Raosaheb Danve News: भाजपवर गंभीर आरोप,महायुतीच्या उमेदवाराविरोधात मुलाचं बंड; शिवसेनेच्या सत्तारांना दानवेंचं चॅलेंज

BJP Vs Shivsena: भाजपावर आगपाखड करत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मुलाला उमेदवारी अर्ज दाखल करायला लावणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी चार तारखेनंतर अर्ज कायम ठेवावाच, असे आव्हान माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
Raosaheb danve, Abdul sattar
Raosaheb danve, Abdul sattarSarkarnama
Published on
Updated on

Marathwada News : भाजपावर आगपाखड करत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मुलाला उमेदवारी अर्ज दाखल करायला लावणाऱ्या अब्दुल सत्तार यांनी चार तारखेनंतर अर्ज कायम ठेवावाच, असे आव्हान माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे. सत्तार यांचे राजकारण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, त्यांना प्रकाशझोतात राहण्याची सवय आहे. जो व्यक्ती गवताच्या गंजीवर उभा आहे, तो आगीशी खेळू शकत नाही, असा सूचक टोलाही दानवे यांनी सत्तारांना लगावला.

भाजप शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप करत अब्दुल सत्तार यांनी ऐन विधान परिषदेच्या निवडणुकीत बंडाचे निशाण फडकावले आहे. सिल्लोड नगर परिषदेतील नगरसेवकांचा आम्हाला विचार करावा लागेल. त्यांचे मत जाणून घ्यावे लागेल. त्यांच्या आग्रहाखातरच माझ्या मुलाने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे सत्तार यांनी माध्यमांना सांगीतले होते.

या सगळ्या पार्श्वभूमीवर सत्तार यांचे एकेकाळचे मित्र आणि आता विरोधक असलेल्या रावसाहेब दानवे यांनी सत्तार यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत, या अब्दुल सत्तार यांच्या विधानाचीही दानवेंनी खिल्ली उडवली. राज्यात महायुतीचे सरकार आणि जो काही मोठा डोलारा उभा राहिला आहे, तो अशा विधानामुळे कोसळेल. त्यामुळे सत्तार यांच्या या दाव्याला काही अर्थ उरत नाही. सत्तार यांना स्टंटबाजीची सवय जडली आहे.

महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध मुलाला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करायला लावणे हा त्याच स्टंटबाजीचा प्रकार आहे. चार तारखेनंतर ते स्पष्ट होईल. सत्तार यांनी चार तारखेनंतर मुलाचा अर्ज कायम ठेवून दाखवावा, असे आव्हानच दानवे यांनी सत्तारांना दिले.

Raosaheb danve, Abdul sattar
Farmer Loan Waiver: फडणवीस सरकारची मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी कर्जमाफीला मंजुरी; पण घोषणा रखडली, मोठी अडचण समोर

लोकसभा निवडणुकीत माझा पराभव अब्दुल सत्तार यांच्यामुळे झाला नाही. विधानसभा निवडणुकीत सिल्लोडमधून अब्दुल सत्तार यांना 27 हजार मते होती. माझा पराभव लाखावर मतांनी झाला आहे, मग या 27 हजार मतांनी मी निवडून येणार होतो का?

अब्दुल सत्तार हे स्वतः सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातून अवघ्या बावीसशे मतांनी निवडून आले आहेत. सिल्लोड-सोयगाव मतदारसंघातील राजकीय समीकरणांमुळे माझा लोकसभेला पराभव झाला होता.

Raosaheb danve, Abdul sattar
Vidhan Parishad Election : काँग्रेस उमेदवारास कशाला अनुमोदक झालात?; नागेश भोसलेंना तिघांचे फोन, ते तिघे कोण?

छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था जागेच्या निवडणुकीवर भाजपाने दावा केला तो संख्याबळाच्या आधारावर केला. ज्याचे संख्याबळ जास्त त्या पक्षाला जागा हे सूत्र महायुतीच्या नेत्यांनी ठरवले आहे. संभाजीनगर-जालना या दोन्ही जिल्ह्यात आमचे संख्याबळ मोठे आहे, त्यामुळे ही जागा आम्हाला मिळाली असेही दानवे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com