Sharad Pawar In Jalna News : जाफराबाद-भोकरदन मतदारसंघात पवारसाहेब भाकरी फिरवणार...

Ncp : अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते थेट पवार कुटुंबीयांच्या संपर्कात असून पक्षाचे एकनिष्ठेने काम करीत आहेत.
Sharad Pawar In Jalna News
Sharad Pawar In Jalna NewsSarkarnama

Marathwada : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार जालना जिल्ह्यातील जाफराबाद सारख्या छोट्या शहरात आले. तेही पक्षाच्या एका नगराध्यक्ष महिलेने मांडलेल्या कैफियत दूर करण्यासाठी. (Sharad Pawar In Jalna News) शरद पवारांचा जाफराबाद दौऱ्याची राज्यभरात चर्चा होत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्यालाच तिकीट अशा भ्रमात असणाऱ्या राष्ट्रवादीच्या प्रस्थापितांच्या भ्रमाचा भोपळा या दौऱ्याने फुटला आहे.

Sharad Pawar In Jalna News
Bjp Appoint Loksbha Constituency Head News : लोकसभा निवडणूक प्रमुखांची निवड करतांना भाजपने नव्या-जुन्यांची घातली सांगड..

तर भाकरी फिरवण्याचे संकेत दिलेले पवार (Sharad Pawar) स्वतः जाफराबादेत येवून गेल्यामुळे विधानसभा लढवू पाहणाऱ्या नव्या इच्छूकांच्या आशा मात्र पल्लवित झाल्या आहेत. (Jalna) पवार यांच्या दौऱ्याने आगामी विधानसभा निवडणुकीत "भोकरदन पॅटर्न "च्या नावाने राज्यभर गाजलेल्या निवडणुकीची पुनरावृत्ती होते की काय? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

जाफराबादच्या नगराध्यक्षा सुरेखा लहाने यांच्या निवासस्थानी झालेल्या भेटीचा उल्लेख स्वतः शरद पवार यांनी स्वतःच्या ट्विटरवर केल्याने या भेटीचे महत्व अधिकच वाढले आहे. (Marathwada) सत्कार समारंभ व्यतिरिक्त शरद पवार यांनी संजय लहाने व सुरेखा लहाने यांच्याशी वीस मिनिटे बंद दाराआड चर्चा केली. एकीकडे चंद्रकांत दानवे यांना जालना लोकसभेतून रावसाहेब दानवे यांच्या विरोधात उभे करणार असल्याची चर्चा, तर दुसरीकडे जाफराबाद-भोकरदन विधानसभा मतदारसंघातून नवीन चेहरा देण्याच्या हालचाली म्हणून पवारांच्या दौऱ्याकडे पाहिले जात आहे.

सुरेखा लहाने यांच्या पारड्यात शरद पवार आपले वजन टाकू शकतात, अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे अजित पवारांचे लाडके म्हणून ओळखले जाणारे आमदार चंद्रकांत दानवे यांच्याकडे कुठल्याही प्रकारच्या सहकारी संस्था, शिक्षण संस्था, कारखाने, पतपेढ्या नाहीत, शिवाय त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोपही नाहीत. त्यामुळे लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सुटली तर चंद्रकांत दानवे यांचा विचार होवू शकतो.

तर त्यांचे बंधू सुधाकर दानवे हे जरी सक्रिय राजकारणात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कुठलेही पद त्यांनी अद्याप पर्यंत घेतलेले नाही. शिवाय चंद्रकांत दानवे यांच्या आमदारकीच्या काळात बराचसा कारभार सुधाकर दानवे हेच सांभाळत होते. त्यामुळे नवा चेहरा म्हणून त्यांना संधी दिली तर जाफ्राबाद-भोकरदन मतदारसंघात पुन्हा दानवे विरुद्ध दानवे असा सामना पहायला मिळेल. शरद पवार यांनी भोकरदन मतदारसंघात वैयक्तिक लक्ष घातल्यास यंदाची निवडणूक निश्चितच अटीतटीची होऊ शकते.

Sharad Pawar In Jalna News
Sanjay Raut Upset News : मेळाव्याला गर्दी कमी, गॅलरी रिकामी पाहून संजय राऊत झाले नाराज...

भोकरदन तालुक्यातील राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते हे थेट पवार कुटुंबीयांच्या संपर्कात असून ते गेल्या अनेक वर्षापासून पक्षाचे एकनिष्ठेने काम करीत आहेत. मग सुरेखा लहाने असो की रोहित पवार यांच्याशी संपर्कात असलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे मंगेश जाधव. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अशा नेत्यांना व कार्यकर्त्याना पुन्हा बळ मिळाले असे दिसत आहे. मात्र सुरेखा लहाने व शरद पवार भेटीने पक्षांतर्गत विरोधकांना व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना देखील एक वेगळाच संदेश पवारांनी दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com