Chandrashekhar Bawankule Audio Clip : 'पत्रकारांना चहा पाजा...' व्हायरल क्लिपनंतर बावनकुळेंची सारवासारव

BJP Politics : या व्हायरल ऑडिओनंतर विरोधकांनी बावनकुळे आणि भाजपला चांगलंच धारेवर धरलं आहे.
Chandrashekhar Bawankule Audio Clip :
Chandrashekhar Bawankule Audio Clip : Sarkarnama
Published on
Updated on

Pune Politics : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची 'पत्रकारांना चहा द्या, त्यांना ढाब्यावर न्या...' अशी संभाषण असलेली एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी बावनकुळे आणि भाजपला चांगलेच धारेवर धरलं आहे. इतकेच नव्हे तर वेगवेगळ्या स्तरावरूनही बावनकुळेंचा निषेध व्यक्त केला जात आहे. यावरून राजकारण तापण्याची शक्यता असतानाच बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे.

Chandrashekhar Bawankule Audio Clip :
MLA Disqualification Case Hearing : सर्व ३४ याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या; ठाकरे गटाच्या मागणीला शिंदे गटाचा विरोध

वाचा, काय काय म्हणाले होते ?

आपल्या चार बूथमध्ये कोणकोणते पत्रकार आहेत, इलेक्ट्राॅनिक पत्रकार आहेत, पोर्टलवाले कोण आहेत. आपण एवढं चांगलं काम करतो; पण तो अशी बातमी देतो की जणू काही बॉम्ब टाकलाय. त्यांना महिन्यातून एकदा चहाला बोलवा. त्यांनी महाविजय २०२३ ला आपल्या विरोधात काहीही लिहीलं नाही पाहिजे. त्यासाठी त्यांना चहाला बोलवा, चहाला म्हणजे कशाला तेही तुम्हाला चांगलंच समजते. पत्रकारांनी आपल्या विरोधात बातम्या न देण्यासाठी त्यांना ढाब्यावर न्या. त्यामुळे त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचं. कोणतीही बातमी आपल्या विरोधात आली नाही पाहिजे, पॉझिटिव्ह बातमी आली पाहिजे. (Chandrashekhar Bawankule )

बावनकुळेंची सारवासारव

बावनकुळेंचा ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी धारेवर धरल्यानंतर त्यांनी या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. "पत्रकारांना चहा पाजा म्हणजे, पत्रकारांना सन्मान द्या, मतदारसंघात जनतेचा कल काय आहे, हे त्यांच्याकडून जाणून घ्या. पत्रकार इतके महत्त्वाचे आहेत, की ते समाजाचं मत बदलू शकतात. मन बदलू शकतात, शेवटी पत्रकारही एक मतदार आहे. त्याला मत मांडण्यासाठी यायला काय अडचण आहे. त्यांच्याशी कशाला आपण वाईट वागताय. समाजात काय चाललंय हे जरा तुम्ही त्यांच्याकडून जाणून घ्या, असा सल्ला मी त्यांना दिला, असं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Chandrashekhar Bawankule Audio Clip :
Kailas Patil On Farmers: शेतकऱ्यांना दिलासा द्या, त्यांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com