Dharashiv Crop Insurance धाराशिवच्या शेतकऱ्यांना दिलासा, २५ टक्के अग्रीम मंजूर...

Marathwada News : एक महिन्याच्या आत ही रक्कम संबंधित पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश.
crop insurance News
crop insurance NewsSarkarnama

Affected Farmers News : धाराशिव जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड पडल्यामुळे खरीप पिके अडचणीत आहेत. विशेषतः सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत ५० टक्केपेक्षा जास्त घट येणार असल्याने शेतकरी संकटात आहेत. (Crop Insurance News) त्यांना दिलासा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील सर्व मंडळांत २५ टक्के पीकविमा अग्रीम रक्कम मंजूर करावा, अशी मागणी सातत्याने केली जात होती.

crop insurance News
Harshvardhan Jadhav On Loksabha : मुसलमान निवडून येतो म्हणून माझ्या नावाने कितीही खडे फोडा, मी लोकसभा लढवणारच...

ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर, (Omraje Nimbalkar) आमदार कैलास पाटील यांनी अग्रीम रकमेसाठी पाठपुरावा केला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून, धाराशिव जिल्ह्यातील सर्वच मंडळांना २५ टक्के अग्रीम रक्कम मंजूर करण्यात आली आहे. (Affected Farmers) यापूर्वी ४० मंडळांतील शेतकरी पात्र ठरले होते, तर उर्वरित १७ मंडळातील शेतकरीही २५ टक्के अग्रीम रकमेसाठी पात्र ठरले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी या संदर्भात आज अधिसूचना काढली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व म्हणजेच ५७ मंडळात २५ टक्के पीकविमा अग्रीम मंजूर झाल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (Marathwada) ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहील, असे खासदार ओमराजे यांनी स्पष्ट केले आहे.

तीव्र दुष्काळी स्थिती, तीन ते चार आठवड्यांपेक्षा जास्त पावसाचा खंड, मोठ्या प्रमाणावर कीड, रोग किंवा २५ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्र प्रभावित झाले असेल, नैसर्गिक आपत्ती अशा विविध कारणांमुळे शेती पिकाचे नुकसान झाले असल्यास २५ टक्के पीकविमा अग्रीम रक्कम मंजूर केली जाते. अधिसूचना जाहीर झाल्यापासून एक महिन्याच्या आत ही रक्कम संबंधित पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com