Shivsena News : हवेत गोळीबार प्रकरणात शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याला अटक; पोलीस कोठडीत रवानगी

Sambhajinagar firing case News : छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान नगर परिसरात 16 एप्रिल रोजी हवेत गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता.
shivsena
shivsenasarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar Crime News : छत्रपती संभाजीनगर शहरातील हनुमान नगर परिसरात 16 एप्रिल रोजी हवेत गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणात पोलीसांनी शिंदेंच्या शिवसेनेचा पदाधिकारी राहुल साहेबराव चाबूकस्वार याला अटक केली आहे. सराईत गुन्हेगारांच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून पुंडलिक नगर पोलिसांनी ही कारवाई केली. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पुंडलीकनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक भंडारे यांनी ही माहिती दिली आहे. शहरात 16 एप्रिल रोजी रात्री हनुमान नगर चौकात दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर हवेत गोळीबार करण्यात आला होता. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेच्या रात्रीच पोलिसांनी संबंधित दोन्ही गटांतील काही संशयितांना ताब्यात घेतले होते.

shivsena
Navi Mumbai crime : 24 तासांत रक्तरंजित नवी मुंबई! 3 हत्या, RTI कार्यकर्ता-बिल्डरवर गोळीबार

तपासा दरम्यान उघड झालेल्या माहितीच्या आधारे राहुल चाबूकस्वार याचा या प्रकरणातील आरोपींशी सातत्याने संपर्क असल्याचे समोर आले. गोळीबाराच्या आधी आणि नंतरही त्याचा संबंधितांशी संवाद झाल्याचे तांत्रिक तपासातून निष्पन्न झाले. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

shivsena
FIR Filed Ganesh Patil : भाजपच्या नगरसेवकाची तरुणाला बेदम मारहाण, कार्यालयात डांबले; गुन्हा दाखल

चाबूकस्वार हा स्थानिक पातळीवर सक्रिय पदाधिकारी असून, पूर्वी तो भाजपशी (BJP) संबंधित होता. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याने शिंदेसेनेत प्रवेश केला होता. पुंडलिक नगर व जय भवानी नगर परिसरात त्याची वर्दळ असल्याचेही तपासात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, हा गोळीबार पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याची शक्यता पोलिस तपासत असून, या प्रकरणातील इतर आरोपींची देखील सखोल चौकशी सुरू आहे.

shivsena
Ichalkaranji Crime : इचलकरंजी हादरली! जामिनावर सुटला अन् पोलिसांसमोरच ठोकला; प्रेम प्रकरणाचा वाद विकोपाला, स्टेटस ठेवून बदला घेतला

प्रकरणाचा पुढील तपास उपनिरीक्षक विनोद भालेराव करत आहेत. हवेत गोळीबार प्रकरणात शिवसेनेचा एक पदाधिकारी अडकला असतानाच दुसऱ्या एका प्रकरणात शिवसेनेच्याच (Shivsena) पदाधिकाऱ्यावर व त्याच्या आईवर शेजारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने चाकूहल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

shivsena
Ichalkaranji Crime : इचलकरंजी हादरली! जामिनावर सुटला अन् पोलिसांसमोरच ठोकला; प्रेम प्रकरणाचा वाद विकोपाला, स्टेटस ठेवून बदला घेतला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com