Jaykumar Gore News : शाळा खोल्या, आरोग्य उपकेंद्राच्या कामात भ्रष्टाचार; ग्रामविकास मंत्र्यांची कबुली! दोन अभियंते निलंबित..

In a significant development, the Rural Development Minister admits to corruption within the department : संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मौजे लासूर स्टेशन व गुरुधानोरा या दोन गावांमध्ये 1 कोटी 46 लक्ष रुपये कसलेही काम न करता परस्पर बिले उचलण्यात आली आहेत.
Jaykumar gore News Assemly Session
Jaykumar gore News Assemly SessionSarkarnama
Published on
Updated on

Assembly Session News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्याच्या लासूर स्टेशन आणि गुरुधानोरा या दोन गावात शाळा खोल्या आणि आरोग्य उपकेंद्राची इमारत बांधकाम न करता दीड कोटींची बीलं उचलल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशी अहवालावरून दोन उपअभियंत्यांना निलंबित करण्यात आले होते. आज विधान परिषदेत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यकारी अभियंत्यांनाही निलंबित करण्याचे निर्देश दिले.

विधान परिषदेत या गैरव्यवहारावर मांडण्यात आलेल्या लक्षवेधीवर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार सतीश चव्हाण, भाई जगताप, अनिल परब यांनी विविध मुद्दे उपस्थित केले. दरम्यान, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी भ्रष्टाचार झाल्याची कबुली देत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. (Assembly Session) परंतु भ्रष्टाचार झाल्याची कबुली जर या खात्याचा मंत्री, प्रमुख व्यक्तीच जर देत असेल तर आता कसली चौकशी? थेट संबंधित उपअभियंते, कार्यकारी अभियंत्यांना बडतर्फ करा, अशी मागणी विरोधकांनी केली.

संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील मौजे लासूर स्टेशन व गुरुधानोरा या दोन गावांमध्ये 1 कोटी 46 लक्ष रुपये कसलेही काम न करता परस्पर बिले उचलण्यात आली आहेत. यामध्ये सहभागी अधिकाऱ्यांना फक्त निलंबित करून चालणार नाही, त्यांना बडतर्फ करा, ज्यांनी याकडे दुर्लक्ष केले त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे. तसेच ज्या कामांसाठी बीलं उचलण्यात आली आहेत, ती कामे सुरळीत होणे महत्वाचे आहे. या दोन्ही गावातील शाळा आणि आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामात सर्व निकृष्ट कामे झाली आहेत. अशा भ्रष्ट कामात कंत्राटदार यांच्यापेक्षा अधिकारी जास्त दोषी असतात. तसेच अशा कामांची एसओपी काढली गेली आहे का? असा प्रश्न अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी उपस्थित केला.

Jaykumar gore News Assemly Session
Ambadas Danve News : मुख्यमंत्र्यांकडून संजय शिरसाट यांचा गेम? अंबादास दानवेंच्या मागणीवर उच्चस्तरीय चौकशी लावली!

भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आपल्याच गंगापूर मतदारसंघातील अशा एकूण अकरा प्रकारच्या तक्रारी केल्या होत्या. यापैकी 9 तक्रारीत गैरव्यवहार झाल्याचे चौकशीत स्पष्ट झाले असल्याचे मंत्री जयकुमार गोरे यांनी सभागृहात सांगितले. शाळा खोल्या, आरोग्य केंद्राचे काम होण्याआधीच बीलं अदा केली गेली. हे प्रकरण गंभीर आहे. या दोन्ही प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल. दोघांना निलंबित करण्यात येईल आणि या संबधातील इतरांवरही कारवाई केली जाईल, असे गोरे यांनी सांगितले.

Jaykumar gore News Assemly Session
Jaykumar Gore : जयकुमार गोरे खंडणी प्रकरणी मोठी घडामोड; थेट दिल्लीतून मांत्रिकाला अटक

निलंबन नको, बडतर्फ करा..

मंत्र्यांनी भ्रष्टाचार झाला हे कबुल केलं आहे. या खात्याचा सर्वोच्च मंत्री हे कबुल करतोय, याचा अर्थ त्यांनी चौकशी केली आहे. त्यामुळे आता कुठली चौकशी करणार? त्यामुळे आता बडतर्फ करण्याची कारवाई केली पाहिजे. सभागृहात चौकशी व्हायच्या आधी तुम्ही भ्रष्टाचार झाल्याचे मान्य केले. त्यामुळे आता चौकशी झाली तरी ती दबावाखाली होणार. प्रश्न लागल्यानंतर निलंबनाची कारवाई केली, अन्यथा ती देखील झाली नसती, असा आरोप आमदार अनिल परब यांनी गोरेंच्या उत्तरावर बोलतांना केला.

Jaykumar gore News Assemly Session
maharashtra assembly monsoon session 2025 live updates : मूळ भाजप पक्ष मेला, फडणवीसांच्या रुदाली वरील टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्त्युतर

खातेनिहाय चौकशी करून सर्वांवर कारवाई केली जाईल. प्राथमिक चौकशी अहवालावरून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तो अधिकारी सरकारचा जावई आहे का? माजलेला अधिकारी तात्काळ बडतर्फ झालाच पाहिजे, असे भाई जगताप म्हणाले. कोणालाही सोडणार नाही, दोन महिन्यात चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गोरे यांनी सभागृहात सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com