Anil Deshmukh : फडणवीस-बावनकुळे जोडी फायदेशीर, देशमुखांच्या विधानाने उलटसुलट चर्चा

Maharashtra Lok Sabha Election What Anil Deshmukh said about Devendra Fadanavis Chandrashekhar Bawankule : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच फार्मात आले असून फडणवीस-बावनकुळे ही जोडी राज्यात राहाणे महाविकास आघाडीला फायदेशीर असल्याचा टोला त्यांनी लगावला
Anil Deshmukh
Anil DeshmukhSarkarnama

Nagpur News : महाराष्ट्रात काका-पुतण्याच्या लढाईत काकांनी बाजी मारल्याने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलाच उत्साह संचारला आहे. विशेष म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख चांगलेच फार्मात आले असून फडणवीस-बावनकुळे ही जोडी राज्यात राहाणे महाविकास आघाडीला फायदेशीर असल्याचा टोला त्यांनी लगावला.

महायुतीच्या कार्यकाळात अनिल देशमुख यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावण्यात आला होता. सुमारे एक वर्षे त्यांना कोठडीत राहावे लागले. त्यांच्या विरुद्ध युतीला सबळ पुरावेसुद्धा दाखल करता आले नाही. कोठडीतून बाहेर आल्यानंतर देशमुख महायुतीच्या नेत्यांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. आता लोकसभचे निकालात महाविकास आघाडीला जनतेनी कौल दिला आहे. त्यांच्या लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी झाला आहे. 

शेजारच्या वर्धा लोकसभा मतदारसंघात अमर काळे निवडूण आले आहेत. ते अनिल देशमुख यांचे भाचे आहेत. काळे यांना उमेदवारी देण्यात देशमुखांचा मोठा वाटा होता. काळे विजयी झाल्याने शरद पवार यांचा देशमुखांवर विश्वास अधिकच वाढला आहे. प्रफुल पटेल,अजित पवार यांच्याकडे गेल्याने विदर्भाचे नेते म्हणून देशमुखांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आता त्यांना विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत.

माध्यमांसोबत संवाद साधताना देशमुख म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील अनेक आमदार आमच्या संपर्कात आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला चार महिने शिल्लक असल्याने अनेक आमदार चिंतेत आहेत. शरद पवारांना कठीण काळात सोडून गेले, ज्यांनी वैयक्तिक टीका केली, त्यांना परत घ्यायचा नाही असे ठरले आहे. अनेक आमदार प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना फोन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी खासदार कृपाल तुमाने यांनी बावनकुळे यांच्यावर केलेल्यी टीकेवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले. बावनकुळे यांनी आता तरी जमिनीवर यावे असला सल्ला देशमुखांनी त्यांना दिला. त्यांच्या विधानसभा मतदारसंघात १८ हजाराने काँग्रेसचा उमेदवार आघाडीवर आहे. लोकसभेत दाणादान झाल्याने भाजपचे सर्व नेते चिंतेत आहेत. बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षपदी कायम राहावे. याचा आम्हाला फायदा होईल असेही देशमुख म्हणाले.

Anil Deshmukh
Loksabha Election Results 2024 : लोकसभेच्या परीक्षेत 6 डॉक्टर पास तर 6 डॉक्टर नापास

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com