Kalyan Kale Vs Raosaheb Danve : खासदार काळेंनी दंड थोपटले, तिथेच रावसाहेब दानवेंचा आज दौरा...

Jalna Lok sbha Constituency : भोकरदन शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काळे यांनी दंड थोपटत माजी मंत्री रावसाहेब दानवे यांना आव्हान दिल्याची चर्चा होती.
Raosaheb Danve-kalyan kale
Raosaheb Danve-kalyan kaleSarkarnama

Jalna, 16 June : लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ. कल्याण काळे यांनी शनिवारी (ता. १५ जून) भोकरदन-जाफराबाद विधानसभा मतदारसंघात जोरदार शक्तीप्रदर्शन केले. खासदार झाल्यानंतर मतदार संघाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. भोकरदन शहरातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत काळे यांनी दंड थोपटत माजी मंत्री रावसाहेब दानवे यांना आव्हान दिल्याची चर्चा होती.

खासदार डॉ. कल्याण काळे (Kalyan Kale) यांचा सत्कार समारंभ जिथे पार पडला, त्याच ठिकाणी आज (ता. 16 जून) रावसाहेब दानवे ( Raosaheb Danve) आभार दौरा करणार आहेत. भोकरदन-जाफराबाद या दोन्ही शहरांमध्ये दानवे आभार दौऱ्यानिमित्त भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. लोकसभेच्या जालना मतदारसंघात (Jalna Lok Sabha Constituency) 35 वर्षांनंतर काँग्रेसने पहिल्यांदा विजय मिळवला आहे.

भाजपचे रावसाहेब दानवे या मतदारसंघातून सलग पाच वेळा निवडून आले होते. यंदाच्या निवडणुकीत मात्र काँग्रेसच्या कल्याण काळे यांनी त्यांचा लाखाच्या मताधिक्याने पराभव केला. रावसाहेब दानवे यांच्यावर मिळवलेला हा विजय काँग्रेससाठी ऐतिहासिक ठरत आहे, त्यामुळे साहजिकच काँग्रेसकडून या विजयाचे जंगी सेलिब्रेशन जिल्हाभरात सुरू आहे.

रावसाहेब दानवे यांचे निवासस्थान असलेल्या भोकरदन शहरात डीजेच्या दणक्यात खासदार काळे यांची शनिवारी जंगी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत कल्याण काळे तसेच माजी आमदार चंद्रकांत दानवे यांनी दंड थोपटत विजयाचा जल्लोष साजरा केला होता. मिरवणुकीनंतर शहरातील श्रीकृष्ण मंगल कार्यालयात पार पडलेल्या मेळाव्यातही काळे यांनी पुढील 25 वर्ष मीच खासदार राहणार, असा दावा केला.

Raosaheb Danve-kalyan kale
Sachin Kalyanshetti Vs Praniti Shinde : ‘प्रणितीताई, शब्द जपून वापरा; आम्ही बोलायला लागलो तर खूप महागात पडेल’; कल्याणशेट्टींचा इशारा

त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी काळे यांचा जंगी सत्कार झालेल्या भोकरदन आणि जाफराबाद मध्ये आभार दौरा घेत काँग्रेसवर पलटवार केल्याची चर्चा सुरू आहे. लोकसभेतील पराभव झाल्यानंतर खचून जाऊ नका, विधानसभेच्या तयारीला लागा, असे आवाहन दानवे आपल्या आभार दौऱ्यातून करत आहेत.

लोकसभा निवडणुकीत मित्र पक्षांनी दगा दिल्यानंतर सावध झालेल्या रावसाहेब दानवे यांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत दगाबाजांना धडा शिकवण्याचा निर्धार केला आहे. या पार्श्वभूमीवर दानवे यांच्या आभार दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.

जालना लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभा मतदारसंघात रावसाहेब दानवे पिछाडीवर पडले आहेत. त्यामुळे या सगळ्या ठिकाणी भाजपला गतवैभव मिळवून देण्यासाठी नव्याने तयारी करण्याचा प्रयत्न दानवे करताना दिसत आहेत.

Edited By : Vijay Dudhale

Raosaheb Danve-kalyan kale
Praniti Shinde's Regret : काँग्रेसमधील काहींनी अजूनही माझे नेतृत्व स्वीकारले नाही; सुशीलकुमार शिंदेंच्या नेतृत्वाच्या आवाहनावर प्रणितींची खंत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com