Dr Ajeet Gopchade
Dr Ajeet Gopchade Sarkarnama

Rajya Sabha Election 2024: भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी जाहीर झालेले डॉ.अजित गोपछडे कोण आहेत ?

Dr Ajeet Gopchade : भाजपने अजित गोपछडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.
Published on

Political News: भाजपने राज्यसभेसाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी आमदार मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राज्यसभेच्या जागांसाठी 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. यामध्ये राज्यातील सहा जागांचा समावेश आहे.

भाजपने अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षात डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. (Rajya Sabha Election 2024)

नांदेडमध्ये लोकसभा आणि नांदेड तसेच नायगाव विधानसभेसाठी डॉ.गोपछडे हे नेहमीच चर्चेत राहिले होते. त्यांना अखेर पक्षनिष्ठेचे फळ मिळाले आहे. डॉ.गोपछडे यांचे मूळ गाव कोल्हे बोरगाव (ता.बिलोली) हे आहे. त्यांचे वडील प्रा.माधवराव गोपछडे तर काका प्राचार्य गोविंदराव गोपछडे आहेत.

गोपछडे कुटुंब नेहमीच सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात अग्रेसर असते. डॉ.गोपछडे यांचे बारावीचे शिक्षण नांदेडला यशवंत महाविद्यालयात झालेले आहे. त्यानंतर त्यांनी एमबीबीएस औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तर पदव्युत्तर शिक्षण (बालरोगतज्ज्ञ) अंबेजोगाई (जि.बीड) येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झालेले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr Ajeet Gopchade
Rajya Sabha Election 2024 : मिलिंद देवरा यांना शिवसेनेकडून राज्यसभेची उमेदवारी

महाविद्यालयात असताना त्यांनी मार्डच्या चळवळीचे नेतृत्व केले होते. त्याचबरोबर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे तसेच नितीन गडकरी यांच्या संपर्कातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतही त्यांनी काम केले. त्यानंतर नांदेडला आल्यावर त्यांनी अमृतपथ बालरुग्णालय सुरु केले. पत्नी डॉ. चेतना गोपछडे या देखील स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. नांदेडला सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या डॉ.गोपछडे यांनी अनेक उपक्रम राबवले. त्याचबरोबर गुरुगोविंदसिंघजी रक्तपेढी सुरु करण्यात त्यांचा मोठा वाटा होता.

भाजपच्या डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष

भाजपच्या डॉक्टर सेलचे गोपछडे प्रदेशाध्यक्ष आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र आरोग्य विद्यापाठीचे ते संचालक देखील आहेत. नांदेड लोकसभा आणि नांदेड विधानसभेसाठी भाजपकडून त्यांचे नाव कायम अग्रेसर असायचे. मात्र, नंतर लिंगायत आणि मराठा कार्डचा विषय आला की, त्यांचे नाव मागे पडायचे. गेल्या लोकसभा निवडणुकीत परभणी लोकसभा मतदारसंघाचे त्यांना प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. आता अखेर त्यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळाली आहे.

डॉ.गोपछडे हे सुरवातीपासूनच भाजपमध्ये एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडवणीस यांच्यासोबत काम करताना महाराष्ट्रात डॉक्टरांचे संघटन मजबूत केले. तसेच या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कामे केली. नांदेडला भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर आहेत.

तसेच जिल्ह्यात भाजपचे राजेश पवार (नायगाव), भीमराव केराम (किनवट), डॉ.तुषार राठोड (मुखेड) हे तीन आमदार आहेत. त्याचबरोबर मागील वेळेस विधानपरिषदेवर भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांना संधी देण्यात आली. त्यामुळे चार आमदार आणि एक खासदार असलेल्या नांदेड जिल्ह्यात आता डॉ.गोपछडे आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या माध्यमातून आणखी दोन खासदाराची भर पडणार आहे.

(Edited By-Ganesh Thombare)

Dr Ajeet Gopchade
Rajya Sabha Election 2024 : राज्यसभेसाठी भाजपची अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडेंना उमेदवारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com