Sambhaji Patil Nilangekar : सत्ताधाऱ्यांवर नाराजी, पण काँग्रेसचा उमेदवार चुकला अन् संभाजी पाटील निलंगेकर जिंकले

Sambhaji Patil Nilangekar Won Won 2024 Vidhan Sabha Election मराठा आरक्षण आंदोलन, सोयाबीनला भाव नसणे, पिकविमा मिळवण्यात येणाऱ्या अडचणी यामुळे निलंगा मतदारसंघात भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर हे आधीच बॅकफूटवर गेले होते. मात्र काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांना या नाराजीचे मतांमध्ये रुपांतर करण्यात आणि ती मते आपल्याकडे वळवण्यात अपयश आले.
Sambhaji Patil Nilangekar
Sambhaji Patil NilangekarSarkarnama
Published on
Updated on

निलंगा तालुक्यात पिकविम्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. कर्मचारी, अधिकारीही आपले ऐकत नाहीत, अशी खंत भाजपच्या पदाधिकाऱ्यांचीही होती. एकूणच काय तर सत्ताधाऱ्यांविषयी लोकांमध्ये प्रचंड नाराजी होती. तरीही भाजपचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी मैदान मारले. काँग्रेसचा उमेदवार चुकला, अशी जी चर्चा सुरू होती ती खरी ठरली.

संभाजी पाटील निलंगेकर हे 2009 चा अपवाद वगळता 2004 पासून तीनवेळा विजयी झाले आहेत. 2004 मध्ये त्यांनी आजोबा, माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला होता. डॉ. शिवाजीराव निलंगकेर (Sambhaji Patil Nilangekar) यांनी 2009 मध्ये या पराभवाची परतफेड केली होती. संभाजी पाटील यांनी 2014 आणि 2019 च्या निवडणुकांमध्ये त्यांचे काका, काँग्रेसचे उमेदवार अशोकराव पाटील निलंगेकर यांचा पराभव केला होता. या निवडणुकीतही काँग्रेसकडून अशोकराव पाटील यांना उमेदवारी मिळेल, अशी चर्चा होती. मात्र काँग्रेसने अभय साळुंके यांना उमेदवारी दिली.

Sambhaji Patil Nilangekar
Jalna Assembly Constituency Result News : जालन्यात शिवसेनेचे अर्जुनास्त्र यशस्वी, गोरंट्याल पराभूत

अशोकराव पाटील निलंगेकर यांना यावेळी उमेदवारी मिळाली असती तर पुतणे संभाजी पाटील निलंगेकर यांचा पराभव झाला असता, अशी चर्चा निलंग्यातील राजकीय वर्तुळात होती. यावेळी अशोकराव यांनीही जंगी तयारी केली होती. अभय साळुंके यांनीही तयारी केली होती. काँग्रेसने उमेदवारीची माळ अभय साळुंके यांच्या गळ्यात घातली. त्यामुळे नाराज झालेल्या अशोकरावांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. नंतर लातूरचे आमदार अमित देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख (Diliprao Deshmukh) यांच्या मध्यस्थीनंतर त्यांनी माघार घेतली.

निलंगेकर कुटुंबीयांमध्ये 2004 पासून राजकीय वितुष्ट निर्माण झाले होते. संभाजी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून वेगळी चूल मांडली होती. संभाजी पाटील यांनी त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत आजोबांचा पराभव केला. त्याचवर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून त्यांच्या मातुःश्री रूपाताई पाटील निलंगेकर यांनी काँग्रेसचे (Congress) दिग्गज नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचा पराभव केला होता. त्यानंतर निलंगेकर कुटुंबीयांतील राजकीय वैर टोकाला गेले होते. वर्षे सरली आणि हे वैर कमी होत गेले. आता तर हा वाद बऱ्यापैकी निवळल्याचे सांगितले जात आहे.

Sambhaji Patil Nilangekar
Dhananjay Munde Won: परळी मुंडेंचीच..! शरद पवारांना मोठा धक्का, राजेसाहेब देशमुखांचा पराभव

संभाजी पाटील यांची गावागावांत यंत्रणा आहे. कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर यांची स्वतंत्र यंत्रणा आहे. त्यामुळे प्रत्येक गावात पोहचणे त्यांच्यासाठी फार अवघड काम नाही. राजकारणाच्या सुरुवातीला कट्टर भूमिका घेणारे संभाजी पाटील निलंगेकर यांनी आता सर्वसमावेशक राजकारणावर भर दिला आहे. काका अशोकराव यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांचे काम सोपे झाले. अशोकराव काँग्रेसमध्ये असले तरी संभाजी पाटील यांच्या रूपाने आमदारकी त्यांच्या घरातच राहणार होती. अशोकरावांच्या समर्थकांमध्ये हा निरोप न सांगताही गेला आणि संभाजी पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.

अभय साळुंके हे आक्रमक नेते आहेत. पण नुसत्या आक्रमकतेवर निवडणूक जिंकता येत नाही. त्याला नियोजनाची, कार्यकर्त्यांची फळीची जोड लागते. प्रत्येक गावात पोहोचावे लागते. निवडणूक झाली की काँग्रेसचे लातूरचे आमदार, मात्री मंत्री अमित देशमुख आणि संभाजी पाटील निलंगेकर पाच वर्षे भांडण करतात, पण निवडणुकीत मात्र ते एक होतात, असे लातूरच्या राजकारणात बोलले जाते. दोघे एक होतात म्हणजे उमेदवार आपल्या सोयीचा देण्याची ते काळजी घेतात, अशी चर्चा असते. या निवडणुकीतही असाच प्रकार घडल्याचे सांगितले जात होते.

Sambhaji Patil Nilangekar
Dhananjay Munde Won: परळी मुंडेंचीच..! शरद पवारांना मोठा धक्का, राजेसाहेब देशमुखांचा पराभव

मराठा आरक्षण आंदोलकांची भाजप आणि फडणवीसांवर प्रचंड नाराजी होती. सोयाबीनला भाव नसणे, पिकविमा मिळण्यातील अडचणी हे विषयही मतदारसंघात होते. ही नराजी मतांमध्ये वळती करण्यात काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांना अपयश आले. अशोकराव पाटील यांची तयारी गेल्या दोन निवडणुकांपेक्षा वेगळी होती. यावेळी त्यांना उमेदवारी मिळाली असती तर निकाल वेगळा लागला असता, असे लोकांचे मत होते. ते खरे ठरले आहे. संभाजी पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत चौथ्यांदा विजय मिळवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com