Latur Political News : राजकीय साठमारी लातूरच्या मूळावर; तहसीलदारपदाबाबत नेमकं काय चाललंय ?

Latur Tahsildar : अमित देशमुख, संभाजी पाटील निलंगेकर आणि पालकमंत्री गिरीश महाजनांच्या वादात पद चार महिन्यांपसून रिक्त
Sambhaji Patil Nilangekar, Girish Mahajan, Amit Deshmukh
Sambhaji Patil Nilangekar, Girish Mahajan, Amit DeshmukhSarkarnama

Latur News : लातूर तालुक्याचे तहसीलदार पद गेल्या चार महिन्यांपासून रिक्त आहे. काँग्रेसचे आमदार अमित देशमुख, भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या वादात हे पद रिक्त राहिल्याचे उघडपणे बोलले जात आहे. परिणामी जिल्ह्याच्या विकासात राजकीय साठमारीच अडथळा ठरत असल्याची चर्चा सुरू आहे. आला लातूरला कधी तहसीलदार मिळणार, याकचे लोकांचे लक्ष आहे. (Latest Political News)

लातूरचे (Latur) तहसीलदार स्वप्नील पवार यांची १३ एप्रिल २०२३ रोजी बदली कोल्हापूर येथे झाली. त्यावेळी ६ जूनपर्यंत भरत सूर्यवंशी यांच्याकडे प्रभारी पदभार देण्यात आला. त्यानंतर ७ जूनला महेश सावंत यांच्याकडे दिला. मात्र त्यांना पदभार दिल्यानंतर अनेक वरिष्ठांनी आक्षेप घेतला. त्यामुळे पुन्हा १३ जूनलाच त्यांचा पदभार काढून शोभा पुजारी यांच्याकडे देण्यात आला. यानंतर ३० जूनला गणेश सगर यांच्याकडे पदभार दिला.

तहसीलदार पदाबरोबरच संजय गांधी निराधार योजना विभागाचे नायब तहसीलदार पद सहा महिन्यापासून आणि निवडणुक विभागाचे नायब तहसिलदारपद एक वर्षापासून रिक्त आहे. तसेच महसूल सहाय्यक पदाचा पाच पदे रिक्त आहेत. जिल्हा मुख्यालय असलेल्या ठिकाणच्या कार्यालयाची ही अवस्था तर इतर तालुक्यांची स्थितीबाबत लोक चिंता व्यक्त करत आहेत.

Sambhaji Patil Nilangekar, Girish Mahajan, Amit Deshmukh
Devendra Fadnavis Apologize : लाठीचार्जवरून देवेंद्र फडणवीसांनी चक्क मागितली माफी !

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांच्या काळात लातूर जिल्ह्याची १५ ऑगस्ट १९८२ रोजी निर्मिती झाली. त्यावेळेपासून कधीही हे पद असे चार-चार महिने रिक्त राहिले नव्हते. त्यांचे कायम लातूर तालुक्याकडे अत्यंत बारकाईने लक्ष असे. विलासराव देशमुख मुख्यंमत्री असताना त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख हे कारभार पाहत होते.

त्यावेळी एखादा अधिकारी पद रिक्त होणार असल्यास त्या ठिकाणी चार-पाच महिन्यापूर्वीच दुसऱ्या अधिकारी नियुक्तीचे नियोजन होईल. लातूर तहसीलचे एकही पद कधीच रिक्त राहत नव्हते. यामुळे लातूरमधील तहसीलदार पदाचे घोंगडे आणखी किती दिवस भिजत राहणार, असा प्रश्न लातूरकर उपस्थित करू लागले आहे. यावर संबंधित नेते काय भूमिका घेणार, याची उत्सुकता लागली आहे.

Sambhaji Patil Nilangekar, Girish Mahajan, Amit Deshmukh
Jalna Maratha Reservation : मोठी बातमी ! मराठा आरक्षणाचा अभ्यास 'फेल'; समितीच्या बैठका कागदोपत्री

या पदावर महेश शेवाळे, अविनाश रणखांब, राहुल खांडेभराड, संजय वारकडे यांच्यासारखे उत्तम अधिकाऱ्यांनी लातूरच्या तहसिलदाराचे पद भूषविले. त्यांची कारकीर्दही आठवणीत राहील अशीच होती. आता मात्र हे पद चार महिने रिक्त राहिले तरी अधिकाऱ्याची नियुक्ती होत नाही. काँग्रेसचे आमदारांचे दुर्लक्ष, तर भाजप आमदारांचा शहरात वाढता रस यात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे तीन जिल्ह्यांचा पदरभार त्यामुळे त्यांचे लातूरला येणे दुर्मिळच. त्यात आता क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनीही या नियुक्त्यांमध्ये रस घेतल्याचे बोलले जाते आहे. या सर्व रुसवे-फुगवे आणि आवडनिवडीच्या रस्सीखेचीत जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या तालुक्याच्या पदावर कोणाची वर्णी लागेल, हे पाहणे उत्सुकेचे ठरेल.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com