Abdul Sattar With Danve : `रामकृष्ण` सिंचन योजनेवरून सूर जुळले; दानवेंच्या मागणीला सत्तारांचा होकार...

ADCC Bank News : दहा दिवसांत संचालक मंडळाची सहकारमंत्र्यांसोबत बैठक लावत आगामी कॅबिनेट बैठकीतदेखील विषय मांडणार.
Ambadas Danve-Abdul Sattar News, Aurangabad
Ambadas Danve-Abdul Sattar News, AurangabadSarkarnama

Aurangabad Political News : वैजापूर तालुक्यातील महत्त्वाकांक्षी रामकृष्ण उपसा जलसिंचन योजना निधीअभावी बंद आहे. या योजनेला पुनरुज्जीवन देण्याची मागणी सातत्याने होते. (ADCC Bank News) या योजनेसाठी निधीची घोषणा केली जाते, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या आज झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हा मुद्दा उपस्थितीत केला.

Ambadas Danve-Abdul Sattar News, Aurangabad
Dharashiv Crop Insurance धाराशिवच्या शेतकऱ्यांना दिलासा, २५ टक्के अग्रीम मंजूर...

बॅंकेचे संचालक असलेले आणि राज्याचे मंत्री संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेसाठी प्रयत्न करावा, मीही तुमच्यासोबत असेन, असा शब्द दिला. (Shivsena) याला उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री आणि जिल्हा बॅंकेचे सूत्रधार अब्दुल सत्तार यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत सहकारमंत्र्यांसोबत लवकरच बैठक घेण्याचा शब्द दिला. त्यामुळे रामकृष्ण उपसा जलसिंचन योजनेच्या प्रश्नावर शिंदे आणि ठाकरे गटाचे सूर जुळल्याचे या वेळी दिसून आले.

अंबादास दानवे यांनी केलेल्या मागणीला सत्तारांनी लगेच होकार देत प्रतिसाद दिल्याने सभास्थळी कुजबूज सुरू झाली होती. (Marathwada) रामकृष्ण जलसिंचन उपसा योजनेसंदर्भात ३५ वर्षांत जे झाले नाही, ते ३५ दिवसांत करणार. याविषयी मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती करणार आहे. तसेच दहा दिवसांत संचालक मंडळाची सहकारमंत्र्यांसोबत बैठक लावत आगामी कॅबिनेट बैठकीतदेखील विषय मांडणार असल्याची ग्वाही अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात दिली.

तत्पूर्वी दानवे यांनी आपल्या भाषणात रामकृष्ण योजनेचा उल्लेख करत मंत्र्यांना पुढाकार घेण्याचे आवाहन केले होते. राज्यात उत्तर महाराष्ट्र व इतर ठिकाणच्या जलसिंचन योजनांना पैसे मिळाले. प्रलंबित असलेल्या रामकृष्ण जलसिंचन योजनेसंदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून योजनेच्या २०६ कोटींची तडजोड करीत हा प्रश्‍न मंत्रिमंडळात मांडू, असे सत्तार यांनी या वेळी स्पष्ट केले. आमदार बागडे यांनी वसुली, अवसानात गेलेल्या संस्थांकडे अडकलेल्या ३४ कोटी रुपयांकडे लक्ष वेधले.

नितीन पाटील यांनी रामकृष्ण सिंचन योजनेत दोन्ही मंत्री, विरोधी पक्षांनी लक्ष देण्याची मागणी केली. यासह अनिष्ठ तफावत ६०० कोटींच्या घरात गेली आहे. म्हणजेच ५० टक्के ही तफावत असून, याकडे लक्ष देण्याचे सूचवले. अण्णासाहेब माने यांनी जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली. माजी आमदार कल्याण काळे यांनी नवीन सभासदांना कर्ज वाटप करावे, ही सभा मोठ्या सभागृहात घ्या, ५० टक्के वाढीव कर्ज देण्यात यावे, ३९ टक्के असलेली वसुली १०० टक्के करावी, अनिष्ठ तफावत असलेल्या संस्थांचे कर्ज राइट ऑफ करण्याची मागणीही त्यांनी केली.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com