Jalna Assembly Constituency Result News : जालन्यात शिवसेनेचे अर्जुनास्त्र यशस्वी, गोरंट्याल पराभूत

Arjun Khotkar of Shiv Sena Mahayuti won in Jalna Constituency : खोतकर-गोरंट्याल हे पाच वेळा एकमेकांच्या विरोधात या मतदारसंघातून लढले आहेत. प्रत्येक पाच वर्षांनी खोतकर-गोरंट्याल यांना मतदारसंघातून दिले आहे. कैलास गोरंट्याल तीन वेळा तर अर्जून खोतकर चौथ्यांदा जालना मतदारसंघातून निवडून आले आहे.
Jalna Assembly Constituency
Jalna Assembly ConstituencySarkarnama
Published on
Updated on

जालना : विधानसभेच्या जालना मतदारसंघात शिवसेना महायुतीचे उमेदवार अर्जून खोतकर विजयी झाले आहेत. काँग्रेस महाविकास आघाडीचे विद्यमान आमदार कैलास गोरंट्याल यांचा त्यांनी 32 हजारांच्या फरकाने पराभव केला. जालना मतदारसंघातून आठव्यांदा निवडणूक लढवणाऱ्या अर्जून खोतकर यांनी आपला चौथा विजय मिळवला आहे. खोतकर यांच्या विजयामुळे काँग्रेसकडे गेलेला हा मतदारसंघ शिवसेनेने पुन्हा खेचून आणला. या निमित्ताने अर्जून खोतकर यांचे जालन्याच्या राजकारणात कमबॅक झाले आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल Latest Update

खोतकर-गोरंट्याल हे पाच वेळा एकमेकांच्या विरोधात या मतदारसंघातून लढले आहेत. प्रत्येक पाच वर्षांनी खोतकर-गोरंट्याल यांना मतदारसंघातून दिले आहे. (Kailas Gorantyal) कैलास गोरंट्याल तीन वेळा तर अर्जून खोतकर चौथ्यांदा जालना मतदारसंघातून निवडून आले आहे. स्टील उद्योग, बियाणे कंपन्या, बाजार पेठ आणि फळ बागांचा जिल्हा म्हणून जालना जिल्हा आशिया खंडात ओळखला जातो. या वैशिष्ट्यांमुळे जालना जिल्ह्याला राज्याच्या राजकारणातही महत्वाचे स्थान आहे.

महाराष्ट्रातील निकालाची प्रत्येक घडामोड - येथे क्लिक करा

Jalna Assembly Constituency
Jalna Assembly Election : पाच वर्षात रखडलेल्या विकासाची पोकळी भरुन काढायची आहे : अर्जुन खोतकर

2019 च्या केंद्रातील सत्तेत जालन्याचे भाजप खासदार रावसाहेब दानवे यांच्या रुपाने स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा मराठवाड्याला रेल्वे सारख्या महत्वाच्या खात्याची जबाबदारी राज्यमंत्री म्हणून मिळाली होती. (Shivsena) जालना विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सुरवातीपासून काँग्रेसचे वर्चस्व राहिलेला हा मतदारसंघ. हैदराबाद आणि त्यानंतरच्या मुंबई राज्यात झालेल्या निवडणुकीत देखील या मतदारसंघाने काँग्रेसलाच साथ दिली. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर 1962 ते 1990 दरम्यान या मतदारसंघाने कायम काँग्रेसच्या हातालाच साथ दिल्याचे दिसून आले.

Jalna Assembly Constituency
Mahayuti News : सर्व्हे सोडा; महायुतीचे 160 आमदार निवडून येणार, भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं भाकीत

1990 च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदात शिवसेनेला काँग्रेसच्या या बालेकिल्यात यश मिळाले. अर्जून खोतकर यांनी काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत जालन्याच्यी जागा शिवसेनेच्या ताब्यात घेतली. 1995 मध्ये राज्यात शिवसेना-महायुतीची सत्ता आली तेव्हाही जालन्याची जागा शिवसेनेने जिंकली होती. 1999 मध्ये काँग्रेसने कैलास गोरंट्याल यांना उमेदवारी दिली आणि त्यांनी विजय मिळवत शिवसेनेकडे गेलेली जागा पुन्हा काँग्रेसकडे खेचून आणली. त्यानंतर दर पाच वर्षांनी खोतकर-गोरंट्याल या दोघांनीच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

