रावसाहेब दानवेंनी म्हटलं की, “माझ्याकडे फंड नाही पण कार्यकर्ते आणि आमदार घडवण्याचा फंडा आहे,” असं विधान करून सगळ्यांचं लक्ष वेधलं.
त्यांच्या या वक्तव्यावरून दानवे यांनी पैशाऐवजी संघटनशक्ती आणि जनसंपर्कावर भर असल्याचं स्पष्ट केलं.
हे भाषण सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी दानवेंचं राजकीय कौशल्य आणि विनोदबुद्धीचं कौतुक केलं आहे.
तुषार पाटील
BJP Political News : भाजपाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे भाषण म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी मेजवणीच असते. दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमात दानवे यांची गाडी चांगलीच फाॅर्मात दिसली. माझ्याकडे आता काही पद नाही. त्यामुळे खासदार, आमदाराचा फंडही नाही, पण कार्यकर्ते घडवण्याचा फंडा मात्र आपल्याकडे आहे, असे म्हणत दानवे यांनी मेळावा गाजवला.
राजकारणात चाळीस-पंचेचाळी वर्षाचा प्रदीर्घ अनुभव, भाजपासारख्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून नेतृत्वाची संधी, केंद्रात दोनदा राज्यमंत्री, दोन वेळा आमदार राहिलेले दानवे हजरजबाबी, कोपरखळ्या मारण्यात पटाईत आहेत. मग व्यासपीठ देश, राज्य पातळीवरचे असो की मग होम पीच असो, रावसाहेब दानवे यांची चौफेर फटकेबाजीचा अनुभव अनेकदा येतो. भोकरदन येथे आयोजित दिवाळी स्नेहमिलन कार्यक्रमात दानवेंचा मूड चांगला होता.
सध्या कोणत्याही पदावर नसलेल्या भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी कार्यकर्त्यांना धीर देतानाच आपली पावर काय आहे? हे सांगण्याचा भाषणातून प्रयत्न केला. "मी सध्या कुठल्याही पदावर नाही, त्यामुळे माझ्याकडे आमदार फंड किंवा खासदार फंड यापैकी काहीही नाही, मात्र, माझ्याकडे कार्यकर्ते तयार करण्याचा 'फंडा' आहे, अशी गुगली टाकली.
मी कार्यकर्ता घडणवारा कुंभार
दानवे यांनी स्वतःची तुलना थेट कुंभाराशी केली. मी कार्यकर्ते घडविणारा कुंभार आहे, असे सांगत त्यांनी कुंभार असलेल्या एका कार्यकर्त्याला भर सभेत उभे केले. त्याला आपण पंचायत समिती सदस्य केल्याचेही त्यांनी अभिमानाने सांगितले. एवढेच नाही, तर अतिशय प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करणाऱ्या एका दिव्यांग कार्यकर्त्याला सभापती पद दिल्याचा किस्सा सांगत त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीची झलक दाखवली. कार्यकर्त्यांची नावे, त्यांचे गाव दानवेंच्या तोंडपाठ होते. त्यांनी अनेकांना उभे करून त्यांना बोलतं केले.
'भावी' सभापतींचा पत्ता कट
45 वर्षांच्या राजकीय अनुभवावर बोलताना दानवे यांनी काँग्रेसच्या सत्तेच्या काळातील अनुभव सांगितले. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे रणशिंग फुंकताना त्यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले. निवडणुकीच्या आधी कार्यकर्त्यांमध्ये जोश असायला हवा. आम्ही जेव्हा निवडणुका लढवत असू, तेव्हा आम्हाला माहीत होतं की आम्ही निवडून येणार नाही, पण आमचा जोश मोठा असायचा, असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना चार्ज केले.
मात्र, याच वेळी त्यांनी इच्छुकांना थेट इशारा दिला. जे जे इच्छुक आहेत, त्यांनी कामाला लागा,असे आवाहन करतनाच ज्यांनी स्वतःला भावी सभापती म्हणून घोषित केले आहे,त्यांचा पत्ता कट असे थेट सांगून 'भावी' नेत्यांना जमिनीवरही आणले. माझ्याकडे पद जरी नसले तरी माझ्याकडे आमदारांची फॅक्टरी आहे, असेही दानवे म्हणाले.
रावसाहेब दानवेंचं “फंड नाही, फंडा आहे” विधान कुठं झालं?
– हे विधान त्यांनी भोकरदन येथील मेळाव्यात केलं जेथे त्यांनी संघटन आणि मेहनतीचं महत्त्व सांगितलं.
या वक्तव्याचा अर्थ काय आहे?
– त्यांनी सांगितलं की, पैसा नसला तरी संघटनशक्ती आणि रणनीतीच्या बळावर नेता तयार करता येतो.
हे विधान का चर्चेत आलं?
– कारण दानवेंनी विनोदी शैलीत राजकारणातील वास्तव मांडलं आणि त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला.
कार्यकर्त्यांनी यावर काय प्रतिक्रिया दिली?
– अनेक कार्यकर्त्यांनी या विधानाचं कौतुक केलं आणि दानवे यांना “ग्राउंड लेव्हल लीडर” म्हटलं.
या वक्तव्याचा राजकीय परिणाम होऊ शकतो का?
– हो, यामुळे दानवेंचं संघटनातील महत्त्व वाढू शकतं आणि त्यांची प्रतिमा कार्यकर्त्यांमध्ये अधिक बळकट होईल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.