Raosaheb Danve News : 'पंचवीस निवडणुका लढलो, एक अपवाद सोडला तर पराभव पाहिला नाही'; दानवेंचा पॅटर्नच वेगळा...

Lok Sabhe Election 2024 : इंदिरा गांधींच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील एक पराभव सोडला तर मी पुन्हा कधी पराभवाचे तोंड पाहिलेले नाही.
Raosaheb Danve News
Raosaheb Danve NewsSarkarnama
Published on
Updated on

Phulambri News : 'निवडणूक हा काही बंदूक आणि बळाचा खेळ राहिलेला नाही. ही एक अशी कुस्ती आहे, जी बुद्धीने खेळावी लागते. माझ्या चाळीस वर्षांच्या राजकारणात मी पंचवीस निवडणुका लढलो. इंदिरा गांधींच्या निधनानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतील एक पराभव सोडला तर मी पुन्हा कधी पराभवाचे तोंड पाहिलेले नाही. त्यामुळे निवडणूक जिंकायची असेल तर विरोधकांची चाल ओळखून डाव टाकावा लागतो,' अशा शब्दांत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भाजप कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले. (Latest Marathi News)

मतदारसंघातील बोरगाव अर्ज येथे प्रचाराचा शुभारंभ करताना दानवे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. सध्या निवडणुकीचे वातावरण आहे, विरोधकांची चाल ओळखून निवडणुकीचे काम करा. कार्यकर्त्याच्या चेहऱ्यावर निवडणूक दिसली पाहिजे. प्रत्येक कार्यकर्त्याच्या चालण्या-बोलण्या व वागण्यातून निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले पाहिजे. तरच गावात तुमचे वजन निर्माण होऊन भाजपला सर्वाधिक मतदान होईल.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Raosaheb Danve News
Devendra Fadnavis News : फडणवीसांनी पहिल्यांदाच रणजितसिंह मोहिते-पाटलांचा उल्लेख करत केला हल्लाबोल; म्हणाले...

मी आतापर्यंत पंचवीस निवडणुका लढलो, पैकी केवळ इंदिरा गांधींचे निधन झाले होते त्यानंतरच्या निवडणुकीतच माझा पराभव झाला होता. मात्र, त्यानंतर एकाही निवडणुकीत मी हरलेलो नाही. निवडणूक जिंकण्यासाठी राजा आणि त्याचे सैनिकही शूर असावे लागतात. आपल्यापेक्षा समोरच्यावर लक्ष ठेवून विरोधकाची चाल ओळखली पाहिजे. आता बंदुकीची आणि बळाची कुस्ती नसून बुद्धीची कुस्ती आहे.

Raosaheb Danve News
Abhijeet Patil Way On the BJP : शरद पवारांना सोलापुरात पुन्हा धक्का; विश्वासू नेते अभिजित पाटील भाजपच्या वाटेवर?

देशात मोदीजींचा (Narendra Modi) सायलेंट मतदार तयार झाला आहे. त्यांचा कुठे आवाजही होत नसून ते जातात आणि कमळाचे बटन दाबून मोकळे होतात. या मतदारसंघात नऊ वेळा भाजपने काँग्रेसला हरवले आहे. निवडणुकीच्या काळात सतर्क राहून प्रचार करा, तुमच्या गावातील बूथ मजबूत ठेवा, असे आवाहन दानवे यांनी उपस्थितांना केले.

Raosaheb Danve News
Sharad Pawar NCP Manifesto 2024: गॅस 500 रुपयांपर्यंत करणार, शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आयोग; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा शपथनामा

देशाचे संविधान भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मेहनत घेऊन लिहिलेले आहे. देशाचे हे संविधान कुणीच बदलू शकत नाही. सोशल मीडियावर विरोधकांकडून अपप्रचार करून संविधान बदलण्याची भाषा वापरली जाते. मात्र, विरोधाकांकडे कुठलेही मुद्दे शिल्लक नसल्यामुळे ते असा खोडसाळपणा करून भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आमदार हरिभाऊ बागडे (Haribhau Bhagade) यांनी सांगितले.

(Edited By - Chetan Zadpe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com