Jalna Assembly Constituency
Jalna Assembly Constituency : अर्जून खोतकर यांनी घेतली रावसाहेब दानवे यांची भेट

2024 च्या विधानसभा निवडणुकीत पुन्ह खोतकर आणि गोरंट्याल हेच एकमेकांच्या विरोधात लढले. काल झालेल्या मतदानात जालन्यामध्ये 63.63 टक्के मतदानाची नोंद झाली. गेल्या पाच वर्षात राज्याच्या आणि जिल्ह्याच्या राजकारणात बरेच फेरबदल घडले. शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर बाळासाहेब ठाकरे यांची कट्टर शिवसैनिक अशी ओळख असलेले खोतकर सत्तेत बसलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत गेले.माजी राज्यमंत्री असलेल्या खोतकर यांच्यावर पक्षाने उपनेते पदाची जबाबदारी दिली. खोतकरांना बळ देण्यासाठी निधी, नगरपरिषदेचे रुपांतर महापालिकेत, मेडिकल काॅलेज, शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी निधी दिला.

Jalna Assembly Constituency
Kailas Gorantyal and Vijay Wadettiwar : एकीकडे काँग्रेसचे गोरंट्याल संशयाच्या भोवऱ्यात, तर दुसरीकडे वडेट्टीवार म्हणतात, 'आता पक्षातील..'

खोतकरांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी शिवसेनेने त्यांना आठव्यांदा विधानसभेची उमेदवारी दिली. तिकडे काँग्रेस ने सहाव्यांदा कैलास गोरंट्याल यांनाच खोतकरांच्या विरोधात मैदानात उतरवले. त्यामुळे जालनेकरांना गेल्या पंचवीस वर्षात गोरंट्याल आणि खोतकर यांच्याशिवाय दुसरा पर्यायच मिळाला नाही. जालन्यातील या लढतीकडे पारंपारिक लढत म्हणून पाहिले गेले. शिवसेनेत फूट पडल्यानंतरच्या पहिल्याच विधानसभा निवडणुकीत अर्जून खोतकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. पण लोकसभा निवडणुकीत महायुती असतांना भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात घेतलेली भूमिका खोतकर यांच्यासाठी जालन्यात डोकेदुखी ठरण्याची शक्यता वर्तवली जात होती.

Jalna Assembly Constituency
Mahayuti News: अजितदादा, पंकजा मुंडेंचा विरोध, आता भाजपच्या बड्या नेत्याचा 'बटेंगे तो कटेंगें' घोषणेला पाठिंबा; म्हणाला...

मतदानापुर्वी खोतकरांनी भोकरदनमध्ये जाऊन रावसाहेब दानवे यांची भेट घेत पॅचअपचा प्रयत्न केला. शिवाय रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार गोरंट्याल यांच्यातील मैत्री पाहता दानवे त्यांनाच मदत करण्याची अधिक शक्यता होती. जालन्यात खोतकर- गोरंट्याल यांच्यात थेट लढत असून मराठा आरक्षण आंदोलनाचे केंद्रबिंदू असलेल्या या मतदारसंघात मराठा मतदारांची भूमिका निर्णायक ठरली. खोतकर मराठा असल्याने त्यांना जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळाला असे दिसते.

Jalna Assembly Constituency
Arjun Khotkar : 'बीडची जागा शिवसेनेलाच'; खोतकरांनी दिला जगतापांसह शिवसैनिकांना विश्‍वास!

सर्वाधिक काळ सत्ता, तरी भयमुक्त जालन्याचे आश्वासन..

आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या जालना विधानसभा मतदारसंघात गुंडगिरी, दडपशाही, दहशत हे मुद्दे प्रामुख्याने प्रचारात समोर आले. खोतकर-गोरंट्याल या दोघांनी गेली पंचवीस-तीस वर्ष या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. तरी दोघांकडून प्रचाराच भयमुक्त जालन्याचे आश्वासन दिले गेल्याने आश्चर्य व्यक्त केले गेले. जालना शहराला मिळालेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयाच्या श्रेयवादावरूनही दोघांमध्ये चांगली जुंपल्याचे पाहायला मिळाले.

