Beed District Politics : बीड भाजपवर 'रिपाइं' नाराज ? रामदास आठवलेंची कार्यक्रमाला हजेरी, पण पदाधिकाऱ्यांची दांडी

BJP and Republican Party of India: भाजपच्या 'अकेला चलो रे'च्या भूमिकेमुळे बीड 'रिपाइं'चे पदाधिकारी नाराज असल्याची चर्चा...
Ramdas Athawale and Beed BJP
Ramdas Athawale and Beed BJPSarkarnama
Published on
Updated on

Beed News: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत कार्यक्रम असूनही बीडच्या 'रिपाइंं'ने भाजपच्या कार्यक्रमापासून दूर राहणे पसंत केले आहे. भाजपच्या नेहमीच्या 'अकेला चलो रे'च्या भूमिकेमुळे हे पाऊल उचलल्याचे पदाधिकाऱ्यांचे मत आहे.

Ramdas Athawale and Beed BJP
Chandrashekhar Bawankule Audio Clip : 'पत्रकारांना चहा पाजा...' व्हायरल क्लिपनंतर बावनकुळेंची सारवासारव

खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांच्या पुढाकाराने केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व दिव्यांग कल्याण मंत्रालय व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी मोफत पूर्व तपासणी शिबिर झाले आहे. यामध्ये पात्र दिव्यांग लाभार्थ्यांना रविवारी रामदास आठवले आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्या हस्ते सहायक उपकरणांचे वितरण झाले.

पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री कार्यक्रमाला असूनही या कार्यक्रमापासून जिल्हा 'रिपाइंं' या कार्यक्रमापासून दूर राहिली. जिल्ह्यातील भाजप कायमच 'अकेला चलो रे'च्या भूमिकेत असते. त्यामुळे 'रिपाइंं'च्या पदाधिकऱ्यांनी आठवले यांचे स्वतंत्र स्वागत केले.

त्याबरोबरच त्यांना कार्यक्रम स्थळापर्यंत नेऊन सोडले. मात्र, 'रिपाइंं' युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे जिल्ह्यातील असूनही त्यांनी स्टेजवर जाणे टाळले. मागच्या अनेक दिवसांपासून भाजपकडून 'रिपाइंं'ला सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप 'रिपाइंं' कार्यकर्त्यांचा आहे.

Edited By- Ganesh Thombare

Ramdas Athawale and Beed BJP
NCP Vs BJP: भाजपचं 'बारामती', तर राष्ट्रवादीचं मिशन 'विदर्भ'; शरद पवारांसह हे दोन बडे नेते तळ ठोकणार ?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com