Sandipan Bhumare And Kalyan Kale : भुमरे-काळेंची 'ती' भेट जुनीच; मात्र, फोटो पुन्हा व्हायरल

Jalna Loksabha Election 2024 : पाचवेळा खासदार राहिलेले महायुतीचे रावसाहेब दानवेविरुद्ध महाविकास आघाडीचे माजी आमदार कल्याण काळे यांच्यात येथे काँटे की टक्कर झाली.
Sandipan Bhumare And Kalyan Kale
Sandipan Bhumare And Kalyan KaleSarkarnama

Chhatrapati Sambhajinagar News : जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे हे लोकसभेच्या छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आहेत.

बुधवारी (ता.22) सकाळी जालना मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार डाॅ. कल्याण काळे यांच्या फेसबुक पेजवर भुमरे आणि काळे यांचा एक फोटो शेअर करण्यात आला होता. परंतु ही भेट आणि फोटो जुना असल्याचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले.

14 मे 2023 रोजी ही भेट झाली होती. कल्याण काळे यांचा अपघात झाला होता, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी भुमरे यांनी त्यांची भेट घेतली होती. परंतु आज दुपारी एक वाजेच्या दरम्यान हा जुना फोटो कल्याण काळे यांच्या फेसबुकवरून शेअर झाला. त्यानंतर साधरणता दीड वाजता तो डिलीट करण्यात आला.

Sandipan Bhumare And Kalyan Kale
Raju Shetti News : 'धैर्यशील मानेंना पराभवाची भीती म्हणून भाजप जिल्हाध्यक्षावर...', 'स्वाभिमानी'चा दावा

दरम्यान, संदिपान भुमरे (Sandipan Bhumare) यांच्या कार्यालयातून हा जुना फोटो असल्याचे सांगण्यात आले. हा खोडसाळपणा असून जुना फोटो व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. या संदर्भात संदिपान भुमरे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचा भ्रमणध्वनी बंद असल्याने संपर्क होऊ शकला नाही.

(राजकारणातील महत्वाच्या बातम्यांच्या अपडेटस॒साठी सरकारनामाचे अधिकृत WhatsAppचॅनेल फॉलो करा)

तसेच महाविकास आघाडीचे लोकसभेच्या जालना मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार डाॅ. कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचाही भ्रमणध्वनी बंद होता. संदिपान भुमरे मुंबईत असल्याचे सांगण्यात आले. ते आजारी असल्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत.

पाचवेळा खासदार राहिलेले महायुतीचे रावसाहेब दानवेविरुद्ध (Raosaheb Danve) महाविकास आघाडीचे माजी आमदार कल्याण काळे (Kalyan Kale) यांच्यात येथे काँटे की टक्कर झाली. एकतर्फी वाटणारी ही लढत काळे यांच्या बाजूने झुकल्याचे मतदानानंतर बोलले जाऊ लागले. या उत्साहाच्या भरातच काळे यांनी मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवशीपासून संपूर्ण मतदारसंघात आभार दौरा सुरू केला होता.

Sandipan Bhumare And Kalyan Kale
Gajanan Kirtikar News : शिंदे गटातून गजानन किर्तीकर यांची हकालपट्टी होणार? शिवसेनेच्या शिस्तभंग कमिटीकडे तक्रार अर्ज

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com