Ichalkaranji Crime : इचलकरंजी हादरली! जामिनावर सुटला अन् पोलिसांसमोरच ठोकला; प्रेम प्रकरणाचा वाद विकोपाला, स्टेटस ठेवून बदला घेतला

Ichalkaranji Firing Incident: ओंकार दुचाकी चालवत होता, तर पोलीस कर्मचारी पाठीमागे बसला होता. सांगली रोडवरील बादशाह पेट्रोल पंपाजवळील एका पशुखाद्य दुकानासमोर ते पोहोचले असता मागून दुचाकीवर आलेल्या अनुराग सूर्यवंशीने अचानक जवळ येत रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. गोळी ओंकारच्या उजव्या बाजूच्या बरगडीत घुसली.
Ichalkaranji crime news love affair dispute
Ichalkaranji crime news love affair disputeSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 05 Mar : गुन्ह्याच्या शिक्षेतून जामीनावर सुटलेल्या गुंडाला पोलिसांसमोरच ठोकण्याचा प्रकार इचलकरंजीत रात्री उशिरा घडला. इचलकरंजी शहरात गोळीबाराची ही पहिलीच घटना आहे. अपर पोलिस अधीक्षक कार्यालयातून पोलिसांसोबत बाहेर पडलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर भररस्त्यात रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडण्यात आली.

या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारात ओंकार जितेंद्र कांबळे (वय २२, रा. समता चौक, सांगलीवाडी, जि. सांगली) असे जखमी झाला असून त्याला कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. संबंधित जखमी आणि आरोपीचे काही दिवसापूर्वी प्रेम प्रकरणातून वाद झाला होता. त्यातून ओंकार कांबळे याला अटक करण्यात आली होती.

तर संशयित अनुराग सूर्यवंशी याने समाज माध्यमावर 'रिप्लाय देणार' असे स्टेटस ठेवून आव्हान दिल्याचे समोर आले होते. हा प्रकार रात्री साडे सातच्या सुमारास सांगली रोडवरील बादशहा पेट्रोल पंपाजवळ घडला. मिळालेली माहिती अशी की, काही महिन्यांपूर्वी ओंकार कांबळे आणि संशयित अनुराग सूर्यवंशी यांच्यात प्रेम प्रकरणातून वाद निर्माण झाला होता.

Ichalkaranji crime news love affair dispute
Maharshtra Rajya Sabha Election : राज्यसभेतील 'रणसंग्राम' टळला! शरद पवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच सातही जागा बिनविरोध? घोडेबाजार थांबणार

या वादातून मारहाण झाली होती. या प्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. ओंकार कांबळे व त्याच्या साथीदारांना अटकही करण्यात आली होती. नंतर ते जामीनावर बाहेर आले होते. या पार्श्वभूमीवर आज प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ओंकार याला येथील अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावण्यात आले होते.

दरम्यान, कार्यालयाबाहेर अनुराग सूर्यवंशी व त्याचे काही साथीदार हल्ल्याच्या तयारीत असल्याची माहिती ओंकार याने पोलिसांना दिली होती. जयसिंगपूर पोलीस ठाण्याकडील पोलीस जगदीश पाटील यांना ओंकारसोबत जाण्याच्या सूचना देण्यात आल्या. दुपारच्या सुमारास ओंकार पोलीस पाटील यांच्यासोबत दुचाकीवरून कार्यालयातून बाहेर पडला.

Ichalkaranji crime news love affair dispute
Rajya Sabha Election : नवनीत राणांचं राज्यसभेचं तिकीट का कापलं? भाजपसोबतच्या दगाबाजीसह '3 फॅक्टर' ठरले कारणीभूत

ओंकार दुचाकी चालवत होता, तर पोलीस कर्मचारी पाठीमागे बसला होता. सांगली रोडवरील बादशाह पेट्रोल पंपाजवळील एका पशुखाद्य दुकानासमोर ते पोहोचले असता मागून दुचाकीवर आलेल्या अनुराग सूर्यवंशीने अचानक जवळ येत रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडली. गोळी ओंकारच्या उजव्या बाजूच्या बरगडीत घुसली.

अचानक झालेल्या गोळीबारामुळे ओंकार आणि पोलीस पाटील दोघेही दुचाकीसह खाली कोसळले. गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलीस कर्मचारी पाटील यांनी प्रसंगावधान राखत जखमी ओंकार याला जवळील पशुखाद्य दुकानात नेले आणि दुकानाचे शटर खाली ओढले. दरम्यान, हल्लेखोर अनुराग सूर्यवंशी दुचाकीवरून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच गावभाग पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी पंचनामा सुरू होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com