शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पंधरा रुपयांवर सरकार दरोडा घालत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.
सरकार ऊस दरात कपात करून शेतकऱ्यांचा हक्क हिरावून घेत असल्याचा शेट्टींचा आरोप आहे.
या वक्तव्यामुळे साखर उद्योग आणि महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापले आहे.
दिलीप दखने
Sugarcane Farmers News : मराठवाडा व राज्यातील अतिवृष्टी, महापूराच्या पार्श्वभूमीवर मदतीच्या नावाखाली राज्य सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर दरोडा टाकणे सुरू आहे. प्रतिटन 15 रुपये कपातीचा निर्णय हा सरकारने अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांना खूष करण्यासाठी घेतला आहे. हे सरकार कारखानाधार्जिने असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला.
शनिवार ता.4 रोजी सकाळी अंबड तालुक्यातील वडिगोद्री, साष्ट पिंपळगाव,नाथवस्ती, विज्ञानेश्वर आपेगाव या गोदावरी नदीच्या महापुराने बाधित गावांना राजू शेटी यांनी भेटी दिल्या. अतिवृष्टी बाधित खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली व शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी (Affected Farmers) संघटना मोठे आंदोलन उभारणार असल्याचे सांगीतले.
मराठवाड्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, अतिवृष्टीने शेतातील पीकांचे नुकसान झाले, नदी नाल्यांना पुर आल्याने पीकं, पशुधन,अन्न धांन्याचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टी मुळे शेतकरी संकटात असताना शासनाने त्वरित कर्जमाफी करून मदत करावी, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नये, अशी मागणीही राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी केली.
शेतकऱ्यांच्या ऊसातुन होणारी कपात त्वरित थांबवा. शासनाने टप्पाटप्पाने 1 रुपयावरुन आता थेट 15 रुपये पुरग्रस्तांना मदतीच्या नावाखाली कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी स्वतः खिशात 10 रुपये ठेवून सरकारने दलाली सुरू केल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. इतर योजनांसाठीची कपात धरून शेतकऱ्यांकडून 27 रुपये कपात होत असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारच्या या जीआर विरोधात राज्यभरात 5 आॅक्टोबर रोजी आंदोलन आणि त्यात जीआरची होळी करणार असल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या ऊसाच्या पैशात टनामागे 15 रुपयांची कपात म्हणजे चक्क दरोडा आहे. हे आम्हाला मान्य नाही, कारण हे सरकार कारखानाधार्जिने झाले आहे. वास्तविक पाहता अतिवृष्टीमुळे ऊस उत्पादन एकरी 10 ते 12 टनांनी घटले आहे. हे सरकारला माहित आहे, ऊस उत्पादक शेतकरीही अतिवृष्टीबाधित आहेत. तरीही टनामागे 15 रुपयांचा दरोडा ऊस उत्पादकांवर पडत आहे. मंत्री समितीत बसलेले अजित पवार, राधाकृष्ण विखे- पाटील यांना खूष करण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचा थेट आरोप राजु शेट्टी यांनी केला.
कापूस,तूर,सोयाबीन,मूग,मक्का व बाजरी या खरीप पिकांसह डाळिंब,मोसंबी,द्राक्ष फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याने आत्महत्येच्या गर्तेत अडकला आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून संपूर्ण कर्जमाफी करण्याची आमची मागणी आहे. यासाठी आम्ही मोठे आंदोलनही उभारू, असा इशारा शेट्टी यांनी यावेळी दिला.
1. राजू शेट्टी यांनी कोणावर आरोप केले आहेत?
👉 त्यांनी अजित पवार आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ऊस शेतकऱ्यांच्या पैशांवर सरकारने दरोडा घातल्याचा आरोप केला आहे.
2. हा आरोप कशाबद्दल आहे?
👉 ऊस दरात पंधरा रुपयांची कपात करून शेतकऱ्यांचे नुकसान केल्याबद्दल हा आरोप आहे.
3. सरकारने यावर प्रतिक्रिया दिली आहे का?
👉 अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
4. या प्रकरणाचा परिणाम काय होऊ शकतो?
👉 ऊस उत्पादक शेतकरी आंदोलनाच्या तयारीत असून, साखर उद्योगावर परिणाम होऊ शकतो.
5. राजू शेट्टी सध्या कोणत्या संघटनेचे नेते आहेत?
👉 ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि प्रमुख नेते आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.