Sambhaji Nagar Election: उमेदवाराचा असाही प्रताप! उमेदवारी अर्ज भरला भाजपकडून अन् एबी फॉर्म जोडला शिवसेनेचा

Sambhaji Nagar Election: महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी यंदा प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagar
Published on
Updated on

छत्रपती संभाजीनगर: महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी यंदा प्रचंड गोंधळ पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत बऱ्याच महापालिकांसाठी युत्या आघाड्या जाहीर झाल्या नाहीत. पक्षांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यामुळं उमेदवारांचीही अडचण झाली याच गोंधळात एका उमेदवारानं वेगळाच प्रताप केला. त्यानं भाजपकडून अर्ज भरला अन् त्याला एबी फॉर्म शिवसेनेचा जोडला.

Sambhaji Nagar
Shivsena Politics: पिता-पुत्र निवडणुकीच्या रिंगणात; एक जण ठाकरेंचा तर दुसरा शिंदे सेनेचा उमेदवार!

छत्रपती संभाजी नगर महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज भरताना हा प्रकार घडला आहे. इथं माजी उपमहापौर लता दलाल यांनी काल उमेदवारी अर्ज भरला होता. पण तांत्रिक अडचण निर्माण झाल्यामुळं त्यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. यामध्ये त्यांनी सर्वात मोठी चूक करुन ठेवली ती म्हणजे भाजपसोडून ऐनवेळी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली. पण यात चूक अशी केली की, अर्ज भरला भाजपचा उमेदवार म्हणून अन् त्याला एबी फॉर्म जोडला शिंदेच्या शिवसेनेचा. साम टीव्हीनं याबाबत वृत्त दिलं आहे.

Sambhaji Nagar
Vanchit Congress Aghadi: काँग्रेस-वंचित आघाडीत मीठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न! वंचितचा आरोप; 'त्या' 16 जागांबाबत स्पष्टच सांगितलं

दरम्यान, दलाल यांच्याकडून चुकून असा प्रकार घडल्याचं सुत्रांकडून कळतं आहे. म्हणजे अर्ज दाखल करण्याची वेळ संपत आल्यानं त्यांनी घाई गडबडीत आपल्याला शिंदेंच्या शिवसेनेचा एबी फॉर्म मिळालेला असताना आपण अद्याप भाजपतच आहोत त्यामुळं भाजपकडूनच अर्ज भरायला घेतला. पण भाजपचा एबी फॉर्म नसताना तो शिवसेनेचा जोडला. त्यामुळं निवडणूक नियमानुसार हे चुकीचं घडल्यानं त्यांचा अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी छाननीमध्ये बाद ठरवला.

Sambhaji Nagar
Sanjay Raut Threat: संजय राऊत यांना बॉम्बनं उडवण्याची धमकी! घराबाहेरील गाडीवर लिहिला संदेश

त्यामुळं धडपडून शिवसेनेकडून एबी फॉर्म मिळवलेला असतानाही दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं आता त्यांना या निवडणुकीपासून मुकावं लागणार आहे. त्यामुळं ज्यांना या निवडणुकीत पक्षांनी तिकीटं दिली ते खुशीत तर होतेच पण ज्या निष्ठावंतांना डावललं गेलं त्यांचा आक्रोशही होता. पण मिळालेल्या संधीचा योग्य फायदा घेता आला नसल्यानं उमेदवारी रद्द होण्याची वेळही काही उमेदवारांवर आली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com