Imtiaz Jaleel News : छत्रपती संभाजीनगरमध्ये रमाई घरकुल योजनेत शंभर कोटींचा घोटाळा! इम्तियाज जलील यांनी बाॅम्बची वात पेटवली..

A ₹100 crore scam has surfaced in the Ramai Gharkul Yojana. MP Imtiaz Jaleel meets the municipal additional commissioner seeking urgent action. : अडीच लाखाचे अनुदान घेऊन लाभार्थ्याला केवळ एक ते दीड लाख देऊन बाकीची रक्कम दलाल, महापालिकेतील काही अधिकारी-कर्मचार्‍यांनी संगनमताने लाटली.
Imtaiz Jaleel News Chhatrapati Sambhajinagar
Imtaiz Jaleel News Chhatrapati SambhajinagarSarkarnama
Published on
Updated on

Aimim News : एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी काही दिवसांपुर्वी आपण लवकरच भ्रष्टाचारा संदर्भात मोठा बाॅम्ब फोडणार आहोत, असे जाहीर केले होते. हा बाॅम्ब रमाई घरकुल योजनेतील गैरव्यवहारा संदर्भातील असल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यानूसार छत्रपती संभाजीनगरमध्ये महापालिके अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या रमाई घरकुल योजनेत तब्बल शंभर कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी बाॅम्बची वात पेटवली आहे.

महापालिकेचे (Municipal Corporation) अतिरिक्त आयुक्त रणजीत पाटील यांची भेट घेऊन इम्तियाज जलील यांनी त्यांच्याकडे या घोटाळ्या संदर्भातील कागदपत्रे आणि पुरावे सुपूर्द केले. महापालिकेतील अधिकारी-कर्मचारी, दलाल आणि काही राजकीय नेत्यांचा यात हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अतिरिक्त आयुक्तांकडून लेखी निवेदनावर उत्तर मिळाल्यानंतर आपण माध्यमांसमोर हा घोटाळा पुराव्यानिशी समोर आणू, यात अडकलेल्या बड्या राजकीय नेत्यांची नावेही घेऊ, असे इम्तियाज जलील यांनी माध्यमांना सांगितले.

गेल्या अनेक दिवसापासून इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) चर्चेत आहेत. पालकमंत्री संजय शिरसाट यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर बेकायदा मालमत्ता खरेदीचे आरोप आणि त्याचे पुरावे त्यांनी जाहीर पत्रकार परिषद घेऊन सादर केले होते. दरम्यानच्या काळातच त्यांनी रमाई घरकुल योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत बोगस फायली तयार करून अनुदान लाटल्याचा आरोप केला होता. अडीच लाखाचे अनुदान घेऊन लाभार्थ्याला केवळ एक ते दीड लाख देऊन बाकीची रक्कम दलाल, महापालिकेतील काही अधिकारी-कर्मचार्‍यांनी संगनमताने लाटल्याचा दावा इम्तियाज यांनी केला होता.

Imtaiz Jaleel News Chhatrapati Sambhajinagar
Imtiaz Jaleel On Thackrays : इम्तियाज जलील म्हणतात, भाजपाला संपवायचे असेल तर राज-उद्धव ठाकरेंनी एकत्र आलं पाहिजे!

त्यानंतर काल महापालिकेत धडक देत त्यांनी रमाई घरकुल योजनेत 100 कोटींचा घोटाळा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही दलालांशी हात मिळवणी करत केल्याचा आरोप केला. रमाई घरकुल घोटाळ्यामध्ये जे स्वत:ला समाजाचे मोठे नेते म्हणवून घेतात त्या बड्या नेत्यांचा हात आहे. लाभार्थी शोधण्यासाठी ज्या संस्थेला 25 लाखांमध्ये कंत्राट देण्यात आले आहे त्यामध्ये दोन माजी नगरसेवकांचा समावेश असल्याचे ते म्हणाले.

Imtaiz Jaleel News Chhatrapati Sambhajinagar
Municipal Corporation Election : चार वार्डांच्या प्रभागातून भाजपा स्वबळाच्या दिशेने! शिंदेंच्या शिवसेनेला फटका बसणार..

एकाच कुटुंबातील चार लाभार्थी तयार करून बोगस कागदपत्रांच्या आधारे या योजनेत घोटाळा झाल्याचे पुरावे आपण सीबीआय, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक, मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांकडे सोपवल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले. सदर तक्रारीवर अतिरिक्त आयुक्तांकडून उत्तर मिळाल्यानंतर लवकरच या संदर्भातील सगळे पुरावे आपण माध्यमांसमोर आणू आणि यात कोण बडे नेते आहेत? त्यांची नावेही जाहीर करू, असे इम्तियाज जलील म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com