Beed Politics : पंकजा मुंडेंना मोठा धक्का : तब्बल 35 वर्षांपासून सोबत असलेला बडा नेता राष्ट्रवादीच्या वाटेवर; प्रकाश सोळंके ठरले वरचढ

Beed Politics : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का देत बीड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते राजाभाऊ मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
Pankaja Munde
Pankaja Munde Sarkarnama
Published on
Updated on

Rajabhau Munde : पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांना धक्का देत बीड जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष, भाजप नेते राजाभाऊ मुंडे हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांची भेट झाल्यानंतर राजाभाऊ मुंडे त्यांचे चिरंजीव बाबरी मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश निश्चित झाला.

राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्ह्यातील राजकारणातील बडे प्रस्थ म्हणून ओळखले जातात. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत ते जवळपास 35 वर्षे एकनिष्ठ होते. पण मागील काही दिवसांत जिल्ह्यातील बदलेलं राजकारण आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येते.

राजाभाऊ मुंडे यांचा वडवणी शहर आणि तालुक्याच्या आजूबाजूच्या भागावर मोठा होल्ड आहे. वडवणी नगरपंचायतीवर त्यांचे एकहाती वर्चस्व होते. पत्नी मंगल मुंडे या अनेक वर्षे नगराध्यक्ष होत्या. राजाभाऊ मुंडे यांचे चिरंजीव बाबरी मुंडे हेही भाजपमध्ये सक्रिय होते. पंकजा मुंडे यांच्यासोबत ते सावलीसारखे उभे राहिले. ते देखील बीड जिल्हा बँकेचे संचालक होते.

पण गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपासून बाबरी मुंडे हे पंकजा मुंडे यांच्यावर नाराज होते. ते भाजपकडून माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पण महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली. नाराज झालेल्या बाबरी यांनी अपक्ष निवडणूक लढवली. यात त्यांना जवळपास 18 हजार मते मिळाली. त्यावेळी बाबरी मुंडे हे पंकजा मुंडे यांची उभे केलेले उमेदवार आहेत, अशी चर्चा जिल्ह्यात होती.

हजारो कोटींच्या घोटाळ्याचे आरोप :

राजाभाऊ मुंडे यांच्यावर हजारो कोटांच्या घोटाळ्याचेही आरोप आहेत. 2007 मध्ये अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी तत्कालिन आमदार अमरसिंह पंडीत यांची निवड झाली होती. पुढच्या 2 वर्षांतच त्यांनी बँकेच्या ठेवी 1016 कोटी रुपयांपर्यंत वाढविल्या. बँक प्रचंड फायद्यात आणली. बँकेचा राज्यभर गौरव होऊ लागला. 2009-10 मध्ये मात्र गोपीनाथ मुंडे यांच्या आग्रहाखातर बँकेच्या चाव्या राजाभाऊ मुंडे यांच्या ताब्यात दिल्या. त्यांची अध्यक्षपदी निवड झाली.

Pankaja Munde
Beed Politic's : ‘सुंदरराव सोळंकेंनंतर गेली 45 वर्षे बीडच्या एकाही मराठा नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद किंवा पालकमंत्रिपद मिळाले नाही’

पण राजाभाऊ मुंडे यांची निवड होताच अवघ्या वर्षभरात बँक अडचणीत आली. तब्बल 850 कोटींचे बिगरशेती कर्जवाटप करण्यात आले. अस्तित्वात नसलेल्या संस्था आणि लोकांना कर्जवाटप झाल्याचे समोर आले. संचालक मंडळाच्या सभा झाल्याचे दाखवून, संचालकांना अंधारात ठेवून कर्जप्रकरणे मंजूर करण्यात आल्याचे विभागीय सहनिबंधकांनी (लेखा) केलेल्या विशेष तपासणीत समोर आले.

Pankaja Munde
Dhananjay Munde Beed caste conflict : 'संघर्षाला तयार! पण तो जातीपर्यंत, जिल्हा, आई-वडिल, मुला-बाळापर्यंत...'; धनंजय मुंडेंचा विरोधकांना सूचक इशारा

कार्यक्षेत्राबाहेरील संस्थांना कर्जवाटप झाल्याचेही समोर आले. यानंतर प्रकरण उच्च न्यायालयात गेले. राजाभाऊ मुंडे यांना अटक झाली. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. या घोटाळ्याचा आरोपांच्या दृष्टीनेही राजाभाऊ मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. पण या पक्षप्रवेशामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com