Maharashtra Assembly Election 2024 : गेल्या काही दिवसापासून राज्यात लैंगीक अत्याचारांच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. पुण्यात दोन अल्पवयीन मुलीवर स्कूल बस चालकाने लैंगीक अत्याचार केला. बदलापूर घटनेनंतर तब्बल बारा घटना राज्यात राज्यात घडल्या आहेत. गृहमंत्र्याकडून शुन्य अपेक्षा असून ते लेकीबाळीला अजिबात सुरक्षा देवू शकत नाही, अशा शब्दात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर टिका केली.
कोरोना काळात राजेश टोपे (Rajesh Tope) हे राज्याचे आरोग्यमंत्री म्हणून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून लढले, असे गौरवोद्दगारही अंधारे यांनी काढले. महाविकास आघाडीचे उमेदवार राजेश टोपे यांच्या प्रचारार्थ घनसावंगी येथे आयोजीत जाहीर सभेत सुषमा अंधारे यांनी महायुतीवर जोरदार टीकास्त्र सोडले. खासदार इमरान प्रतापगडी, उमेदवार राजेश टोपे, खासदार संजय जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयासमोर एक महिला येऊन तोडफोड करते तर मग प्रश्न उपस्थित होतोय की गृहमंत्र्याची सुरक्षा इतकी कमकुवत असेल तर इतर लोकांचे काय? हा प्रश्न निर्माण होतो. गृहमंत्री सुरक्षीत नसतील ते महाराष्ट्राच्या लेकीबाळीला सुरक्षा कोण देणार? मंत्र्यांच्या सुरक्षेबाबात हलगर्जीपणा असेल तर निश्चीत ही चिंतेची बाब आहे. सुरक्षा भेदून अशा प्रकारे व्यक्ती येते हे दुर्देव आहे.
फेसबुकला लाईव्ह करून गोळी बार करण्यात येतो. आमदार बाबा सिद्दीकी यांची दिवसा हत्या करण्यात येते. लाडक्या बहिणी योजनेतून दीड हजार रूपये दिले, बहिणीला दिलेल्या पैशांचे भावाकडून क्रेडिट घेतले जात नाही. (Mhavikas Aghadi) त्यामुळे तुम्ही केंड्रीट घेऊ नका, आपण कधी बहिणीला पैसे दिले म्हणून बॅनर लावलेत का? आपल्याला नात्यांची किमंत कळते, त्यांना बहिणीचे नाते कळत नाही, असा टोला अंधारे यांनी यावेळी महायुती सरकारला लगावला. या उलट त्यांनी बहिणीची थट्टा केली हे संस्कार नाही.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेद्र फडणवीस यांनी हिंदू, मुस्लीम यांच्यात जातीय व्देष पसरवत भांडणं लावल्याचे दिसून येत आहे. रोजगारांचे प्रश्न, नोकरभरतीसाठी चलनाव्दारे रक्कम वसुल करण्यात आली, मात्र परिक्षेच्या आधीच पेपर फुटतो. आतापर्यंत राज्यात 65 परिक्षांचे पेपर फुटले आहेत. असे अनेक प्रश्न लोकाकडून विचारले जातील आणि त्याचे उत्तर त्यांच्याकडे नाहीत. त्यामुळे हे असं राजकारण केले जात आहे.
शेतीमाला भाव नाही म्हणून ओरडणारे सरकारमध्ये बसल्यानंतर शेतीमालाच्या भावाविषयी बोलण्यास तयार नाही. हे सरकार अंबानी, अंदानी यांचे आहे. त्यामुळे गोरगरीबांचे काय? सरकारमध्ये सामील झालेल्या आमदारांची मागील पाच वर्षापूर्वीची मालमत्ता आता शंभरपटीने वाढली आहे, असा आरोप अंधारे यांनी आपल्या भाषणात केला.
मागील सरकारमध्ये आरोग्य मंत्री म्हणून आमदार राजेश टोपे यांनी चांगले उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. उमेदवार राजेश टोपे यांनी राज्यातील सरकार हे घटनाबाह्य सरकार असून, न्यायालयीन प्रकरणी सरकार वाचत असले तरी जनतेच्या न्यायालयात न्याय मिळणार असल्याने आम्ही जनतेच्या न्यायालयात आलो आहोत. आपण मतदान करून न्याय द्यावा, असे आवाहन केले. पक्षश्रेष्ठींनी मोठे केलेल्या माणसांनी गद्दारी केल्याची टीका त्यांनी केली. फुले, शाहू, आबेंडकर यांचा विचार जिवंत ठेवण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.