Ramai Awas Scam : एकनाथ शिंदेंचे पिवळे रेशन कार्ड, फडणवीस अनुसूचित जातीमध्ये; रमाई अवास योजनेत घोटाळा,जलील यांनी थेट पुरावेच दाखवले

Ramai Awas Yojana Scam Imtiaz Jaleel : अनुसूचित जातींसाठी राबवण्यात येणाऱ्या 'रमाई घरकूल योजना'अंतर्गत मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे.
Imtiaz Jaleel allegation on yellow ration card scheme scam Eknath Shinde Devendra fadanvis
Imtiaz Jaleel allegation on yellow ration card scheme scam Eknath Shinde Devendra fadanvissarkarnama
Published on
Updated on

Aimim News : छत्रपती संभाजीनगरमध्ये दलित समाजासाठी असलेल्या 'रमाई अवास' योजनेत घोटाळा झाल्याचा दावा करत इम्तियाज जलील यांनी खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे बोगस रेशन कार्ड, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावे बनावट पिवळे रेशन कार्ड तयार केल्याचेही त्यांनी समोर आणले.

भाजपा नेते तथा ओबीसी मंत्री अतुल सावे यांच्या आदेशाने हा घोटाळा झाल्याचा आरोप देखील जलील यांनी केली आहे.

महापालिकेतील अधिकाऱ्यांच्या गैरकारभारा संदर्भात मोठा धमाका करण्याचा इशारा इम्तियाज जलील यांनी दिला होता. त्यानूसार गुरूवारी इम्तियाज यांनी पत्रकार परिषद घेत रमाई अवास योजनेतील गैरकारभाराचा पर्दाफाश केला. या घोटाळ्या संदर्भातील पुरावे सादर करताना त्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तयार करण्यात आलेल्या बनावट रेशन व आधार कार्डच दाखवले.

अनुसूचित जातींसाठी राबवण्यात येणाऱ्या 'रमाई घरकूल योजना'अंतर्गत मोठा आर्थिक घोटाळा होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. या प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या नावानेही बनावट रेशनकार्ड तयार करणे किती सोपे आहे, याची कल्पना करा, असा दावा करताना रेशन कार्ड, उत्पनाचा दाखला, आधार कार्डसह इतर कागदपत्रेच इम्तियाज जलील यांनी समोर आणली.

Imtiaz Jaleel allegation on yellow ration card scheme scam Eknath Shinde Devendra fadanvis
Devendra Fadnavis : '...तर मीसुद्धा बिनडोक ठरेन'; फडणवीसांचा टोला, नेमकं प्रकरण काय?

रमाई घरकुल योजनेअंतर्गत अनुसूचित जातीतील गरजू कुटुंबांना घर बांधण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत दिली जाते. मात्र छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या कार्यक्षेत्रात या योजनेच्या निधीचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट कागदपत्रे तयार करून लाभार्थी दाखवले जात असून, त्या आधारे कोट्यवधी रूपयांचा निधी काढण्यात आल्याचा दावा करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी इम्तियाज जलील यांनी केली.

चौकशीची मागणी

या प्रकरणात अनुसूचित जाती समाजातील काही स्वयंघोषित नेते, समाज कल्याण विभागातील काही कर्मचारी तसेच महापालिकेतील अधिकार्‍यांचे संगनमत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. बनावट रेशनकार्ड आणि इतर कागदपत्रांच्या आधारे लाभार्थी दाखवून निधी वळवला गेला. पोलीस महासंचालक तसेच संबंधित अधिकार्‍यांकडे चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

Imtiaz Jaleel allegation on yellow ration card scheme scam Eknath Shinde Devendra fadanvis
Eknath Shinde : उन्मेश पाटील पुन्हा जळगावचे खासदार ; एकनाथ शिंदेंच्या एका विधानाने भाजपमध्ये खळबळ

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com