

Assembly Session 2026 News : हिंगोली जिल्ह्यातील वसमत विधानसभा मतदारसंघातील शेतकर्यांसाठी महत्वाची ठरणारी सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजनेला अखेर मान्यता देण्यात आली आहे. या योजनेमुळे 40 गावातील 4 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान आमदार राजू नवघरे यांनी योजनेला मान्यता मिळताच आनंद व्यक्त करतानाच माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा, जयप्रकाश दांडेगावकर यांच्यावर निशाणा साधला.
या दोन्ही नेत्यांनी केवळ निवडणुकीत अश्वासन देत मतदारांची दिशाभुल केली. त्यांना जे जमलं नाही, ते आपण करून दाखवले, असा दावा आमदार राजू नवघरे यांनी केला आहे. हिंगोली जिल्हा हा राज्यपाल सिंचन अनुशेषात मोडतो. हा अनुशेष दूर करण्यासाठी व वसमत विधानसभा मतदारसंघातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करत होतो. सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना पूर्ण झाली तर 40 गावातील 4 हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.
त्यासोबतच 30 गावच्या पिण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. आमदार राजु नवघरे यांनी या योजनेसाठी दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा केला. अनेक बैठका मंत्रालयात या विषयावर पार पडल्या होत्या. हिंगोली जिल्ह्यात सिंचन क्षेत्र वाढले पाहीजे यासाठी स्वत: अजित पवार हे अग्रही होते. त्यामुळेच योजनेला गती दिली होती. योजना अखेरच्या टप्यात असताना अजित पवारांचे निधन झाले आणि हा प्रस्ताव मागे पडला.
जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला नवघरे हे हजर होते. अखेर बुधवारी याबाबत आदेश निघाला. या योजनेला मंजुरी मिळाल्याने वसमत मतदार संघातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर आता सर्वेक्षणाला सुरूवात होणार आहे. वसमत विधानसभा मतदारसंघातील पांगरा शिंदे, अंबा, शिरडशहापूर, पुरजळ या सर्कलमधील गावे या योजनेमुळे सिंचनाखाली येणार असून 4 हजार हेक्टर सिंचन क्षेत्र आता पाण्याखाली येणार आहे.
उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळताच आमदार नवघरे यांनी आनंद व्यक्त केला. ज्यांनी मला दोनदा आमदार केले, वसमत मतदार संघातील कोणत्याही कामाला तात्काळ मंजुरी दिली. विशेष सिंचनाच्या कामासाठी अजितदादा नेहमी आग्रही असायचे त्यांनीच सिद्धेश्वर उपसा योजनेला गती दिली. आज दादा असते तर त्यांनी मला सगळ्यासमोर राजू तुझं काम झालं, असे म्हणत ही योजना केवळ तुझ्यामुळेच मार्गी लागली. एवढा पाठपुरावा कोणी केला नसता, अशा शब्दात कौतुकही केले असते, अशी भावनिक प्रतिक्रिया दिली.
वसमत तालुक्यातील 25 च्या वर आणि औंढा तालुक्यातील 15 गावांमधील मोठे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पांमुळे मतदारसंघातील सिंचन क्षमतेत मोठी वाढ होणार असून, शेतकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडेल. याआधी अजितदादांनी पुर्णा नदीवरील अनखळी पोटा, पिंपळगाव कुटे, परळी दथरथे या मोठ्या बंधाऱ्यांना मराठवाड्याच्या संभाजीनगर येथील कॅबिनेटमध्ये मंजुरी दिली होती. त्याची कामे प्रगतीपथावर आहेत. अजितदादांचे उपकार हिंगोली जिल्हा कधीही विसरणार नाही, असेही राजू नवघरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.