Sambhaji Nagar: MIMच्या फरार नगरसेवकानं महापौरांकडं मागितली गैरहजर राहण्याची परवानगी; पत्र नेऊन देणाऱ्याचा पोलिसांकडून शोध

एमआयएम पक्षाचे अनेक नगरसेवक विविध कारणांमुळे अडचणीत आहेत. त्यात आता मेराज खान यांच्या नावाची भर पडली आहे.
Sambhaji Nagar
Sambhaji Nagar
Published on
Updated on

Sambhajinagar Municipal Corporation : एका गुन्ह्यात फरार असलेल्या MIMच्या नगरसेवकावर सलग तीन सर्वसाधारण सभेला गैरहजर राहिल्याने नगरसेवक पद रद्द होण्याची वेळ आली आहे. डोक्यावरची ही टांगती तलवार हटवण्यासाठी पोलीस रेकॉर्डनुसार फरार असलेल्या या नगरसेवकाने महापौर समीर राजूरकर यांच्याकडे सर्वसाधारण सभेत गैरहजर राहण्याची परवानगी मिळावी, यासाठी पत्र पाठवले आहे. आता पोलीस महापौरांकडे पत्र कोणी नेऊन दिले याचा शोध घेत आहेत.

Sambhaji Nagar
Girish Mahajan: 'गेट आऊट फ्रॉम हेअर'! मुंबईकर महिलेनं गिरीश महाजनांना झाप झाप झापलं; भाजपनं ट्रॅफीक अडवून महिलांचा काढला होता मोर्चा

एमआयएम पक्षाचे अनेक नगरसेवक विविध कारणांमुळे अडचणीत आहेत. त्यात आता मेराज खान यांच्या नावाची भर पडली आहे. तीन सर्वसाधारण सभेला गैरहजर राहणाऱ्या नगरसेवकाचे पद रद्द होते. मेराज खान एका गुन्ह्यात फरार असल्याने त्यांनी महापौर समीर राजूरकर यांच्याकडे सर्वसाधारण सभेत गैरहजर राहण्याची परवानगी मागितली. फरार असताना हे पत्र महापौरांना कोणी आणून दिले याचा शोध आता सिटीचौक पोलीस घेत आहेत.

Sambhaji Nagar
Election Commission Order: निवडणूक आयोगाकडून नागरिकांना जोरदार झटका! दिवसा 'डबलसीट' अन् रात्री दुचाकीवरुन प्रवासाला बंदी

महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर अनेक नगरसेवकांच्या विरोधात तिसरे अपत्य, अतिक्रमण, बेकायदा बांधकामाच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तसेच महापालिकेच्या कामात अडथळा आणल्याचे गुन्हेही दाखल झालेले आहेत. त्यात एमआयएम पक्षाच्या नगरसेवकांचा समावेश आहे. त्यात आता आणखी एका नगरसेवकाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Sambhaji Nagar
Mallikarjun Kharge: PM मोदींना म्हटलं 'दहशतवादी'! नंतर मल्लिकार्जुन खर्गेंनी केली सारवासारव; म्हणाले, विरोधकांना ते...

मेराज खान हे एमआयएम पक्षाच्या तिकिटावर प्रभाग क्रमांक 6 मधून निवडून आले आहेत. त्यांचे इस्लाम पक्षाचे नेते रफत यार खान यांच्यासोबत भांडण झाले. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस मेराज खान यांचा शोध घेत असून, ते सध्या फरार आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून महापालिकेत 3 सर्वसाधारण सभा झाल्या. प्रत्येक सभेच्यावेळी सिटीचौक पोलीस मोठा बंदोबस्त ठेवत आहेत.

Sambhaji Nagar
Parth Pawar : गुढीपाडव्याला अजितदादांची आठवण, पार्थ पवारांची भावूक! शेअर केले खास फोटो

मेराज खान सभेसाठी फक्त सही करण्यासाठी आले तरी त्यांना अटक करण्याची पोलिसांची तयारी दिसत आहे. दरम्यान सोमवारी (ता. 20) सर्वसाधारण सभा झाली. मंगळवारी अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभा झाली. या सभांना मेराज खान गैरहजर होते. यासंदर्भात महापौर समीर राजूरकर यांना विचारले असला त्यांनी सांगितले की, माझ्या कार्यालयात कोणीतरी त्यांच्या नावाचा सुट्टीचा अर्ज दिला आहे. त्यावर खान यांचीच सही आहे का? हे तपासावे लागेल. त्यानंतर सुट्टी द्यायची किंवा नाही, याचा निर्णय होईल. आता महापौरांना अर्ज कोणी दिला? याचा शोध पोलीस घेत असल्याचं सुत्रांकडून कळतं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com