Raj Thackeray News: राज ठाकरे काल फोनवर बोलले, उद्या भेटीला येणार..

Maratha Reservation News : दोन-अडीच मिनिटे राज ठाकरे जरांगे यांच्याशी बोलत होते.
Raj thackeray News
Raj thackeray News Sarkarnama

MNS Political News : अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे व त्यांच्या आंदोलक सहकाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. अमानुष मारहाणी महिला, तरुण अनेकजण गंभीर जखमी झाले. या घटनेचे पडसाद आज तिसऱ्या दिवशीही राज्यभरात उमटत आहे. उद्या अनेक जिल्ह्यांमध्ये या घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला आहे.

Raj thackeray News
Mp Imtiaz Jaleel On`INDIA` : आमची मतं पाहिजे, पण नेतृत्व नको ; म्हणून दूर ठेवले !

या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे उद्या, सकाळी ८ वाजत अंतरवाली सराटीत आंदोलकांच्या भेटीसाठी येत आहेत. काल पहाटेपासून तर रात्री उशीरापर्यंत अंतरवाली सराटीत राजकीय नेत्यांची ये-जा सुरू होती. (MNS) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, संभाजीराजे छत्रपती, छत्रपती उदयनराजे भोसले, शरद पवार, रावसाहेब दानवे, संदीपान भुमरे, अतुल सावे, उद्धव ठाकरे, अशोक चव्हाण, संजय राऊत, राजेश टोपे यांनी मनोज जरांगे व जखमी आंदोलकांच्या भेटी घेतल्या.

तर काही राजकीय नेत्यांनी आंदोलकांशी फोनवरून संवाद साधत त्यांना दिलासा दिला. संभाजीनगर दौऱ्यावर असलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनीही अंतरवाली सराटी येथे आंदोलकांची आणि जखमीची भेट घेत विचारपूस केली होती. (Maratha Reservation) यावेळी नांदगावकर यांनी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांचे थेट राज ठाकरे यांच्यांशी फोनवरून बोलणे करून दिले.

दोन-अडीच मिनिटे राज ठाकरे जरांगे यांच्याशी बोलत होते. काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी आहे, असा धीर राज ठाकरे यांनी या संभाषणात दिला होता. त्यानंतर आता उद्या सकाळी ८ वाजता राज ठाकरे थेट अंतरवाली सराटी येथे आंदोलकांच्या भेटीला येणार आहेत. संभाजीनगर येथे बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com