Raju Shetti : राज्यकर्ते, औरंगजेबापेक्षाही क्रूर, राजू शेट्टींनी काढले महायुती सरकारचे वाभाडे...

Raju Shetty criticizes state government : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला होता.
devendra fadnavis, raju shetti
devendra fadnavis, raju shettiSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 20 Mar : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची औरंगजेबाशी तुलना केल्यानंतर राजकीय वातावरण तापले होते. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात संताप व्यक्त केला होता.

प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरत असतानाच आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी देखील राज्यकर्त्यांवर आसूड ओढला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीवरून बोलताना शेट्टींनी राज्य सरकारवर ताशेरे ओढत औरंगजेबापेक्षाही क्रूर राज्यकर्ते असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे.

devendra fadnavis, raju shetti
Kolhapur Bribe Case : तहसीलदार कार्यालयात जमीनी संदर्भातील काम होईना म्हणून RTI कार्यकर्त्याची मदत घेतली अन् त्यानेच घात केला, तब्बल 5 लाखांची...

यावेळी राजू शेट्टी म्हणाले, महाराष्ट्रातील पहिले शेतकरी साहेबराव करपे यांनी आत्महत्या केली. त्यांचा 19 मार्च हा स्मृतीदिन आहे. इतके परिश्रम करूनही करपे हे कधीच कर्जबाजारीपणातून बाहेर पडू शकले नाहीत. त्यामुळे वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमात जाऊन दर्शन घेऊन त्यांनी कुटुंबासमवेत आत्महत्या केली.

स्वतःला कृषीप्रधान देश म्हणूनवून घेणाऱ्या देशात गेल्या पाच वर्षात 15 हजार 824 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. अशा दाहक वास्तवापेक्षा या राज्यकर्त्यांना आणि राजकीय पक्षांना औरंगजेबाची कबर, आका-खोक्या आणि बोक्या यांच्यामध्ये रस आहे, असा सणसणीत टोला राजू शेट्टी यांनी लगावला.

devendra fadnavis, raju shetti
Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्यन खानला अटक करणाऱ्या अधिकाऱ्याला प्रतिवादी करण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, असं छत्रपती शिवाजी महाराजांचे धोरण होतं. पण आत्ताचे राजकर्ते हे शेतकरी (Farmer) विरोधातील धोरण राबवत आहेत. सरकारच्या दळभद्री धोरणामुळेच महाराष्ट्रात शेतकऱ्यांची स्मशानभूमी झाली आहे. जरा तरी राज्य सरकारने लाज बाळगावी. नाहीतर येणारी पिढी आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या कवट्यांचा हार घालून तुम्हाला जोड्याने हाणल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशा शब्दात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com