Ravikant Tupkar Way On BJP : रविकांत तुपकरही आता भाजपच्या वाटेवर; केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंची अप्रत्यक्ष कबुली

Raosaheb Danve News : शेतकरी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय तुपकरांनी जवळपास घेतल्यात जमा आहे.
Ravikant Tupkar-Raosaheb Danve
Ravikant Tupkar-Raosaheb Danve Sarkarnama

Buldhana News : जो कोणी शिकेल आणि प्रगती करेल, तो वर जातो, ही गोष्ट खरी आहे. रविकांत तुपकरही आता मागे राहिलेले नाहीत. तेही आता प्रगतीच्या रस्त्यावर आहेत. आता त्यांचं जमलं असं वाटतंय. त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका, असे सांगून तुपकर हे भाजपच्या वाटेवर असल्याची कबुली केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली. (Ravikant Tupkar is now on the way to BJP: Union Minister Raosaheb Danve)

रविकांत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यापासून फारकत घेत सवता सुभा उभारला आहे. शेतकरी संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय तुपकरांनी जवळपास घेतल्यात जमा आहे. ते भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. मात्र, त्यांनी त्या गोष्टीचा इन्कार केला होता. आता खुद्द केंद्रीय मंत्र्यांनीच ते प्रगतीच्या वाटेवर असल्याची कबुली दिली आहे.

Ravikant Tupkar-Raosaheb Danve
Beed Palak Mantri: बीडचे पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे येणार; अजित पवारांची ग्वाही, धनंजय मुंडेंची लागणार वर्णी

रावसाहेब दानवे म्हणाले की, आमची हवा खराब आहे, असं नाही. पण येथील हवा चांगली आहे. त्यामुळे या ठिकाणी सर्वांचा ओढा आहे. अभ्यासाने माणूस मोठा होतो, हे राजकारणात चालत नाही. राजकारणात किती उंच आहे, याला महत्व नाही, राजकारणात तो गोरा आहे का, याला महत्व नाही. राजकारणात तो फार शिकलेला आहे, याला महत्व राहत नाही. एकदा लोकांना चेहरा पसंत पडला की त्याला राजकाणात महत्व मिळतं, हे लक्षात ठेवा.

Ravikant Tupkar-Raosaheb Danve
Ajit Pawar Beed Sabha : धनुभाऊ, बीडमध्ये तुम्ही लावलेल्या दिव्याचा उजेड पडला नाही; मात्र आम्हाला चटके बसले : क्षीरसागरांची खंत

आमच्या सिल्लोडला एक तलाठी आणि एक वकिल होता. तलाठ्याची चलती होती. वकिल जायचा कोर्टात आणि तलाठी जायचा तहसील कार्यालयात. दोघांच्याही बायका एकाच गावच्या होत्या, त्यामुळे त्या एकमेकींच्या मैत्रिणी होत्या. दोघी गप्पा मारत बसायच्या. तलाठ्याच्या घरात फ्रीज, कलर टीव्ही, भरगच्च भांडी, असं सजलेलं घर असायचं. पण वकिलाचं घर रिकामं असायचं, त्याही कमी शिकलेल्या होत्या, असेही दानवे यांनी नमूद केले.

Ravikant Tupkar-Raosaheb Danve
Madha Loksabha : पुन्हा दोस्ताना; संजय शिंदेंचा खासदारकीसाठी निंबाळकरांना पाठिंबा, अधिक मतांनी निवडून आणण्याचा निर्धार

दानवे म्हणाले की, त्या दोघी एकमेकींमध्ये चर्चा करताना वकिलाची बायको तलाठ्याच्या बायकोला म्हणायची की, तुझ्या घरात टीव्ही, फ्रीज आणि भांडीकुंडी आहेत. हे माझ्या घरात नाही. तेव्हा तलाठ्याची बायको वकिलाच्या बायकोला सांगायची की, तुझ्या नवऱ्याला आणखी शिका, असं सांग म्हणजे तलाठी होईल. (उपस्थितांमध्ये प्रचंड हशा झाला). त्या तलाठ्याच्या बायकोला कळत न नव्हतं की कोण जादा शिकलेले आहे. एखादीच जागा अशी असते की त्या ठिकाणी माणसाला स्टेबल होतं येतं. असे सांगून त्यांनी तुपकरही आता मागे राहिले नाहीत, ते प्रगतीच्या वाटेवर असल्याचे स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com