Ambadas Danve On Mahayuti News : पुढील निवडणुका येईपर्यंत महाराष्ट्रात एप्रिल फूल उत्सव सुरूच राहणार! अंबादास दानवेंची खोचक टीका

Ambadas Danve slams the Mahayuti government while stating that the April Fool festival celebrations in Maharashtra will continue as planned. : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्याकडून शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी अशा सर्वच घटकातील लोकांकडून अक्षरश: आश्वासनाचा पाऊस पाडला होता.
Ambadas Danve | eknath shinde | devendra fadnavis
Ambadas Danve | eknath shinde | devendra fadnavisSarkarnama
Published on
Updated on

Shiv sena UBT News : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज एक एप्रिलच्या निमित्ताने राज्यातील महायुती सरकारला टोला लगावला आहे. गेल्या तीन महिन्यापासून महाराष्ट्रातील जनतेला सरकारकडून एप्रिल फूल बनवण्यात येत असल्याचा अनुभव आला आहे. जगात सर्वत्र एप्रिल फूल केवळ एकाच दिवशी साजरा होतो. महाराष्ट्र मात्र गेल्या तीन महिन्यांपासून याचा अनुभव घेतो आहे. पुढील निवडणूक येईपर्यंत महाराष्ट्रात 'एप्रिल फूल उत्सव' सुरूच राहणार आहे, अशा शब्दात दानवे यांनी सरकारवर टीका केली.

विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्याकडून शेतकरी, महिला, तरुण, विद्यार्थी अशा सर्वच घटकातील लोकांकडून अक्षरश: आश्वासनाचा पाऊस पाडला होता. (Mahayuti) लाडक्या बहीणींना 2100 रूपये, शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेत मालाला हमीभाव, तरुणांच्या हाताला रोजगार वगैरे. या आश्वासनामुळे मतदारांनी महायुतीवर मतांचा पाऊस पाडला. 232 आमदारांसह बहुमताची सत्ता दिली. पण निवडणुका झाल्या आणि सत्ताधाऱ्यांना निवडणुकीपूर्वी दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला.

नुकतेच विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले. पण यात ना लाडक्या बहीणींना 2100 रुपये देण्याचा शब्द होता, ना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी तरतूद. उलट जे नेते निवडणुकीआधी जाहीर सभांमधून ही आश्वासनं देत होते तेच आता हे शक्य नाही, राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, असे सांगत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, (Devendra Fadnavis) ,उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यात आघाडीवर आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मात्र सूर काहीसा वेगळा आहे.

Ambadas Danve | eknath shinde | devendra fadnavis
Ambadas Danve News : औरंगजेबाचा द्वेष नक्कीच करा, पण इतर धर्माचा आदरही करा! अंबादास दानवेंचे आवाहन

मात्र त्यांची दखल सध्या फडणवीस, अजित पवार यांच्याकडून फारशी घेतली जात नसल्याचे दिसते. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते तथा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एप्रिल फूल निमित्ताने प्रसिद्ध झालेल्या एका व्यंगचित्राचा आधार घेत सरकारवर खरमरीत टीका केली आहे. 'एक्स'वर पोस्ट करत दानवे यांनी सरकारला टोला लगावताना महाराष्ट्रात पुढील निवडणूक येईपर्यंत एप्रिल फूल उत्सव सुरूच राहील असे म्हटले आहे.

Ambadas Danve | eknath shinde | devendra fadnavis
Mahayuti Government Decision: लाडक्या बहिणींच्या 2100 साठी आखडता हात; पण महायुती सरकारचं सर्वसामान्यांसाठी 'हे' मोठं गिफ्ट

जगात सर्वत्र एप्रिल फूल केवळ एकाच दिवशी साजरा होतो. महाराष्ट्र मात्र गेल्या तीन महिन्यांपासून याचा अनुभव घेतो आहे. पुढील निवडणूक येईपर्यंत महाराष्ट्रात 'एप्रिल फूल उत्सव' सुरूच राहणार आहे, अशा शब्दात दानवे यांनी सरकारला डिवचले. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारवर राज्यातील कायदा व सुव्यवस्था, शेतकरी आत्महत्या सारख्या विषयावरून तुटून पडणाऱ्या अंबादास दानवे यांनी एप्रिल फूलच्या दिवशी केलेल्या या टीकेची चांगलीच चर्चा होत आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com