Vasant More : वंचितला 'मनसे' निरोप देत 18 वर्षानंतर तात्या पुन्हा शिवसेनेतून डरकाळी फोडणार

Vasant More Political Career : तब्बल 18 वर्षांनी पुन्हा शिवसेनेत जाणाऱ्या वसंत मोरे यांचा राजकीय प्रवास कसा राहिला?
Vasant More
Vasant MoreSarkarnama

Pune News : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी नव्या पक्षाची स्थापना केली. त्यावेळी शिवसेनेतील अनेक नेते राज ठाकरे यांच्यासोबत नव्या पक्षात सहभागी झाले.

त्यावेळी पुण्यातून वसंत मोरे यांनी देखील शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करून मनसेत प्रवेश केला. त्यापूर्वी ते तब्बल पाच वर्ष शिवसेनेमध्ये सक्रिय होते.

अठरा वर्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत राहिल्यानंतर वसंत मोरे आत व्हाया वंचित आघाडी पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करत आहेत. काही दिवसांपूर्वी मोरेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांच्या पक्षप्रवेशाला 'ग्रीन' सिग्नल मिळाला.

मात्र, तब्बल 18 वर्षांनी पुन्हा शिवसेनेत जाणाऱ्या वसंत मोरे (Vasant More) यांचा राजकीय प्रवास कसा राहिला? याबाबत सध्या चर्चा सुरू आहे. 2006 ला राज ठाकरे यांच्यासोबत गेल्यानंतर 2007 ला झालेल्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये वसंत मोरे नगरसेवक म्हणून निवडून आले.

त्यानंतर पुन्हा एकदा 2012 मध्ये देखील ते नगरसेवक म्हणून निवडून आले. यावेळी सभागृहातील मनसेच्या नगरसेवकांची संख्या ही चांगलीच वाढली होती. त्यामुळे वसंत मोरे यांच्या गळ्यात विरोधी पक्षनेते पदाची माळ पडली.

2017 मध्ये वसंत मोरे यांनी पुणे महापालिकेत आपली विजयी पताका फडकवत पुन्हा एकदा नगरसेवकपदाची निवडणूक जिंकली. यावेळी मनसेचे अवघे दोन नगरसेवक निवडून आले. यावेळी वसंत मोरे यांना मनसेचे गटनेते करण्यात आलं.

नगरसेवक पदाच्या कार्यकाळात त्यांनी स्थायी समितीचे सदस्य पद, स्मार्ट सिटी सदस्य अशा पदांवर काम केलं. 2021 मध्ये राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना बोलवून पुणे शहराध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात घातली.

त्यानंतर राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यावरून आक्रमक भूमिका घेतली होती. यावेळी वसंत मोरे यांनी पक्षविरोधी भूमिका घेतल्यानं त्यांना शहराध्यक्षपद सोडावं लागलं होतं. त्यासह पक्षांअंतर्गत विरोधाला मोरे यांना सामोरं जावं लागलं. सातत्यानं ते आपली नाराजी बोलावून दाखवत होते.

Vasant More
Mahadev Babar : ठाकरेंचे माजी आमदार महादेव बाबर पवारसाहेबांना भेटले आणि काय म्हणाले?

त्याचदरम्यान मनसेकडून लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा मोरे यांनी व्यक्त केली होती. पण, तिकिट मिळणार नाही आणि राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना दिल्लीला गेलेलं पाहायला आवडेल, असं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे नाराज झालेल्या वसंत मोरे यांनी अखेर मनसेला 12 मार्च 2024 मध्ये 'राम-राम' ठोकला.

यानंतर मोरेंनी शिवसेना (ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) काँग्रेसकडून पुणे लोकसभेची उमेदवारी मिळते का? याची चाचपणी केली. मात्र, त्यांच्या हाताला यश न लागल्याने अखेर त्यांनी वंचितसोबत जाणं पसंत केलं. वंचितसोबत राहून निवडणूक लढवल्यानंतर वसंत मोरे यांना मोठे अपयश आलं. लोकसभा निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम देखील जप्त झाली.

Vasant More
Prakash Ambedkar On Vasant More : अवघ्या 60 दिवसांतच 'वंचित'ला सोडलेल्या वसंत मोरेंची आंबेडकरांनी घेतली झाडाझडती

निवडणुकीनंतर त्यांनी आयुष्याच्या शेवटपर्यंत वंचितसोबत राहणार असल्याची आणाभाका घेतली होती. मात्र, अवघ्या 60 दिवसातच वंचितला देखील 'गुडबाय' करत पुन्हा एकदा शिवसेनेचा ( ठाकरे गट ) रस्ता मोरे यांनी पकडला आहे.

लोकसभा निवडणुकीमध्ये पराभव मिळाला असला तरी विधानसभा निवडणूक लढवून जिंकण्याचा निर्धार आता वसंत मोरे यांनी केला आहे. यासाठी ते उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये सामील होत असल्याचं बोललं जात आहे.

खडकवासला विधानसभा मतदारसंघ अथवा हडपसर विधानसभा मतदारसंघ हे दोन्ही पर्याय त्यांना निवडणूक लढवण्यासाठी खुले आहेत. यातील जी जागा उद्धव ठाकरे यांच्याकडे जाईल, त्या जागेवरून वसंत मोरे महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात.

(Edited By : Akshay Sabale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com