Rajesh Vitekar : निष्ठेचे फळ विटेकरांना आतातरी मिळणार, आमदारकीचा दिलेला शब्द अजितदादा पाळणार ?

Parbhani Political News : खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभेच्यावेळी राजेश विटेकरांना आपण आमदार करणार असल्याचे जाहीर सभेत घोषित केले होते.
Rajesh Vitekar : निष्ठेचे फळ विटेकरांना आतातरी मिळणार, आमदारकीचा दिलेला शब्द  अजितदादा पाळणार ?

Parbhani News: लोकसभेच्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राजेश विटेकरांनी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवली होती. यंदाही त्यांनी मतदारसंघात जोरदार तयारी सुरू केली होती. पण ऐनवेळी महायुतीत ही जागा राष्ट्रीय समाज पक्षाच्या महादेव जानकरांच्या वाट्याला आली अन् विटेकरांना माघार घ्यावी लागली. पण खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी लोकसभेच्यावेळी राजेश विटेकरांना आपण आमदार करणार असल्याचे जाहीर सभेत घोषित केले होते.

विधान परिषदेसाठी येत्या 12 जुलैला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी परभणीतून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर हे इच्छुक आहेत. ते उमेदवारी अर्ज भरण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे विटेकरांच्या निष्ठेचे फळ आता त्यांना मिळणार का ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या माध्यमातून राजेश विटेकर (Rajesh Vitekar) हे जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागात परिचित आहेत. मूळचे सोनपेठ तालुक्यातील राजेश विटेकर यांनी यापूर्वी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती. विद्यमान खासदार संजय जाधव यांना त्यांनी तगडी टक्कर दिली होती. त्यानंतर राजेश विटेकर काही काळ पक्षात कार्यरत राहिले. पक्ष कार्य करताना त्यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा बाळगली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर भविष्याची चिंता लागलेल्या राजेश विटेकरांनी भविष्याचे वेध ओळखून अजित पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय जाहिर केला.

कारण लोकसभा निवडणूक तोंडावरच होती. अशावेळी भाजप सोबत जाणारे अजित पवार गटाला परभणीतून निश्चित उमेदवारी मिळणार हे पक्के होते. त्यामुळे राजेश विटेकरांना वारंवार वरिष्ठ पातळीवरून तयारीला लागा असे संदेशही प्राप्त होत होते. परंतू ऐनवेळी राष्ट्रवादी कॉग्रेसच्या कोट्यातील ही जागा एनडीएचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाला सोडण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाला. महादेव जानकर यांना या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळाली. त्यामुळे राजेश विटेकरांची संधी थोडक्यावरून हुकली.

Rajesh Vitekar : निष्ठेचे फळ विटेकरांना आतातरी मिळणार, आमदारकीचा दिलेला शब्द  अजितदादा पाळणार ?
Sanjay Raut : राऊतांनी राजकारणात आणला ट्विस्ट; म्हणाले, ...तर भुजबळ 'मुख्यमंत्री'पदाचा टिळा लावूनच बाहेर पडले असते!

परंतु, पक्षश्रेष्ठींशी एकनिष्ठ राहणारे राजेश विटेकर यांना महादेव जानकर यांचे काम करण्याचे आदेश मिळाले. पक्षादेश सर्वस्व मानून त्यांनी जानकर यांचे काम पहिल्यापासूनच सुरु केले. जानकर यांचा उमेदवारी अर्ज सादर करतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश विटेकर यांचा त्याग वाया जाणार नाही असे म्हणत त्यांना विधानभवनात घेऊन जाणार असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे आता विधान परिषदेच्या निवडणुकांची घोषणा झाली आहे. त्यामुळे आता राजेश विटेकरांना निष्ठेचे फळ मिळण्याची वेळ आली आहे.

Rajesh Vitekar : निष्ठेचे फळ विटेकरांना आतातरी मिळणार, आमदारकीचा दिलेला शब्द  अजितदादा पाळणार ?
Rupali Patil : तब्बल 350 दिवसांनंतर अजितदादांच्या फायरब्रँड नेत्या रुपाली पाटलांनी डागली भाजपवर तोफ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com