शीतल वाघमारे -
Osmanabad Politics : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे तुळजापूरमधील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी एक सूचक विधान केलं आहे. ज्यामुळे धाराशिव जिल्ह्यात चर्चांना उधाण आलं आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीकडे अनेकजण आकर्षित होत आहेत. पुढील काळात जिल्ह्यातील अनेक महत्त्वपूर्ण नेत्यांचे प्रवेश होणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
यानंतर अनेकांनी पत्रकारपरिषदेत वेगवेगळ्या नेत्यांचे नाव घेऊन प्रश्न उपस्थित केले. त्यावर आमदार पाटील यांनी प्रवेश होणार आहेत, फक्त त्यांचे नाव आता जाहीर करता येणार नसल्याचे सांगून महत्त्वपूर्ण नेत्यांच्या प्रवेशाबाबत सूचक संकेत राणाजगजितसिंह पाटील (RanaJagjit Singh Patil) यांनी दिले.
शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजिण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना आमदार ज्ञानराज चौगुले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मोहन पणुरे, सूरज साळुंके, दत्ता साळुंके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, प्रहारचे जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, रिपाइं (आठवले गट) चे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ओव्हाळ, रयत क्रांतीचे जिल्हाध्यक्ष सूरज चाने, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे उपस्थित होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राणाजगजितसिंह पाटील म्हणाले, 'भाजपला (BJP) नुकत्याच तीन राज्यांत मिळालेला विजय, नरेंद्र मोदींची प्रतिमा, विविध लोकाभिमुख योजना, तसेच जातीय समीकरणे यामुळे भाजपा किंवा महायुतीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुकांची गर्दी आहे.'
तसेच, 'धाराशिव जिल्ह्यातील अनेक नेते भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. या प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. या पक्षप्रवेशाचा आगामी लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येही प्रभाव दिसून येणार आहे. त्यामुळे पक्षात असणाऱ्या व निवडणूक लढविण्यास इच्छुकांमध्ये एकच धास्ती लागली आहे,' असंही त्यांनी सांगितलं.
धाराशिव लोकसभेसाठी भाजपाचे प्रदेशनेते बसवराज मंगरुळे (Basavaraj Mangarule) हे मागील काही महिन्यांपासून लोकसभा इच्छुक उमेदवार म्हणून गावागावात प्रचार सुरू केला आहे. भाजपचे माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकूर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे, तर महायुतीतील शिंदे गटातून उमरगा येथील माजी खासदार रवींद्र गायकवाड यांनीही पक्षाने तिकीट दिल्यास लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे.
याशिवाय अजित पवार गटाचे सुरेश बिराजदार हेही लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक असून त्यांनी मतदारसंघात विविध कार्यक्रम घेणे सुरू केले आहे. तसेच एक माजी आयएएस अधिकारीही धाराशिव लोकसभा मतदारसंघासाठी चाचपणी करीत असल्याची माहिती आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.