Beed Loksabha : ...म्हणून निवडणूक जेवढी चुरशीची ठरली, तेवढीच आता निकालाची उत्कंठाही ताणली जाणार!

Beed Loksabha Election News : जाणून घ्या, कोणत्या मतदारसंघात सर्वाधिक मतमोजणीच्या फेऱ्या होणार आहेत?
Pankaja Munde, Bajrang Sonwane
Pankaja Munde, Bajrang SonwaneSarkarnama

Loksabha Election 2024 : लोकसभेची निवडणुक जेवढी चुरशीची झाली तेवढीच निकालाची उत्कंठा देखील उशिरापर्यंत ताणली जाणार आहे. पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे कोण होणार नवा खासदार हे समजण्यासाठी मतमोजणीच्या दिवशी दहा तास वाट पाहावी लागणार आहेत. सहा मतदार संघांतील मतमोजणी एकाच वेळी सुरु राहणार असली तरी सर्वाधिक 32 फेऱ्या आष्टी मतदार संघाच्या होणार आहेत.

41 उमेदवार आणि एक नोटा असे 42 उमेदवारांच्या मतांची गोळाबेरीज करण्यासाठी मोठा वेळ लागणार आहे. त्यामुळे सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरू झाली तरी निकालाचे चित्र स्पष्ट व्हायला किमान पाच वाजू शकतात. तर, निकाल हाती यायला सायंकाळचे सहा वाजतील.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Pankaja Munde, Bajrang Sonwane
Sandipan Bhumare And Kalyan Kale : भुमरे-काळेंची 'ती' भेट जुनीच; मात्र, फोटो पुन्हा व्हायरल

शहरातील खंडेश्वरी देवी मंदीर परिसरातील शासकीय तंत्रनिकेतन (पॉलीटेक्नीक) महाविद्यालयाच्या इमारतीत स्ट्राँग रुममध्यये मतपेट्या ठेवण्यात आल्या असून याच इमारतीमध्ये चार जून रोजीा मतमोजणी होणार आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणी सुरु होईल. सुरुवातीला पोस्टल मते मोजली जातील. अर्धा तासात ही मोजणी पूर्ण होईल, असा अंदाज बांधण्यात आला आहे.

मतमोजणीच्या अनुषंगाने बुधवारी (ता. 22) जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दिपा मुधोळ - मुंडे यांनी सर्व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणुक अधिकारी कांबळे, शैलेश कुलकर्णी, सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी कविता जाधव आदींची उपस्थिती होती.

Pankaja Munde, Bajrang Sonwane
Parbhani Loksabha Constituency : संजय जाधव यांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; नेमकं कारण काय...

निवडणुक रिंगणात 41 उमेदवार तसेच एक नोटा असल्याने प्रत्येक बुथवर तीन मशीन होत्या. त्यामुळे तििन्ही मशिनवरील मतदानात प्रत्येक उमेदवारांना पडणारे मतदान एका चार्टमध्ये नोंदवून प्रत्येक फेरीच्या मतदानाची बेरीज जुळवून फेरीनिहाय उमेदवार निहाय मतांची संख्या जाहीर केली जाईल. त्यामुळे मतमोजणीस व निकाल जाहीर होण्यास 10 तासांचा अवधी लागण्याचा अंदाज आहे. एकाच वेळी सहाही मतदार संघांतील मतमोजणी 14 टेबलवर सुरु राहणार आहे.

निकालाची उत्कंठा शेवटपर्यंत -

दरम्यान, ज्या पद्धतीने निवडणुक चुरशीची झाली तशीच निकालाची उत्कंठाही शेवटपर्यंत ताणली जाणार आहे. एकाच वेळी सर्वच मतदार संघांतील मतमोजणी सुरु राहणार असल्याने शेवटपर्यंत निकालाचे गणित ताणले जाणार आहे.

सर्वाधिक 32 फेऱ्या आष्टीच्या -

दरम्यान, सर्वाधिक 440 मतदान केंद्र आष्टीत होते. त्याखालोखाल केज मतदार संघात 415 तर गेवराईत 397, बीडमध्ये 382 आणि सर्वात कमी 342 केंद्र परळी मतदार संघात आहेत. सर्वाधिक बुथांमुळे मतमोजणीच्या सर्वाधिक 32 फेऱ्या आष्टी मतदार संघात होतील. तर, सर्वात कमी 25 फेऱ्या परळी मतदार संघात होणार आहेत. माजलगावच्या 28, बीडच्या 28, गेवराईच्या 29, केजच्या 30 फेऱ्या होणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com