Maharashtra Winter Session : कैलास गोरंट्याल विधानसभेत उद्या बॉम्ब फोडणार; मित्र म्हणत कोणाला दिला इशारा...

Kailas Gorantyal News : हे ट्रिपल इंजिनचे सरकार नसून ‘अब्बा, डब्बा अन्‌ झब्बा’चे सरकार आहे.
Kailas Gorantyal
Kailas GorantyalSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : मी माझ्या एका मित्राशी संबंधित बॉम्ब घेऊन आलो आहे. विधानसभेत तो बॉम्ब उद्या टाकू, असा इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी नागपुरात बोलताना दिला. गोरंट्याला उद्या कोणाला अडचणीत आणणार हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, हिवाळी अधिवेशन शंभर टक्के गाजणार आहे. उद्यापासून काय काय होतंय, हे तुम्ही बघाच, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. (Kailas Gorantyal will explode political bomb in the Legislative Assembly tomorrow)

नागपूर विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना कैलास गोरंट्याल यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, जेव्हापासून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांनी सरकार स्थापन केले आहे, तेव्हापासून महाराष्ट्राला पनौतीच लागली आहे. उन्हात पाऊस पडतोय, पावसात उन्हं पाडतंय. आता डिसेंबर महिन्यात गारा पडत आहेत. मागील अतिवृष्टीचे पैसे माझ्या मतदारसंघातील अनेक शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. आता पुन्हा गारपीट झाली आहे. शेतकरी आता सरकारच्या भरवशावर राहणार नाहीत, असं मला वाटतं. हे सरकारच पनौती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Kailas Gorantyal
Winter Session 2023 : ‘ओ..ऽ लंडन रिटर्न दानवे,’ म्हणत संजय शिरसाटांनी काढला चिमटा

तीन राज्यांतील निकालाचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही, पण आंध्र प्रदेशला लागून तेलंगणा आहे, तेलंगणाला लागून महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी असून, आगामी निवडणुकीत काँग्रेस नंबर एकवर राहील, असा दावाही आमदार गोरंट्याल यांनी केला.

आमदार गोरंट्याल म्हणाले की, हे ट्रिपल इंजिनचे सरकार नसून ‘अब्बा, डब्बा अन्‌ झब्बा’चे सरकार आहे. या तीन इंजिनला आम्ही ‘अब्बा, डब्बा अन्‌ झब्बा’ असे म्हणतो.

Kailas Gorantyal
Nagpur Winter Session 2023 : विधानसभेत ‘या’ नऊ माजी सदस्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडून कामकाज स्थगित

आम्ही जनतेच्या प्रश्नांवर सरकारला विरोधच करणार. हे लोक काम करू शकत नाहीत. अपयशी लोक असून महाराष्ट्राला लागलेली पनौती आहे, हे लोकांना माहिती आहे. हे सरकार कसे काम करत आहे, हे आम्ही त्यांना पटवून देणार आहोत. तेलंगणात ज्या पद्धतीने भारत राष्ट्र समितीला गुल केलं आहे, त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील जनता त्यांना गुल करणार आहे, असा दावाही कैलास गोरंट्याल यांनी केला.

Kailas Gorantyal
Assembly Winter Session : वडेट्टीवारांच्या शेतकऱ्यांवरील प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com