Jalna Assembly Constituency
Mahavikas Aghadi : काँग्रेसच्या पंजामुळे तुतारीची डोकेदुखी वाढली, मतदान न करताच मतदार माघारी फिरले

अर्जून खोतकर पर्यायाने शिवसेनेला याचे श्रेय मिळावे म्हणून स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात महिला सक्षमीकरण मेळाव्यात व्यासपीठावर खोतकर यांनी मेडिकल काॅलेजसाठी किती प्रयत्न केले, कसा पाठपुराव केला हे सांगितले. तर केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता असतांना मेडिकल काॅलेज आणल्याचे श्रेय घेताना लाज वाटत नाही का? अशा शब्दात गोरंट्याल यांच्यावर टीका केली होती. तर कैलास गोरंट्याल यांच्याकडून खोतकर यांच्यावर गुंडगिरी, टक्केवारीचा आरोप केला गेला. यावर जालन्यात गुंडगिरी कोणाची आहे? हे जनतेला माहित आहे, आमचे कुटुंब पहिल्यापासून माळकरी असल्याचे सांगत खोतकरांनी पलटवार केला होता.

Jalna Assembly Constituency
Aurangabad West Assembly Election 2024 Counting : औरंगाबाद पश्चिममध्ये शिंदेंचे शिलेदार संजय शिरसाट आघाडीवर

गोरंट्याल यांनी आपल्या प्रचारात रामनगर सहकारी साखर कारखान्याच्या खरेदी विक्रीतील घोटाळा आणि त्यावरून खोतकरांची झालेली ईडी चौकशी याचाही प्रचारात प्रमुख अस्त्र म्हणून वापर केला. जालन्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, रस्ते, फळबाग उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान न मिळाल्याचा मुद्दा प्रामुख्याने समोर आणला गेला. एकूणच जालना विधानसभा मतदारसंघात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा थेट लढतीत अखेर शिवसेनेच्या अर्जून खोतकर यांनी बाजी मारली आहे. भाजपच्या मकरंद पांगारकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरी त्याचा फारसा परिणाम खोतकर यांच्यावर झाला नाही. तिकडे काँग्रेसच्या अब्दुल हाफीज यांनी बंडखोरी केल्याचा फटका काही प्रमाणात गोरंट्याल यांना बसला असे म्हणावे लागेल.

Jalna Assembly Constituency
Aurangabad East Assembly 2024 : मराठा मतदार ठरवणार 'औरंगाबाद पूर्व'चा आमदार कोण! सावे-इम्तियाज टेन्शनमध्ये

खोतकरांसाठी शिंदे मैदानात, नानांच्या सभाही गाजल्या

स्थानिक पातळीवर खोतकर-गोरंट्याल यांनी आपापल्या परीने प्रचार केला. त्यांनी शेवटच्या टप्यात राज्यस्तरावरील नेत्यांची साथ मिळाली. अर्जून खोतकर यांच्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर सभा घेतली. तर काँग्रेसचे कैलास गोरंट्याल यांच्यासाठी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सचिन पायलट, अमित देशमुख, खासदार इम्रान प्रतापगढी, कल्याण काळे, तेलंगणा राज्याचे मंत्री उत्तम कुमार रेड्डी यांनी जाहीर सभा घेत प्रचारात रंगत आणली.

Jalna Assembly Constituency
Jalna Assembly Election : भयमुक्त जालन्यासाठी आम्ही कटिबद्ध; अमित देशमुखांचे विधान

2009

कैलास गोरंट्याल (काँग्रेस) विजयी-74400 मते

भास्कर आंबेकर (शिवसेना) पराभूत-53629

2014

अर्जून खोतकर (शिवसेना) विजयी-45078 मते

कैलास गोरंट्याल (काँग्रेस) पराभूत-44782

अरविंद चव्हाण (भाजप)-42591

2019

कैलास गोरंट्याल (काँग्रेस) विजयी-91294 मते

अर्जून खोतकर (शिवसेना) पराभूत-66049

2024

अर्जून खोतकर (शिवसेना) विजयी

कैलास गोरंट्याल (काँग्रेस) पराभूत

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com