Raju Shetti On Farmers issue : अकरावेळा अर्थसंकल्प मांडणाऱ्या अजित पवारांना कर्जमाफीचं आश्वासन देताना आर्थिक स्थिती माहित नव्हती का ?

Farmer leader Raju Shetti criticizes Deputy CM Ajit Pawar, questioning whether he was unaware of the state's financial condition when promising loan waivers during elections. : ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अर्धवट एफआरपी देण्यात मराठवाड्यातील कारखानदार आघाडीवर, पण रक्कम व्याजासह वसूल करू.
Raju Shetti On Ajit Pawar News
Raju Shetti On Ajit Pawar NewsSarkarnama
Published on
Updated on

Jalna News : राज्याचे अर्थमंत्री अजित पवार आपण अकरा वेळा अर्थसंकल्प मांडल्याचे मोठ्या दिमाखात सांगतात. मग विधानसभा निवडणुकीआधी प्रचार करतांना शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही, तर पवारांचं नाव सांगणार नाही म्हणणाऱ्यांना तेव्हा राज्याची आर्थिक परिस्थिती माहीत नव्हती का? असा टोला स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अजित पवारांना लगावला.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अर्धवट एफआरपी देण्यात मराठवाड्यातील कारखानदार आघाडीवर आहेत. पण आम्ही त्यांच्याकडून एफआरपीची रक्कम व्याजासह वसूल करू असा, इशारा देतानाच ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी मराठवाड्यात लवकरच शेतकरी मेळावे घेणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. (Raju Shetti) राजू शेट्टी चार दिवसापासून मराठवाडा- विदर्भ दौऱ्यावर आहेत. स्वाभिमानीचे जालना जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या निवासस्थानी शेट्टी यांनी आज भेट दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

ज्यांनी अर्धवट एफआरपी दिलेली आहे त्यांच्याकडील उर्वरित रक्कम व्याजासह मिळाली पाहिजे असा आमचा आग्रह आहे. यामध्ये मराठवाड्यातील कारखाने आघाडीवर आहेत. (Ajit Pawar) त्यामुळे मराठवाड्यात मोठे दोन-तीन शेतकरी मेळावे घेऊन याविषयी ऊस उत्पादकांना जागृत केले जाईल. उर्वरित एफआरपीची रक्कम व्याजासह वसूल केल्याशिवाय आपण मराठवाड्यातील साखर कारखानदारांना सोडणार नसल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

Raju Shetti On Ajit Pawar News
Raju Shetti : राजू शेट्टींची अजितदादांवर जहरी टीका; म्हणाले, ‘16 मिनिटे एसी बंद पडल्याचा गड्याला एवढा राग का?, लाज वाटली पाहिजे तुम्हाला....’

गेल्या महिन्यात मुंबई उच्च न्यायालयाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरकमी विना कपात एफाआरपी देण्याचा आदेश दिला आहे. राज्य शासनाचा 2022 चा निर्णय रद्द केला. त्यामुळे ज्या साखर कारखान्यानी आतापर्यंत एकरकमी एफआरपी दिलेली नाही, त्यांच्यावर साखर आयुक्तांकडे पाठपुरावा करून आरआरसीची कारवाई करायला लावीलच, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.

Raju Shetti On Ajit Pawar News
Farmer Organization Warning : फडणवीसांवर 'या' कारणानं भरवसा नाय, '2016-17'ची कटू आठवण; आंबेडकर जयंतीपासून शेतकरी संघटनेचा मोठा निर्णय

कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शेतकरीविरोधी वक्तव्याचाही शेट्टी यांनी आपल्या शैलीत समाचार घेतला. माणिकराव कोकाटेंसारख्या बोलभांड आणि बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात ठेवू नये. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समज दिल्यानंतरही त्यांचे बेताल वक्तव्य थांबले नाही. कोकाटे यांनी केंद्रात जाऊन जे आयात शुल्क आता शून्य टक्यावर आणलं ते जर दोन महिन्यापूर्वी आणला असतं तर संपूर्ण कांदा जगाच्या बाजारामध्ये विकला गेला असता.

Raju Shetti On Ajit Pawar News
Ajit Pawar Vs Shivsena : एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारावरून शिवसेना-अजितदादांमध्ये संघर्षाची ठिणगी

कांद्याचे उत्पादन जास्त झाले म्हणून कांदा उत्पादकांवर संकट आले असे नाही. कोकाटेनी ते समजून घ्यायला हव होत. स्वतःलाही जमत नाही आणि केंद्रालाही जाब विचारण्याची हिंमत यांच्यात नाही, असा टोला त्यांनी कृषी मंत्री कोकाटे यांना लगावला. शेतकऱ्यांना शहाणपना शिकवण्यापेक्षा माणिकराव कोकाटे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकलं पाहिजे, याचा पुनरुच्चारही शेट्टी यांनी केला.

Raju Shetti On Ajit Pawar News
Raju Shetti : राज्यकर्ते, औरंगजेबापेक्षाही क्रूर, राजू शेट्टींनी काढले महायुती सरकारचे वाभाडे...

शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी हे सरकारने दिलेला आश्वासन होतं. अजित पवार आता म्हणतात, की कर्जमाफीसाठी राज्याची आर्थिक स्थिती ठीक नाही. सलग 11 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अजित पवारांना निवडणुकीत आश्वासन देताना त्याची जाणीव नव्हती का? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com