Raosaheb Danve : खोदा पहाड, निकला चुहा, मुंबईतील शिवसेनेची ताकद कमी झाली..

दोन दिवसांपासून राऊत यांच्या पत्रकार परिषदेची राज्यभरात चर्चा होती, लोक त्याकडे डोळे लावून बसले होते. (Raosaheb Danve)
Raosaheb Danve-Sanjay Raut
Raosaheb Danve-Sanjay RautSarkarnama
Published on
Updated on

जालना : एक काळ होता, शिवसेनेने नुसता आवाज दिला की महाराष्ट्रातील शिवसैनिक मुंबईत धडकायचे. पण आज शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना पत्रकार परिषदेच्यावेळी शक्ती प्रदर्शन करण्यासाठी नाशिक, पुणे व इतर शहरांमधून शिवसैनिकांना मुंबईत बोलवावे लागले. (Marathwada) ही पत्रकार परिषद म्हणजे खोदा पहाड, निकला चुहा अशीच होती. त्यातून काहीच निघाले नाही, अशा शब्दात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी राऊत यांची खिल्ली उडवली.

संजय राऊत यांच्या शिवसेना भवनातील पत्रकार परिषदेकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले होते. गेल्या दोन दिवसांपासून या पत्रकार परिषदेची चर्चा होती, या निमित्ताने शिवसेना भवनात मोठी गर्दी झाली होती. राऊत यांनी किरीट सोमय्या, देवेंद्र फडणवीस, यांच्यासह भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची नावे घेत खळबळ उडवून दिली.

ईडीसाठी कोट्यावधी रुपये गोळा करणाऱ्या काही एजंटाची नावे देखील राऊत यांनी पत्रकार परिषदेत सांगितली. त्यामुळे देशभरात याची चर्चा झाली. भाजपने मात्र राऊत यांच्या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही पत्रकार परिषद म्हणजे एकपात्री प्रयोग होता असे म्हटले, तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी पिक्चरचा ट्रेलरच फ्लाॅप झाल्याची टीका केली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी देखील खोदा पहाड, निकला चूहा म्हणत राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर निशाणा साधला. दानवे म्हणाले, दोन दिवसांपासून राऊत यांच्या पत्रकार परिषदेची राज्यभरात चर्चा होती, लोक त्याकडे डोळे लावून बसले होते. प्रत्यक्षात आज शिवसेना भवनात जेव्हा ही पत्रकार परिषद झाली तेव्हा मात्र सगळ्यांचीच निराशा झाली. या पत्रकार परिषदेतून काहीच निघाले नाही.

Raosaheb Danve-Sanjay Raut
अखेर ठरलं.. शिवाजी महाराजांच्या आश्वारूढ पुतळ्याचे १८ रोजी आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण

विशेष म्हणजे मुंबईत आपली ताकद असल्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला बाहेरच्या जिल्ह्यातून शिवसैनिकांना का आणावे लागले? हा खरा प्रश्न आहे. एककाळ असा होता, फक्त आवाज दिला की हजारो शिवसैनिक मुंबईत दाखल व्हायचे. पण आता शिवसेनेची ताकद कमी झाली आहे, हे यावरून स्पष्ट होते. राऊत यांनी ज्यांच्यावरआरोप केले, त्यांच्या विरोधात तक्रारी दाखल कराव्यात, त्यांची योग्य चौकशी केली जाईल. पण या सगळ्यातून एकच सांगावेसे वाटते ते म्हणजे खोदा पहाड निकला चूहा, असा टोला देखील दानवे यांनी शेवटी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com