NCP Vs BJP: भाजपचं 'बारामती', तर राष्ट्रवादीचं मिशन 'विदर्भ'; शरद पवारांसह हे दोन बडे नेते तळ ठोकणार ?

NCP Political Crisis: राष्ट्रवादीने फुटीर गटासह भाजपला धडा शिकवण्यासाठी विदर्भाकडे लक्ष घातलं.
BJP and NCP
BJP and NCP Sarkarnama
Published on
Updated on

Pune News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्षाध्यक्ष शरद पवारांनी थेट मैदानात उतरत नाशिकमधील येवला, बीड, कोल्हापूर, जळगावात जाहीर सभा घेतल्या. या सभेत बोलताना पवारांनी फुटीरांवर निशाणा साधला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने 'मिशन विदर्भ' हाती घेतले आहे.

दुसरीकडे भाजप बारामती जिंकण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. मात्र, राष्ट्रवादीने फुटीर गटासह भाजपला धडा शिकवण्यासाठी विदर्भाकडे लक्ष घातलं असून, पक्षाध्यक्षांसह राष्ट्रवादीचे दोन नेते आता विदर्भाच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

शरद पवार गटाचा ऑक्टोबरमध्ये विदर्भ दौरा असून, या दौऱ्यात आगामी निवडणुका पाहता पक्ष संघटनेचा आढावा घेतला जाणार आहे. शरद पवार १२ ॲाक्टोबरला अकोला जिल्हा बँकेच्या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहेत. याच वेळी ते पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

BJP and NCP
Vaidyanath Sugar Factory : पवारांकडून मुंडेंच्या कारखान्याला मदत; मग अमित शाहांकडून हात आखडता का?

याबरोबरच आमदार रोहित पवार हे ९ आॅक्टोबरपासून बुलडाणा, वाशीम, यवतमाळ आणि अकोला दौऱ्यावर असणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे या आॅक्टोबरपासून नागपूर आणि वर्धा दौऱ्यावर आहेत. या संपूर्ण दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष संघटनेचा आढावा घेण्यात येणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. यामध्ये अजित पवारांचा गट सत्तेत, तर शरद पवारांचा गट विरोधी पक्षात असे चित्र सध्या आहे. दोन्ही गटांचा संघर्ष थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहाेचलेला आहे.

यातच काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. या पार्श्वभूमीवरच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेदेखील लोकसभेसाठी चाचपणी सुरू केल्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुण्यात बोलताना स्पष्ट केले.

दरम्यान, आगामी निवडणुका पाहता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने 'मिशन विदर्भ' हाती घेतले आहे. विदर्भात पक्ष आणखी मजबूत करण्यासाठी स्वत: शरद पवारांनी लक्ष घातले असून, खासदार सुप्रिया सुळे यादेखील नागपूर आणि वर्ध्याचा दौरा करणार आहेत, तर रोहित पवार हे बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, अकोल्यात जाऊन आढावा घेणार आहेत.

Edited By- Ganesh Thombare

BJP and NCP
Nagar District Bank Corruption : नगर जिल्हा बँकेत नक्की चाललंय काय ? तनपुरेंचा कार्डिलेंच्या कारभारावर संशय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com