रश्न आहे. या १८ वर्षांत राष्ट्रवादीने विकासासाठी काही दिले की नाही हा वेगळा मुद्दा असला तरी मंत्रीपदे, विधान परिषद, महामंडळांच्या माध्यमातून सत्तेचा वाटा जिल्ह्याला दिला. दिवंगत विमल मुंदडा, जयदत्त क्षीरसागर, प्रकाश सोळंके, सुरेश धस आदींना मंत्रीपदे आणि पुढे धनंजय मुंडे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद, सामाजिक न्याय मंत्रीपद जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले गेले.

Ajit Pawar-Dhananjay Munde  News
Bead Politics : बीड जिल्ह्यात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षांतर्गत वाद वाढला ? हेवेदावे करण्यातच पदाधिकारी व्यस्त

दिवंगत विनायक मेटे, अमरसिंह पंडित, उषा दराडे, संजय दौंड आदींना परिषदेवर संधी मिळाली. मात्र, आता ही संधी शरद पवार यांच्यामुळे कि अजित पवारांमुळे हा मुद्दा वेगळाच. मात्र, या प्रत्येक मंडळींनी आपापल्या राजकीय कुवतीनुसार सत्तेच्या माध्यमातून जिल्ह्यात विकासांचे प्रकल्प राबविले व तात्कालिक विकासाच्या गरजेच्या गोष्टीही पुर्ण केल्याचे नाकारता येणार नाही. त्यात आरोग्य, रस्ते, पाणी आदी बाबींचा समावेश आहे. मात्र, यातील शास्वत किती व वाहून किती व कोणाच्या खिशात गेले हा वेगळा मुद्दा. मात्र, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा असलेला नगर - बीड - परळी लोहमार्गाला निम्मा निधी राज्याचा असे आणि हा वाटाच वेळेत दिला जात नसल्याचा आरोप भाजपकडून केला जाई.

जिल्ह्यात या काळात औद्योगीक विकासाच्या दृष्टीने एकही वसाहत उभारली नाही. जिल्ह्यात असलेल्या वसाहतींतील एकेक व्यवसाय बंद पडत आहेत. शेतकरी आत्महत्यांत राज्यात जिल्ह्याचा अव्वल क्रमांक अनेक वर्षांपासून कायमच आहे. जिल्ह्यात या कालावधीत सिंचनाचा देखील एकही मोठा प्रकल्प झाला नाही. मागच्या २४ पैकी १८ वर्षे सत्तेत असलेली व वर्षापूर्वी सत्तेपासून दुर असलेली आणि आता पुन्हा फक्त कुस बदलून सत्तेत आलेली ही मंडळी २७ तारखेला जिल्ह्यात येणार आहे. त्यांना कोणाला प्रत्युत्तर द्यायचे नसले तरी जिल्ह्याच्या विकासाबाबत आणि मागासलेपणाबाबत केवळ खपल्या काढण्यापेक्षा जिल्ह्याच्या झोळीत खरच काही तरी टाकावे अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com