Pune Vidhan sabha Election : राज्यात आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. प्रत्येक पक्षा आपली ताकद राज्यात जास्तीत जास्त वाढवण्यासाठी रणनीती आखताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता महायुतीमधील प्रमुख पक्ष असणाऱ्या भाजपनेही तयारी सुरू केल्याचे दिसत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदारसंघाची जबाबादारी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार पंकजा मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली आहे. हे नेते पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन पुण्यातील परिस्थितीचा अहवाल प्रदेश भाजपकडे सादर करणार आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे कसबा, पर्वती आणि पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभेची जबाबदारी दिली आहे. तर पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांच्याकडे शिवाजीनगर, वडगाव शेरी, कोथरूड या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. तर बारामतीमधील खडकवासला विधानसभा मतदारसंघही मुंडे यांच्याकडे देण्यात आला आहे. मोहोळ यांनी कसबा आणि पर्वती विधानसभा मतदारसंघाची बैठक घेतली आहे. तर मुंडे यांच्या बैठका पुढील काही दिवसांत होणार आहेत.
या बैठकांमध्ये भाजपची(BJP) बुथनिहाय स्थिती काय आहे?, लोकसभा निवडणुकीत कोणत्या बुथवर किती मताधिक्य मिळाले, कुठे पिछाडी होती, त्यामागची कारणे काय आहेत याचा आढावा घेण्यात आला. तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचे म्हणणे काय आहे हे जाणून घेऊन त्याचा अहवाल प्रदेश भाजपकडे सादर करणे अपेक्षित आहे. त्यावरून विधानसभा निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे.
भाजपच्या प्रदेश अधिवेशनात विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली महायुतीची सत्ता स्थापन होईल असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांनी केला आहे. पण त्यासाठी जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. यासाठी संघटनात्मक पातळीवर भाजपने काम सुरु केले आहे. यासाठी भाजपने प्रत्येक लोकसभा मतदारसंघात दोन नेत्यांची नियुक्ती करून त्यांच्याकडे प्रत्येकी तीन मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपचे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. खासदारांची संख्या २३ वरून थेट ९ वर आली आहे. भाजपचे आमदार असणाऱ्या अनेक विधानसभा मतदारसंघात महाविकास उमेदवारांना लोकसभेत चांगले मताधिक्य मिळाल्याने आमदारांसह नेत्यांचीही चिंता वाढली आहे.
प्रदेश भाजपने पुणे लोकसभेतील मतदारसंघाची जबाबदारी मुरलीधर मोहोळ आणि पंकजा मुंडे यांच्याकडे दिली आहे. त्यानुसार मोहोळ यांनी कसबा व पर्वती या दोन मतदारसंघाची बैठक घेतली आहे. या दोन्ही नेत्यांचे प्रवास पुढील काही दिवसात पूर्ण होतील. अशी माहिती भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी दिली आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.