Sanjana Jadhav News : रावसाहेब दानवेंच्या मुलीच्या कारला अपघात, सुदैवाने कोणालाही इजा नाही..

Raosaheb Danve's daughter's car met with an accident, fortunately no one was injured : संजना जाधव यांच्या गाडीचे पुढील टायर फुटले व वाहनाच्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही.
Sanjana Jadhav News
Sanjana Jadhav NewsSarkarnama
Published on
Updated on

Raosaheb Danve's daughter's car accident News : माजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव यांच्या कारला रांजणगाव (ता. चाळीसगाव) फाट्याजवळ अपघात झाला. समोरुन भरधाव वेगाने येणाऱ्या पीकअप व्हॅनने जाधव यांच्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात जाधव यांच्या कारचे नुकसान झाले. सुदैवाने कारचालकासह कारमधील सर्व जण सुखरूप आहेत.

माजी जिल्हा परिषद सदस्य असलेल्या संजना जाधव या सोमवारी (ता.30) सकाळी कन्नडवरुन आपल्या इनडेवर (क्रमांक- एम. एच. 20 एफपी 0663) कारने नागद (ता. कन्नड) येथे खासगी कामानिमित्त जाण्यासाठी निघाल्या. (BJP) चालक पद्माकर बकले (रा. सिडको, छत्रपती संभाजीनगर) हे वाहन चालवत होते. कारमध्ये संजना जाधव, जयेश काकासाहेब बोरसे, ज्ञानेश्वर आण्णा निकम हे होते.

कन्नड घाट उतरल्यावर रांजणगाव (ता. चाळीसगाव) फाट्याच्या पुढे एका बाजूच्या रस्त्याचे काम सुरु असल्याने एकाच बाजूने वाहतूक सुरु होती. दुपारी पावणे बाराच्या सुमारास चाळीसगावकडून भरधाव वेगाने येणारी पीकअप गाडी समोरुन आली. चालक पद्माकर बकले यांनी आपली कार रस्त्याच्या बाजूला थांबवली असता, पीकअप वाहनाने त्यांच्या कारच्या उजव्या बाजूने जोरदार धडक दिली.

Sanjana Jadhav News
BJP News: ठरलं! भाजपचे उमेदवार एक ऑक्टोबरला ठरणार; 'या' प्रक्रियेतून होणार निवड

ज्यात संजना जाधव यांच्या गाडीचे पुढील टायर फुटले व वाहनाच्या एका बाजूचे मोठे नुकसान झाले. (Kannad) सुदैवाने कारमधील कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. याबाबत चालक पद्माकर बकले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ग्रामीण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

संजना जाधव या कन्नड-सोयगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्यास इच्छुक आहेत. गेल्या दोन वर्षापासून त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढवण्यावर जोर दिला आहे. विधानसभा निवडणुक दोन महिन्यावर आलेली असताना संजना जाधव या मतदारसंघात पुन्हा सक्रीय झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com