Vijay Wadettiwar Statement : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू; विजय वडेट्टीवारांचा दावा

Wadettiwar On Shinde's Chief Ministership : एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून हटवून अजित पवार यांना मुख्यमंत्री पद दिले जाणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
Vijay Wadettiwar| Eknath Shinde
Vijay Wadettiwar| Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Gadchiroli Political News : एकनाथ शिंदे यांना हटवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री पद दिले जाईल, दावा खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यावरून बरचं राजकारणही रंगले. त्यानंतर आता पुन्हा राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाचे संकेत दिले आहेत. आरोग्याच्या कारणावरून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्याचा दिल्लीतील हाय कमांडचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला आहे.

गडचिरोलीत बोलताना वडेट्टीवार म्हणाले, एकनाथ शिंदेंचे प्रवक्ते एक सांगतात त्यांची तब्येत ठिक नसल्यामुळे त्यांना अॅडमिट करायची गरज आहे, तर सीएमओ ऑफिसकडूनंही या बातमीला दोन दिवसात पुष्टी मिळते. हे पाहता मुख्यमंत्र्यांना आरोग्याच्या दृष्टीने अॅडमिट करायचं, आणि आरोग्याचं कारण पुढे करून त्यांचा राजीनामा घ्यायचा आणि अजित दादांना मुख्यमंत्री करण्याचा प्रयत्न तर सुरू नाही ना, अशी शंका येते.

Vijay Wadettiwar| Eknath Shinde
Pimpri Police News : राज्यपाल रमेश बैस यांच्या दौऱ्यानिमित्त सामाजिक कार्यकर्ते पुन्हा नजरकैदेत ; विरोध नसतानाही कारवाई...

मुख्यमंत्री शिंदेंचा पावसाळी अधिवेशनातील सहभागही अत्यंत कमी होता. सीएम शिंदे १३ दिवसांच्या अधिवेशनाच्या काळात फक्त दोन दिवस उपस्थित होते. खालच्या सभागृहातही फक्त चार वेळा त्यांची उपस्थिती होती. तेही दिड दोन तासांची उपस्थिती होती.इतकच नव्हे तर, ही उपस्थिती, त्यांचा सहभाग, त्यांची सार्वजनिक कार्यक्रमांना टाळणे, आराम करण्यासाठी बाहेर जाणं, तब्येतीची काळजी घेणं, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, महाराष्ट्रालाही त्यांच्या तब्येतीची काळजी आहे. त्यामुळे त्याचा खुलासा महाराष्ट्राला अपेक्षित आहे, असंही वडेट्टीवार यांनी नमुद केलं.

ते म्हणाले, मुख्यमंत्री एका पक्षाचे नाही तर संपूर्ण राज्याचे असतात. त्यांच्या प्रकृतीबाबत सीएमओ ऑफिसकडून जी माहिती समोर येतेय, ते पाहता आरोग्याच्या दृष्टीने त्यांना त्यांच्या पदापासून दूर करण्याचा प्रयत्न दिल्लीतील त्यांच्या हायकमांडने सुरू केला असावा, अशी भावना लोकांमध्ये पसरू लागल्या आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com